Home » सुषमा स्वराज एक राजकीय झंझावात

सुषमा स्वराज एक राजकीय झंझावात

by Correspondent
0 comment
Share


देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचा आज प्रथम स्मृतिदिन. गेल्यावर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं. या निमित्ताने त्यांच्या राजकीय प्रवासाचा आढावा

नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्त्वाच्या जोरावर अनेक लढाया यशस्वीपणे लढलेली रणरागिणी आज मृत्यूवर विजय मिळवू शकली नाही, हे दुर्दैवच. सुषमा स्वराज यांचं असं अचानक जाणं देशवासीयांना चटका लावून जाणारं आहे. अर्थात, राजकीय कारकिर्दीत त्यांनी केलेली कामगिरी, धडाकेबाज पराक्रम आणि अनेक विक्रम त्यांची कायमच आठवण करून देणारे आहेत.



१९७७ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी सुषमा स्वराज हरियाणाच्या कामगार मंत्री झाल्या होत्या. सर्वात कमी वयाच्या कॅबिनेट मंत्री म्हणून त्या कायम स्मरणात राहतील. १९७७ते १९७९ दरम्यान समाजकल्याण, कामगार यासारख्या आठ खात्यांची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे सांभाळली होती. त्यानंतर वयाच्या २७व्या वर्षी त्या जनता पार्टीच्या हरियाणा प्रदेशाध्यक्ष झाल्या होत्या.

राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्षाच्या पहिल्या महिला प्रवक्त्या म्हणूनही सुषमा स्वराज यांची ओळख होती. त्याशिवाय, पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणूनही स्वराज यांच्या नावाची नोंद देशाच्या राजकीय इतिहासात आहे.


२०१२ मध्ये सुषमा स्वराज संसदेत विरोधी पक्षनेत्या असताना दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले होते. भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचं मत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केलं होतं. सामनातील एका मुलाखतीत बाळासाहेब ठाकरेंनी हे मत व्यक्त केलं होतं.”हुशार, ब्रिलियन्ट अशी एकच व्यक्त आहे ती म्हणजे सुषमा स्वराज. त्या अप्रतिमरीत्या दणदणीत काम करतील,” असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.



देशाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून इंदिरा गांधी यांनी सर्वप्रथम जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर हे जबाबदारीचं पद भूषवणाऱ्या सुषमा स्वराज दुसऱ्या महिला नेत्या होत्या. चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्या एकूण ११ निवडणुका जिंकल्या. त्या तीन वेळा विधानसभेवर निवडून गेल्या होत्या, तर सात वेळा खासदार म्हणून विजयी झाल्या होत्या.

मोदी सरकार-1 दरम्यान परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांनी केलेल्या कामाला तर तोड नव्हती. ट्विटरवरून साद घालणाऱ्या प्रत्येकाला सुषमांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. छोट्या छोट्या गोष्टींपासून ते कुलभूषण जाधव आणि गीताच्या सुटकेसाठी मनापासून प्रयत्न केले होते. एक सक्षम महिला नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे नेहमीच सर्वांनी बघितलं होतं.

या भारतीय रणरागिणीला विनम्र अभिवादन


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.