कोर्टात महिलांसाठी वापरल्या जाणाऱ्या आपत्तीजनक शब्दांवर पूर्णपणे बंदी घालण्यासाठी सुप्रीम कोर्टाने ‘हँन्डबुक ऑन कॉम्बैटिंग जेंडर स्टीरियोटाइप्स’ लॉन्च केले आहे. हे हँन्डबुक न्यायाशीधांचे न्यायालयीन आदेश आणि कायदेशीर कागदपत्रात लिंगाबद्दल अयोग्य शब्दांचा वापर करु नये या संदर्भात मार्गदर्शन करेल. ३० पानी असलेली ही हँन्डबुक सुप्रीम कोर्टाच्या वेबसाइटवर सुद्धा अपलोड केली जाणार आहे. सीजेआय डीवाय चंद्रचूड यांनी ही हँन्डबुक लॉन्च करताना असे म्हटले की, महिलांसंबंधित आपत्तीजनक शब्दांचा वापर न करणे हे या हँन्डबुकच्या माध्यमातून न्यायाधीश आणि वकिलांसाठी सोपे होणार आहे. (Supreme Court)
या हँन्डबुकमध्ये काही शब्दांची उदाहरणे सुद्धा दिली आहेत. त्याचा वापर सुनावणी किंवा आदेश देण्यादरम्यान केला जातो. हँन्डबुकमध्ये सांगितले गेले आहे की, कशाप्रकारे असे शब्द कायद्याच्या विरोधात जाऊ शकतात. त्याचसोबत ज्ञात किंवा अज्ञातपणे परंपरागत रुपात अशा शब्दांचा वापर करण्यात येत होता ज्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहचत होती. अशा भाषेपासून दूर राहिले पाहिजे. याच कारणास्तव हे हँन्डबुक लॉन्च करण्यात आले आहे.
या हँन्डबुकचा उद्देश स्पष्ट करण्यासाठी चंद्रचूड यांनी काही उदाहरणे दिली. आदेशात महिलेला उपस्त्री असे म्हणून संबोधले जाते. या व्यतिरिक्त तिला ‘किप्स'(रखेल) सारख्या शब्दांनी संबोधित केले गेले. हा आदेश एक घरगुती हिंसाप्रकरणांना रद्द करण्याप्रकरणी सुनावण्यात आला होता. या प्रकारच्या शब्दांचा वापर केला जाऊ नये. यापूर्वी सुद्धा LGBTQ बद्दल ही एक हँन्डबुक लॉन्च करण्यात आली होती. यामध्ये काही अयोग्य शब्दांचा वापर करू नयेत त्याबद्दल सांगितले होते.
नुकत्याच लॉन्च केलेल्या हँन्डबुकमध्ये कर्तव्यनिष्ठ पत्नी, आज्ञाकारी पत्नी, स्पिनस्टर सारख्या शब्दांचा वापर करु नये असे म्हटले आहे. तर एखाद्या न्यायाधीशांकडून प्रकरणावर निर्णय लिहिताना लोक किंवा समूहाबद्दल रुढीवादी विचारांवर विश्वास ठेवत असेल तर यामुळे फार मोठे नुकसान होऊ शकते. (येथे पहा- हँन्डबुक ऑन कॉम्बैटिंग जेंडर स्टीरियोटाइप्स)
यामध्ये काही रुढीवादी शब्द आणि त्याला पर्यायी शब्द दिले गेले आहे. यामध्ये अफेअरला लग्नानंतरचे नाते, प्रॉस्टिट्युटला सेक्स वर्कर, अनवेड मदर (अविवाहित आई) ला आई, चाइल्ड प्रॉस्टिट्युडला तस्करी करुन आणलेले मुलं, एफेमिनेटच्या ऐवजी जेंडर न्युट्रल शब्दांचा वापर, कॉन्क्युबाइनला अशी महिला तिचे लग्नानंतर अन्य पुरुषासोबत शारिरीक संबंध आहेत, असे काही शब्द बदल करण्यात आले आहेत. समलिंगी किंवा फॅगोट ऐवजी, न्यायाधीशांनी व्यक्तीच्या लिंगाच्या आधारावर वर्णन करावे असे म्हटले आहे. यामध्ये असे ही म्हटले की, वाईट महिला, वेश्या अशा शब्दांचा वापर करु नये. (Supreme Court)
हेही वाचा- भारतीय नागरिकत्व कसे मिळते?
महिलेचा पोषाख तिला स्पर्श करावा या कारणास्तव नसतो- सुप्रीम कोर्ट
त्याचसोबत सुप्रीम कोर्टाने असे म्हटले आहे की, एखाद्या महिलेचे चारित्र्य तिला आवडत असलेल्या कपड्यांवरुन, लैंगिक संबंधाच्या इतिहासावरुन विविध विचार केले जातात. परंतु खरंतर असे आहे की, एका महिलेचा पोषाख हा तिला स्पर्श करावा किंवा लैंगिक संबंध ठेवावेत या उद्देशाने नसतो.