Home » सनी देओलच्या अफेरच्या अफवांमुळे त्रस्त असायची पत्नी, अभिनेत्याने केला खुलासा

सनी देओलच्या अफेरच्या अफवांमुळे त्रस्त असायची पत्नी, अभिनेत्याने केला खुलासा

सनी देओनलने बॉलिवूड इंडस्ट्रीत आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. अभिनेता नेहमीच त्याच्या सिनेमांतील भुमिकेंमुळे चर्चेत राहतो. पण त्यापेक्षाही अधिक त्याच्या अफेअरच्या बातम्यांमुळे लाइमलाइटमध्ये रहायचा.

by Team Gajawaja
0 comment
sunny deol
Share

सनी देओनलने (Sunny Deol) बॉलिवूड इंडस्ट्रीत आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. अभिनेता नेहमीच त्याच्या सिनेमांतील भुमिकेंमुळे चर्चेत राहतो. पण त्यापेक्षाही अधिक त्याच्या अफेअरच्या बातम्यांमुळे लाइमलाइटमध्ये रहायचा. एक काळ असा होता, सनी देओल बॉलिवूड मधील सर्वांचा क्रश होता. त्याचे नाव हिंदी सिनेमातील काही अभिनेंत्रींसोबत जोडले गेले. यामध्ये सर्वाधिक वरती नाव डिंपल कपाडियाचे होते.

डिंपल व्यतिरिक्त अमृता सिंह, मीनाक्षी शेषाद्रि आणि रवीना टंडनचे नाव देखील घेतले जायचे. पण अभिनेता मात्र पूजा देओलच्या प्रेमात होता . सनी आणि पूजा यांनी विवाह केला. १९८४ मध्ये दोघांनी लग्न केले. पण तुम्हाला माहितेय का, सनीच्या अफवांमुळे पूजाला फार त्रास व्हायचा.

आपल्या करियरच्या सुरूवातीला सनीच्या लव्ह अफेअर्सच्या चर्चा बॉलिवूड मध्ये रंगत होत्या. आपल्या एका जुन्या मुलाखतीत सनी देओलने, अफेअरबद्दल पूजाला काय वाटायचे याबद्दलचे स्पष्टीकरण दिले. सनीने म्हटले, अफेअरच्या चर्चा होत राहतात. पण हा आपल्या कामाचा हिस्सा आहे. अभिनेत्याला विचारले गेले, अफेअरच्या चर्चा पूजा पर्यंत कश्या पोहोचायच्या? यावर सनीने म्हटले, मला माहिती नाही त्या गोष्टी पूजा पर्यंत कश्या पोहोचल्या जायच्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

एवढेच नव्हे अमृता सिंह सोबतच्या अफेअरच्या अफेवर देखील सनीने स्पष्टीकरण दिले. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तुमच्याबद्दल काय काय लिहिले जाते हे आधीच पाहिले आहे असे सनीने (Sunny Deol) दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत म्हटले आहे. कधीकधी अधिकच अफेअरबद्दल अपडेट केले असल्यास चिड येते. लिहिणारा व्यक्ती भेटल्यास त्याला मारू शकतो आणि आणखी काय करू शकतो का?

सनी देओलच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास त्याचे आणि पूजाचे नाते आजही टिकून आहे. या कपलला चाहत्यांकडून नेहमीच प्रेम मिळत असते. सनी आणि पूजा देओलला दोन मुलं आहेत.


हेही वाचा- ‘स्टुडेंट ऑफ द ईयर’ साठी आलियाच्या कास्टला सिद्धार्थ, वरुण धवनने दिला होता नकार


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.