आज १२ जानेवारी, आज थोर विचारवंत आणि धर्मगुरू अशी ख्याती प्राप्त केलेल्या स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन. आजचा हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांची शिकवण आजही तरुणांना प्रेरणा देते आणि त्यांचे विचार हे आजही माणसाला योग्य दिशा देण्याचे काम करतात. मानवता हाच सर्वांत मोठा धर्म आहे असा संदेश त्यांनी दिला होता. स्वामी विवेकानंद यांनी कायम साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या उक्तीला धरून कार्य केले. संपूर्ण जगामध्ये वेद, हिंदू धर्म आणि योगाचा प्रचार, प्रसार केला. स्वामी विवेकानंद यांचे विचार आजही सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांनी खासकरून युवा पिढीसाठी मोठे काम केले. तरुणांना “उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका” असे आवाहन करून त्यांच्यामध्ये देशाभिमान आणि आत्मविश्वासाची भावना जागृत केली. (Swami Vivekanand)
स्वामी विवेकानंद यांचे नाव उच्चरताच किंवा त्यांचा फोटो बघितल्यानंतर सर्वात आधी १८८३ साली त्यांनी अमेरिकेतील शिकागो येथे केलेल्या जगप्रसिद्ध भाषणाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. याच भाषणाने त्यांना संपूर्ण जगामध्ये कीर्ती मिळवून दिली होती. विवेकानंदांचा १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे जन्म झाला. त्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. लहानपणापासूनच ते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे आणि जिज्ञासू वृत्तीचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. वडील विश्वनाथ हे कोलकाता हायकोर्टात वकील होते. त्यांची आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक विचारांच्या होत्या. त्यांचे वडील पाश्चात्य संस्कृतीवर विश्वास ठेवत असे, त्यामुळे ते आपल्या मुलाला इंग्रजी शिक्षण देऊन पाश्चात्य संस्कृतीच्या पद्धतीने घडवू इच्छित होते. परंतु, वर्ष 1884 मध्येच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. (Marathi NEws)
स्वामी विवेकानंद यांचा बालपणापासूनच अध्यात्माकडे कल होता आणि ते अनेकदा साधू-संतांचे प्रवचन ऐकत असत. वयाच्या २५ व्या वर्षी नरेंद्रनाथ दत्त घर-दार सोडून संन्यासी झाले. संन्यास घेतल्यानंतर त्यांचे नाव विवेकानंद ठेवले गेले. स्वामी विवेकानंद हे अलौकिक प्रतिभेचे धनी होते. ते लहान असताना त्यांना इतिहास साहित्य अशा अनेक विषयांची आवड होती. त्यांनी तत्त्वज्ञान,धर्म, इतिहास,सामाजिक विज्ञान,कला आणि साहित्य इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान मिळवले. सोबतच त्यांनी वेद ,उपनिषद ,पुराण ,रामायण-महाभारत अशा हिंदु धर्मात ग्रंथांचा अभ्यास केला. त्यांना वाचन ,व्यायाम ,कुस्ती ,पोहणे,घोडेस्वारी, गायन-वादन इत्यादींची आवड होती. (Todays Marathi Headline)

नरेंद्र ह्यांची बुद्धी लहान पणापासून तल्लख होती. त्यांच्यामध्ये आई वडिलांचे चांगले गुण आले होते. त्यामुळे त्यांच्या जीवनाला एक नवा आकार मिळाला आणि त्यांनी उत्तम गुणवत्ता संपादन केली. स्वामी विवेकानंद यांनी वयाच्या २५ व्या वर्षी कुटूंब सोडले आणि संन्यास धारण केला. स्वामी विवेकानंद प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु होते. त्यांच्या मध्ये देवप्राप्ती करण्यासाठी प्रबळ तळमळ होती. या साठी ते ब्रह्म समाजात गेले तरी ही त्यांना काही समाधान मिळाले नाही. त्यांनी ललित कलेची परीक्षा १८८१ मध्ये उत्तीर्ण केली. नंतर १८८४ मध्ये त्यांनी कलेचे शिक्षण पूर्ण केले. त्याच वर्षी त्यांनी बीएची परीक्षा चांगल्या पात्रतेने उत्तीर्ण केली आणि कायद्याचा अभ्यास केला. (Latest Marathi NEws)
नंतर त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपोलिटन इंस्टीट्यूट मध्ये प्रवेश घेतला. बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे ते स्वामी रामकृष्ण परमहंस यांना भेटले आणि त्यांनी परमहंस यांना आपले गुरु मानले.रामकृष्ण यांनी नरेंद्र यांना दीक्षा दिली आणि त्यांचे नाव स्वामी विवेकानंद केले. स्वामी विवेकानंदांना तरुणांकडून खूप अपेक्षा होत्या. ते म्हणायचे, “मला शंभर नचिकेता द्या, मी या देशाचा चेहरा बदलून टाकीन.” त्यांच्या दृष्टीने तरुण हा शारीरिकदृष्ट्या बलवान, मानसिकदृष्ट्या स्थिर आणि आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध असावा. त्यांनी समाजातील दीन-दलितांची सेवा करणे हीच खरी ईश्वर सेवा मानली. यासाठीच त्यांनी ‘रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली, जी आजही जगभरात मानवतेचे कार्य करत आहे. (Top Marathi Headline)
