Home » Syed Ahmed Maroof : हनीट्रॅपमध्ये पाकिस्तानी उच्चायुक्त !

Syed Ahmed Maroof : हनीट्रॅपमध्ये पाकिस्तानी उच्चायुक्त !

by Team Gajawaja
0 comment
Syed Ahmed Maroof
Share

पाकिस्तान या देशाचे जगभर हसू होत आहे. भारतानं पाकिस्तानमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रावर हल्ला करत पाकिस्तान आणि दहशतवाद यांचे नाते पुन्हा एकदा जगासमोर आणले आहे. त्यातच भारतानं पाकिस्तानमधील हवाई तळही नष्ट केले आहेत. त्यावरुन जगभर पाकिस्तानच्या संरक्षण सामर्थ्यांबदद्ल अनेक विनोद व्हायरल होत आहेत. आता या विनोदामध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. हे नाव आहे सय्यद अहमद मारूफ यांचे. या महाशयांची ओळख म्हणजे ते बांगलादेशामध्ये पाकिस्तानचे उच्चायुक्त म्हणून नियुक्त होते. मात्र त्यांना बांगलादेशमध्ये एका हनीट्रँपमध्ये अडकवण्यात आले. (Syed Ahmed Maroof)

सय्यद अहमद मारूफ यांची सध्या अनेक आपत्तीजनक छायाचित्रे सोशल मिडायवर व्हायरल झाली आहेत. ही छायाचित्रे पुढे आल्यावर या सय्यद अहमद मारूफ महाशयांनी कोणालाही न सांगता गुपचूप बांगलादेशमधून पळून जाणे योग्य समजले. उच्चायुक्त असलेले सय्यद अहमद मारूफ हे अगदी घरगुती कपड्यांवर विमानात बसतांनाचे फोटोही मग काढण्यात आले. हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या या पाकिस्तानी उच्चायुक्तांनी अनेक महत्त्वाची माहिती बांगलादेशमध्ये दिल्याचे सांगण्यात येते. पाकिस्तानचा मित्र देश म्हणून मुहम्मद युनूस यांच्या बांगलादेशाचे नाव घेण्यात येते. बांगलादेशमधील सत्तातरांमध्येही पाकिस्तानचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते. शिवाय सध्या बांगलादेशाच्या सैन्याला पाकिस्तानी सैन्य प्रशिक्षण देत असल्याचेही वृत्त आहे. एवढे घनिष्ट संबंध असलेल्या देशानेही पाकिस्तानच्या उच्चायुक्ताला हनीट्रॅपमध्ये अडकवल्यानं पाकिस्तान आणि सय्यद अहमद मारूफ या दोघांचेही जगभर हसू झाले आहे. (International News)

बांगलादेशातील पाकिस्तानचे उच्चायुक्त सय्यद अहमद मारूफ एका रात्रीमध्ये अंगावर घातलेल्या कपड्यात पळून गेल्याची बातमी आली आणि चर्चा सुरु झाली. बांगलादेश आणि पाकिस्तान हे पक्के मित्र देश आहेत. त्यात मुहम्मद युनूस आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख सय्यद असीम मुनीर अहमद शाह हे दोघंही मित्र म्हणून ओळखले जातात. अशा परिस्थितीत पाकिस्तानी उच्चायुक्तांना पळून का जावे लागले, याची चर्चा सुरु असतांनाच सय्यद अहमद मारूफ यांचे एका महिलेसोबत आपत्तीजनक अवस्थेतील फोटो पुढे आले आणि सर्वत्र खळबळ उडाली. नंतर या प्रकरावर धक्कादायक खुलासे झाले. सध्या पाकिस्तानचे उच्चायुक्त सय्यद अहमद मारूफ हे अनपेक्षित कालावधीसाठी रजेवर असल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यांचे हनीट्रॅपमधील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यावर त्यांची ही रजा कायमची ठरण्याची शक्यता अधिक आहे. (Syed Ahmed Maroof)

अहमद मारूफ यांच्या जागी सध्या उपउच्चायुक्त मुहम्मद आसिफ कार्यवाहक उच्चायुक्त म्हणून काम पाहत आहेत. अर्थात सय्यद अहमद मारूफ हे पाकिस्तानमध्येही गेले नसल्याची माहिती आहे. सध्या पाकिस्तानमध्ये आधीच आग लागल्यासारखी परिस्थिती आहे. तेथील जनतेमध्ये लष्करप्रमुख आणि सरकारविरोधात मोठा रोष आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानमध्ये गेल्यावर आपल्या जीवाला धोका असल्याची जाणीव सय्यद अहमद मारूफ यांना असल्यामुळे त्यांनी अन्य देशात आश्रय घेतल्याची माहिती आहे. हा देश दुबई किंवा सौदी अरेबिया असण्याची शक्यता आहे. सय्यद अहमद मारूफ यांना पद्धतशीरपणे हनीट्रॅपमध्ये अडकवल्याची माहिती बांगलादेशातील वृत्तपत्रातून देण्यात येत आहे. हेच मारुफ बांगलादेशमधील शेख हसीना यांचे सरकार पाडण्यासाठी पुढे होते, अशी माहिती आता उघड झाली आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीरच्या इशा-यानंतर त्यांनी बांगलादेशमध्ये दंगली भडकवल्या होत्या. यात जास्तीत जास्त नुकसान हिंदू समाजाचे होईल, यासाठीही मारुफ यांनी सूचना दिल्या होत्या. (International News)

=======

हे देखील वाचा : Ice Apple : रानमेवा असलेल्या ताडगोळा खाण्याचे लाभ

 

 

=======

मुहम्मद युनूस यांची नेमणूक करुन त्यांच्या आडून पाकिस्तानला बांगलादेशावर पुन्हा नियंत्रण हवे आहे. त्यात मारुफ यांची महत्त्वाची भूमिका होती. मात्र त्याच सय्यद अहमद मारूफ यांना बांगलादेशानं हनीट्रॅपमध्ये अडकवलं आहे. यातून मारुफ यांच्याकडून काही गोपनिय माहिती काढण्यात बांगलादेशाला यश आल्याची माहिती आहे. या हनीट्रॅपचे फोटे उघड झाल्यावर मारुफ यांनी 11 मे रोजीचे ढाकाहून दुबईमार्गे इस्लामाबादला जाणारे विमान पकडले. त्यांच्या या दौ-याची माहितीही पाकिस्तानी प्रशासनाला नव्हती. डिसेंबर 2023 पासून पाकिस्तानचे उच्यायुक्त म्हणून बांगलादेशमध्ये नियुक्त कऱण्यात आलेले सय्यद अहमद मारूफ हे सध्या गायब आहेत. पाकिस्तान सरकारचे कुठले गुपित त्यांनी बांगलादेश सरकारकडे दिले आहे, याबाबत चौकशी सुरु झाली आहे. मात्र सध्याची पाकिस्तानची परिस्थिती पहाता मारुफ पुढचा काही काळ असेच गायब रहाणार हे उघड आहे. (Syed Ahmed Maroof)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.