भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स पुढच्या काही दिवसात पृथ्वीवर परत येण्याची आशा आहे. 5 जून 2024 रोजी बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून सुनीता विल्यम्स यांनी आपल्या एका सहका-यासोबत उड्डान केले होते. त्या 6 जून रोजी अंतराळ स्थानकामध्ये पोहचल्या. त्यांचे तेथील लक्ष पूर्ण झाल्यावर सुनीता परत पृथ्वीवर येणार होत्या. पण त्यांना परत आणण्यासाठी गेलेल्या कॅप्सूलमध्ये बिघाड झाल्यामुळे गेल्या 8 महिन्यापासून त्या अंतराळ स्थानकात अडकल्या आहेत. आता सुनीता आणि त्यांच्यसह असलेल्या बुच विल्मोर या दोन अंतराळवीरांना पृथ्वीवर सुरक्षित आणण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेसएक्सनं पुढाकार घेतला आहे. स्पेसएक्स कॅप्सूलमधून हे दोघं अंतराळवीर पृथ्वीवर परततील. मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही मोहिम पार पडेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी या मोहिमेवरुन माजी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना लक्ष केले आहे. (Sunita Williams)
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्ससह अंतराळ स्थानकात अडकलेल्या नासाच्या दोन अंतराळवीरांना नियोजित वेळेआधीच पृथ्वीवर आणण्यात येणार आहे. यासाठी नासानं एलॉन मस्क यांच्या स्पेएक्ससह एक योजना तयार केली आहे. यातून नासा एक कॅप्सूल अंतराळात पाठवणार आहे. त्यातून हे दोघं अंतराळवीर परत येणार आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकलेल्या या दोन अंतराळवीरांना परत आणण्यासाठी यापूर्वीही एक योजना आखण्यात आली होती. मात्र ऐनवेळी त्यासाठी पाठवण्यात येणा-या कॅप्सूलमध्ये बिघाड झाला. हे दोन्हीही अंतराळवीर जूनमध्ये बोईंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमधून परतणार होते. पण कॅप्सूलला अंतराळ स्थानकापर्यंत पोहोचण्यात झालेला वेळ पाहता नासानं या मोहिमेत धोका असल्याचे जाहीर केले. शिवाय कॅप्सूल रिकामी परत आणण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर स्पेसएक्सने नवीन कॅप्सूलचे प्रक्षेपणही पुढे ढकलले. (International News)
यावर अधिक संशोधन झाले असून आता हे नवीन कॅप्सूल 12 मार्च रोजी लाँच केले जाईल. सुरुवातीला ही तारीख एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातील सांगण्यात आली होती. अर्थात या मोहिमेत असलेला धोका पाहता, मार्च ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कधीही सुनीता विल्सम्सला परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील असे स्पेसएक्सने सांगितले आहे. सुनीता आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी झालेल्या विलंबावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिका केली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यामुळेच हा विलंब झाल्याचे त्यांना जाहीरपणे सांगितले आहे. या दोन शूर अंतराळवीरांना परत आणण्यासाठी कुठलेही प्रयत्न झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय आपणच एलॉन मस्क यांना यासाठी मोहिम हाती घ्या असे सांगितल्याचेही ट्रम्प यांनी जाहीर भाषणात सांगितले आहे. (Sunita Williams)
सुनीता आणि विल्मोर यांना अंतराळ स्थानकात नासाच्या ‘क्रू फ्लाइट टेस्ट मिशन’ वर गेले होते. यामध्ये, सुनीता विल्यम्स या अंतराळयानाच्या पायलट होत्या. त्यांच्यासोबत आलेले बुच विल्मोर हे या मोहिमेचे कमांडर होते. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात 8 दिवस राहिल्यानंतर ते दोघेही पृथ्वीवर परतणार होते. मात्र हे दोघंही अंतराळवीर ज्या यानातून परत येणार होते, त्या अंतराळयानाच्या सर्व्हिस मॉड्यूलच्या थ्रस्टरमध्ये एक लहान हेलियम गळती झाली. हेलियम वायूच्या उपस्थितीमुळे रॉकेटवर दाब निर्माण होतो. त्याची रचना मजबूत राहते, जी रॉकेटला त्याच्या उड्डाणात मदत करते. सुनीता विल्यम्सच्या प्रक्षेपणानंतर 25 दिवसांत अंतराळयानाच्या कॅप्सूलमध्ये 5 वेळा हेलियम गळती झाली. याव्यतिरिक्त, यानाची झडप पूर्णपणे बंद करता येत नव्हती. (International News)
=============
हे देखील वाचा : Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कसे झाले ?
Modi Trump : पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत काय ठरलं?
=============
अंतराळवीर आणि ह्युस्टनमधील मिशन मॅनेजर देखील एकत्रितपणे याची दुरुस्ती करु शकले नाहीत. परिणामी सुनीता विल्यम्स यांना अंतराळ स्थानकातच रहावे लागले होते. सुनीता आणि त्यांचे सहकारी जवळपास 150 दिवसांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आहेत. या दरम्यान सुनीता विल्यम्स यांच्या प्रकृतीबद्दल अनेक वेळा चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तथापि, नासाने सुनीता आणि बुच यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती दिली आहे. सुनीता विल्यम्स यांची 1998 मध्ये सर्वप्रथम नासानं अंतराळवीर म्हणून निवड केली. त्यांच्या नावावर आता अंतराळ स्थानकात सर्वाधिक रहाण्याचा आणि 26 तास 6 मिनिटे स्पेस वॉकचाही विक्रम नोंदवला गेला आहे. असे असले तरी पृथ्वीवर कसे चालायचे, हे सुनीता विसरल्या आहेत, असे सांगण्यात येते. त्या पृथ्वीवर परत आल्यावर त्यांना काही दिवस वैद्यकीय पथकाच्या विशेष निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. (Sunita Williams)
सई बने