जेव्हा स्वामी विवेकानंद महान समाज सुधारक रामकृष्ण परमहंसांना भेटले, तेव्हा त्यांनीही तोच प्रश्न त्यांना विचारला जो इतरांना विचारला होता. त्याचा प्रश्न होता, ‘तुम्ही कधी देवाला पाहिले आहे का?’ यावर रामकृष्ण परमहंसांचे उत्तर असे होते की, ‘मी तुला जसा पाहू शकतो तसा मी देवाला पहात आहे. फरक इतकाच आहे की मला त्याचे अस्तित्व अधिक खोलवर, प्रखरपणे जाणवते. (Top Stories)
अमेरिकेतील शिकागो येथे सर्वधर्मीय परिषदेत भारताचे नेतृत्व करून आपल्या सुंदर वक्तृत्वाने अमेरिकेतील लोकांची मने जिंकली. स्वामी विवेकानंदांनी भाषण करताना माझ्या प्रिय बंधु भगिनींनो असे उद्गार काढतात परिषदेत दोन मिनिटे टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. त्यांनी सर्वधर्मना धर्म आणि अत्याचारासाठी लढायचे आहे हे जगाला पटवून दिले. त्यांनी विश्वबंधुत्त्वाचे नाते निर्माण केले. उठा जागे व्हा आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.असे त्यांचे थोर विचार होते. ‘आध्यात्मवाद आणि भारतीय तत्त्वज्ञानांशिवाय जग अनाथ होईल’ असं स्वामी विवेकानंदांचा दृढ विश्वास होता. (Top Marathi News)

स्वामी विवेकानंद अतिशय उत्कट भक्त होते. त्यांची देवावर अपार निष्ठा होती. त्यांना स्वतः काली मातेने साक्षात्कार देखील दिला होता. स्वामी विवेकानंदांची काली मातेवर अफाट श्रद्धा होती. स्वामी विवेकानंद यांना लहानपणी सर्व प्रथम काली मातेचा साक्षात्कार दक्षनेश्वरीमध्ये झाला होता. स्वामी विवेवकानंद यांचे वडील श्री विश्वनाथ दत्त यांचे १८८४ आकस्मिक निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावरच कुटुंबाची सर्व जबाबदारी आली. नरेंद्र यांनी नोकरी केली, पण उपयोग झाला नाही. दोन वेळच्या जेवणाची देखील भ्रांत पडत होती. नरेंद्र हे त्यावेळी श्रीरामकृष्ण परमहंस यांच्याकडे गेले. त्यांनी गुरूंना सर्व परिस्थिती सांगितली आणि कालीमातेस आपल्या समस्या सोडवाव्यात म्हणून प्रार्थना करण्याची विनंती केली. श्रीरामकृष्ण म्हणाले, “मी मातेकडे सांसारिक गोष्टी मागू शकत नाही, हे तुला माहीत नाही का? तूच माग मातेकडून जे तुला हवं आहे ते. ती तुला नक्की देईल.” (Latest Marathi Headline)
पुढे नरेंद्र हे कालीमातेच्या दर्शनाला गेले. नरेंद्र यांनी कालीमाते समोर उभे राहून तिला मनोभावे नमस्कार केला. त्यांना साक्षात कालीमाता दिसत होती. ममत्वच्या भावनेने ती नरेंद्रकडे बघत होती. ते बघून नरेंद्र हे देहभान विसरले आणि त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले, मला विवेक दे, वैराग्य दे! ज्ञान दे! भक्ती दे! काही वेळाने नरेंद्र हे भानावर आले आणि ते गुरूंकडे गेले आणि सर्व प्रकार सांगितला. श्रीरामकृष्णांनी त्यांना पुन्हा मातेकडे पाठवले. पुन्हा पहिल्यासारखे घडले असे तीनवेळा घडले. नरेंद्र हे अन्न-वस्त्र, नोकरी, समृद्धी मागायला गेला होते, पण या सांसारिक गोष्टी न मागता विवेक, वैराग्य, ज्ञान, भक्ती मागितली. यानंतर त्यांच्या संपूर्ण जीवनाला वेगळीच दिशा मिळाली. (Top Trending Headline)
========
Vastu Tips : नवी जमीन किंवा भूखंड खरेदी करताना वास्तु शास्त्रानुसार कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
Simmer Dating नक्की काय आहे? Gen Z तरुणाईमधील रिलेशनशिपचा नवा ट्रेंड
EPF खात्याच्या प्रोफाइलमध्ये नाव आणि जन्मतारीख कशी अपडेट करावी? वाचा सविस्तर माहिती
========
दरम्यान शुक्रवार, जुलै ४, १९०२ ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिव्राजकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला. आणि स्वामी प्रेमानंद या गुरुबंधूंसमवेत काही काळ फिरत असता त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्यासंबंधात काही सूचना केल्या. ध्यान करत असतांना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली आणि चाळीस वर्षापर्यंत जगणार नाही ही स्वतःची भविष्यवाणी खरी केली. कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक विवेकानंद केंद्र या संस्थेच्या पुढाकाराने उभे राहिले आहे आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
