Home » सीरियामध्ये आढळले १६०० वर्ष जुने मंदिर, मिळाली रोमन देवी-देवतांची चित्र

सीरियामध्ये आढळले १६०० वर्ष जुने मंदिर, मिळाली रोमन देवी-देवतांची चित्र

by Team Gajawaja
0 comment
Syria
Share

गेल्या एका दशकापासून बहुतांश काळ युद्धामुळे प्रभावित राहिलेल्या सीरियात एक खुप वर्षांपूर्वीची जुनी इमारत मिळाली आहे. पुरातत्व आणि संग्रहालय विभागाने खोदकाम करुन याच्या मागील रहस्य शोधून काढले आहे. पुरातत्व विभागाला खोदकामामध्ये मिळालेल्या या जुन्या ऐतिहासिक मोजेकला मंदिर असल्याचे अनुमान लावले आहे. खोदकामात मिळालेले मोजेक रोमन आर्टवर बनवण्यात आले होते. हे सीरियातील (Syria) तिसरे मोठे शहर होम्सच्या जवळ रस्तन येथे मिळालेले आहे. सीरियावर गेल्या एक दशकापासून साततत्याने होत असलेल्या हल्ल्यांच्या कारणास्तव येथे अधिकांश पुरातन काळातील काही गोष्टी नष्ट झाल्या आहेत.

यापूर्वी सुद्धा इंडोनेशिया, पाकिस्तान, वियतनाम आणि बांग्लादेशासह काही देशांमध्ये जुन्या मंदिरांचा शोध लावण्यात आला आहे. मात्र सीरियात मिळालेले हे मंदिर म्हणजे पुरातत्व विभागासाठी फार मोठे यश आहे. या इमारतीला जवळजवळ १६०० वर्ष जुनी असल्याचे सांगितले जात आहे. जे १३०० स्क्वेअर फूट मध्ये विस्तारली गेली आहे.

Syria
Syria

मंदिरात रोम देवी-देवतांची चित्र सुद्धा आहेत. यावरुन अनुमान लावला जाऊ शकतो की, येथील लोक यापूर्वी रोमन देवी-देवतांची पूजा करायचे. पुरात्तव विभागाचे असे म्हणणे आहे की, हजारो वर्ष जुनी इमारत असली तरीही त्याची जमीन अगदी कोरीकरकरीत दिसत आहे.

पुरातत्व विभागाचे असोसिएट डायरेक्टर डॉ. ह्युमन साद यांनी असे म्हटले की, अद्याप खोदकाम पूर्ण झालेले नाही. खोदकामात आणखी काही दुर्मिळ गोष्टी सापडू शकतात. त्यानंतर काही मोठे खुलासे होऊ शकतात. आता पर्यंत मोजेकवर नेपच्युन, प्राचीन रोमन, समुद्राची देवता आणि त्यांचा ४० संगिनियांची चित्र मिळाली आहेत. ११ वर्षांपासून सुरु असलेल्या लढाईच्या कारणास्तव लाखो लोक विस्थापित झाली आहेत. लढाई आणि रक्तपाताच्या संघर्षात देशातील जमिनी ध्वस्त झाली आहे. दरम्यान, येथील सरकार काही क्षेत्रांचा बचाव करण्यासाठी किंवा पुन्हा स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत.(Syria)

हे देखील वाचा- हिमाचल मधील ४ वर्षाचा ‘हा’ मुलगा होणार बुद्ध धर्मातील सर्वाधिक मोठा गुरु

दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांमध्ये इंधनाचा तुटवडा पडल्याने आणि बिघडत चाललेल्या स्थितीचा विरोध करण्यासाठी सीरियातील आंदोलकांनी दक्षिणेला असलेले शहर स्वीडा मध्ये तोडफोड केली. तसेच एका शासकीय इमारतीवर हल्ला सुद्धा केला. तर आंदोलनकांनी कार्यालयात पोहचण्यासह तेथे तोडफोड तर केलीच पण अधिकृत कागदपत्र ही चोरी करण्यापूर्वी अंधाधुंद गोळीबार ही केला. यामध्ये एक सुरक्षारक्षक आणि काही नागरिक जखमी झाल्या.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.