Home » अवघ्या २५ व्या वर्षात कॅबिनेट मंत्री झालेल्या सुषमा स्वराज, जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी

अवघ्या २५ व्या वर्षात कॅबिनेट मंत्री झालेल्या सुषमा स्वराज, जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी

by Team Gajawaja
0 comment
Sushma Swaraj
Share

आपल्या देशात असे बहुतांश राजकीय नेते आहेत ज्यांना त्यांच्या काम आणि ईमानदारीसाठी नेहमीच ओळखले जाते. यापैकीच माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज. (Sushma Swaraj) परदेशात संकटात अडकलेल्या बहुतांश भारतीयांसाठी त्यांनी मदतीचा हात पुढे केला. नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कार्यकाळापूर्वी सर्वाधिक उत्तम मंत्र्यांपैकी एक सुषमा स्वराज ओळखल्या जायच्या. सुषमा स्वराज भारताच्या पहिल्या पूर्णकाळ महिला परराष्ट्र मंत्री होत्या. कारण इंदिरा गांधींनी सुद्धा पंतप्रधान पदासह मंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार सांभाळला होता. २०१९ मध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने सुषमा स्वराज यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाने केवळ राजकरणातच नव्हे तर संपूर्ण देशात शोककळा पसरली होती. लोकांना विश्वासच बसत नव्हता की, त्यांचे निधन झालेय.

वयाच्या २५ व्या वर्षात कॅबिनेट मंत्री
सुषमा स्वराज यांनी १९७७ मध्ये हरियाणा विधानसभेत प्रवेश केला होता आणि वयाच्या २५ व्या वर्षातच त्या राज्य मंत्रिमंडळाच्या मंत्री बनल्या. तया दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री होत्या. १९९९ मध्ये बेल्लारी, कर्नाटकातील तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना त्यांनी निवडणूकीत आव्हान दिले होते. १९९० च्या दशकातील सर्वाधिक चर्चेत राहिलेली ती निवडणूक होती. गांधींनी ५६ हजार मतांनी निवडणूक जिंकली होती. त्यांनी १९९८ ते २००४ पर्यंत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारमध्ये सूचना आणि प्रसारण मंत्र्यांसह आरोग्य मंत्र्यांच्या रुपात कार्य केले. त्यांनी २००९ मध्ये मध्य प्रदेशात विदिशा लोकसभा क्षेत्रातील १५ वी लोकसभा निवडणूक जिंकल्या आणि स्वराज नेता बनवल्या.

देशातील सर्वाधिक यशस्वी मंत्री
परराष्ट्र मंत्र्यांच्या रुपात त्यांच्या कार्यकाळात सुषमा स्वराज यांनी सर्वसामान्य लोकांसाठी सर्वाधिक उत्तम मंत्री म्हणून मानले गेले. सामान्य लोकांनी सक्रिय रुपत त्यांच्याकडे मदत मागितली होती. देशात असो किंवा पररदेशात एखादी समस्या असो त्यांनी सर्व गोष्टींवर तोडगा काढला. सुषमा स्वराज यांनी कालांतराने स्वत:हून लोकांची मदत करण्यासाठी हात पुढे केला.(Sushma Swaraj)

२०१५ मध्ये नेहा पारीक नावाच्या एका महिलेने तिच्या आई-वडिलांसाठी मदत मागितली. जी युरोपातील ट्रिप वरुन परतताना इस्तांबुलमध्ये अडकेले गेले होते. कारण नेहाच्या आईचा पासपोर्ट गहाळ झाला होता. नेहाची समस्या ऐकून घेतल्यानंतर सुषमा स्वराज यांनी तातडीने त्यांची मदत केली. सुषमा स्वराज यांनी केवळ भारतीयांचीच नव्हे तर परदेशातील नागरिकांची सुद्धा मदत केली.

हे देखील वाचा- ना विसरणार ना माफ करणार…. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने १२ दिवसात बदलला बालाकोटचा नकाशा

२०१७ मध्ये हीरा अहमद नावाच्या एका पाकिस्तानी महिलेने त्यांना तिच्या मुलीची ओपन हार्ट सर्जरी होणार असल्याचे सांगितले आणि तिच्या मेडिकल विजा रिक्वेस्टला परवानगी मिळत नव्हती. तेव्हा सुषमा स्वराज यांनी तातडीने वीजा दिला जेणेकरुन मुलीवर वेळेवर उपचार होतील.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.