Home » तैमारा घाट…जेथे बदलते तारीख आणि मोबाईलवर अपडेटचा येतो मेसेज, नक्की काय आहे प्रकरण

तैमारा घाट…जेथे बदलते तारीख आणि मोबाईलवर अपडेटचा येतो मेसेज, नक्की काय आहे प्रकरण

by Team Gajawaja
0 comment
Taimara Valley
Share

रांची-टाटा एनएचवर असलेला तैमारा घाट (Taimara Valley) हा गेल्या काही दिवसांपासून खुप चर्चेत आहे. या मार्गाने जाणाऱ्या लोकांना काही अनुभव आले आहेत की, तैमारा घाटातून जाताना मोबाईलवरील वेळ बदलतो. यामुळे लोकांमध्ये या संदर्भात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या संदर्भात तपास ही सुरु करण्यात आला. तैमारा घाटातून जाणाऱ्या लोकांना आलेल्या अनुभवांनुसार, गाडीची गती बदलते आणि स्पीडोमीटर सुद्धा वेगळाच दाखवला जातो. तर कधी अचाक गाडीचा क्लच प्लेट जाम होते आणि गाडी थांबते. त्यानंतर थोड्यावेळाने गाडी स्वत:हून सुरु होते. असे वाटते की, हे क्षेत्र चुंबकीय असून या क्षेत्रात मोबाईलसह काही इलेक्ट्रॉनिक सिस्टिम प्रभावित होते.

रांची महाविद्याचे भूगर्भ विभागाचे लेक्चरर डॉ. नितिश प्रियदर्शी यांचे असे म्हणणे आहे की, त्यांना अशा प्रकारच्या घटनांची माहिती मिळाली होती. त्यांनी असे म्हटले की, त्यांच्या मित्राला सुद्धा अशाच प्रकारची घटनेला सामोरे जावे लागले आहे. त्याबद्दल असे सांगताना असे म्हटले की, रांची-टाटा रोडवर रामपुर येथून बुंडू रोडवर त्यांना एक फोन आला, ते कार चालवत होते, त्यामुळे त्यांनी फोन उचलला नाही. ही घटना जानेवारी २०२२ मधीलच आहे. जेव्हा पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न करण्यासाठी फोन सुरु केला असता त्यांच्या फोनच्या स्क्रिनवर तारीख ही २७ ऑगस्ट २०२३ अशी होती. वेळ होती दुपारी ३.४५ मिनिटांची. म्हणजेच जवळजवळ दीड वर्ष पुढे फोनमध्ये तारीख दाखवली जात होती. अशा विविध घटना त्यांच्या मित्रांसोबत घडल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.

Taimara Valley
Taimara Valley

नेहमीच स्ट्रिट लाइट चालूबंद होत असतात
डॉ. प्रियदर्शनी यांनी असे म्हटले की, असे सुद्धा कळले की, येथे ज्या घटना झाल्या तेथील लाइट्स सुद्धा नेहमीच चालू-बंद होत राहतात. तर असे ही समजू शकतो की, एखाद्या नव्या ठिकाणी गेल्यानंतर वाटेल की, तेथे आपण याआधी सुद्धा आलो आहोत. किंवा एका नव्या व्यक्तीला जरी भेटलो तरीही वाटते आपली आणि त्याची यापूर्वी भेट झाली आहे. खरंतर तैमारी घाटासंदर्भात सोशल मीडियात विविध कथा सुद्धा उपलब्ध आहेत. (Taimara Valley)

हे देखील वाचा- जगातील अशी रहस्यमयी लोक ज्यांच्याबद्दल आजवर काही कळलेच नाही

घाटाच्या किनाऱ्यालगत हनुमान आणि मां कालीचे मंदिर
तैमारी घाटात काहीच दिसणार नाही. फक्त येथे रस्त्यालगतचे एक मंदिर आहे त्या मंदिरात हनुमान आणि मां काली यांच्या प्रतिमा आहेत. या मंदिरात खासकरुन प्रवासी लोक थांबून पूजा करतात. त्यानंतरच पुढचा प्रवास करतात. घाटाच्या परिसरातील रस्त्यांवर सोलर लाइट्स खुप आहेत. तसेच खुप चढउतार ही असल्याने वाहनांचा वेग ही कमी असतो. हा घाट दशम फाल जाणाऱ्या रस्त्यावरुन सुरु होते. ही घाटी संपल्यानंतर डोंगराच्या खाली एक आदिवासी परिवार राहतो. आसपास काही दुकाने सुद्धा आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.