Home » Govinda : लग्नाच्या ३८ वर्षांनी गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता घेणार घटस्फोट?

Govinda : लग्नाच्या ३८ वर्षांनी गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता घेणार घटस्फोट?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Govinda
Share

तसे पाहिले तर बॉलिवूडमध्ये घटस्फोट होणे ही काही फार मोठी गोष्ट नाहीये. कलाकारांसाठी ही आता सामान्य बाब बनत आहे. मात्र जेव्हा अनेक वर्षांचे संसार मोडले जातात तेव्हा सामान्य लोकांना देखील याबद्दल खूपच अप्रूप वाटत असते. मुलं मोठी झाल्यानंतर आणि अनेक वर्ष एकत्र घालवल्यानंतर जेव्हा कोणाच्या घटस्फोटाची बातमी येते तेव्हा खूपच विचित्र वाटते, हसायला येते आणि आश्चर्य देखील वाटते. सध्या मीडियामध्ये आणि बॉलिवूडमध्ये अशाच एका घटस्फोटाची कमालीची चर्चा रंगताना दिसत आहे. ही घटस्फोटाची चर्चा होतेय अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्याबद्दल. (Marathi News)

मधल्या काही काळापासून सतत या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा मीडियामध्ये होताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी देखील या दोघांच्या विभक्त होण्याच्या चर्चा झाल्या त्यानंतर या बातम्या अचानक मीडियामधून गायब झाल्या. मात्र आता पुन्हा गोविंदाच्या घटस्फोटाच्या चर्चा जोर धरत आहे. त्याची पत्नी असलेल्या सुनीताने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केल्याची देखील माहिती आहे. (Todays Marathi Headline)

हॉटरफ्लायने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार, गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने वांद्रे कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. सुनिताने हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम 13 (१) (i), (ia) आणि (ib) अंतर्गत ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये तिने त्यांचे ३८ वर्षांचे लग्न मोडण्यासाठी, फसवणूक, दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध आणि मानसिक छळ हे कारणं दिले आहेत. याबद्दल गोविंदाला २५ मे रोजी समन्स बजावण्यात आले होते परंतु तो कोर्टात प्रत्यक्ष हजर राहिला नाही. त्यानंतर त्याला कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली. आता मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता या प्रत्येक कारवाईदरम्यान उपस्थित राहिल्या होत्या. असे असले तरी यापूर्वी, सुनीता यांनी तिच्या व्लॉगमध्ये घटस्फोटाच्या अफवा असल्याचे म्हटले होते. (Top Trending News)

Govinda

गोविंदाचे ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबतचे अफेअर असल्याची चर्चा फेब्रुवारी २०२५ मध्ये सुरु झाली. गोविंदा आणि सुनीता आहुजा यांनी सततच्या वादांमुळे, मतभेदांमुळे आणि वेगवेगळ्या लाईफस्टाईलमुळे वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले होते. गोविंदाच्या अफेयरची देखील खूप चर्चा झाली. गोविंदाची ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीशी वाढणारी जवळीक हे त्यांच्या वेगळे होण्याचे मुख्य कारण असल्याची देखील चर्चा आहे. या जोडप्याने सहा महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला असला तरी ते पुन्हा एकत्र आले असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले होते. (Latest Marathi News)

दरम्यान आजवर गोविंदाचे अनेक अभिनेत्रींसोबत अफेयर होते. जवळपास १० अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडले गेले मात्र तरीही त्यांनी घटस्फोटापर्यंत त्यांचे नाते येऊ दिले नाही. मात्र आता पुन्हा त्याचे नाव एका अभिनेत्रींसोबत जोडले जात आहे आणि त्यांचे नाते देखील घटस्फोटापर्यंत येऊन ठेपले आहे. (Bollywood News)

दरम्यान एका व्हिडिओमध्ये सुनिता अहूजा मंदिरात जाताना दिसली. तिथे ती पुजाऱ्याशी बोलताना म्हणाली की, ती लहानपणापासून महालक्ष्मी मंदिरात येत आहे. हे बोलताना सुनीताला अश्रू देखील अनावर झाले. पुढे रडत ती म्हणाली, “जेव्हा मी गोविंदाला भेटले, तेव्हा मी या मंदिरात मातेकडे माझे लग्न त्याच्याशी व्हावे आणि मी आयुष्य सुखाने जगावे अशी इच्छा मागितली. मातेने माझ्या सर्व मनोकामना पूर्ण केल्या. मला दोन मुलेही दिली.” (Entertainment News)

सुनिता पुढे म्हणाली, “पण प्रत्येक गोष्ट सहज मिळत नाही, आयुष्यात चढ-उतार येतात. पण माझा मातेवर विश्वास आहे. आज जर मी काही संकटांचा सामना करत असेन, तर मला माहित आहे की, जो कोणी माझे घर तोडण्याचा प्रयत्न करेल, त्याला माता काली… ती बसून सर्वकाही पाहात आहे. एका चांगल्या माणसाला आणि चांगल्या स्त्रीला दुखवणे ही चांगली गोष्ट नाही. मी तिन्ही मातांची मनापासून पूजा करते. ज्या कोणी माझ्यावर ही परिस्थिती आणली आहे आणि जो कोणी माझे घर-कुटुंब तोडण्याचा प्रयत्न करेल, त्याला माता माफ करणार नाही.” (Top News)

========

Jewellery : ज्वेलर दागिने गुलाबी रंगाच्या कागदातच का गुंडाळून देतात?

========

जर गोविंदाचा घटस्फोट झाला तर त्याला सुनीताला किती पैसे द्यावे लागतील? याबद्दल बोलायचे झाले तर, एका बातमीनुसार गोविंदाकडे आजच्या घडीला १७० कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याचा जुहूमध्ये जल दर्शन नावाचा एक बंगला आहे त्या बंगल्याची किंमत १६ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कोलकाता आणि लखनऊसारख्या अनेक शहरांमध्ये त्याचे फ्लॅट आणि फार्महाऊस आहेत. घटस्फोटासाठी कायद्यात अशी कोणतीही रक्कम निश्चित केलेली नाही. घटस्फोट झाल्यास पत्नीला पोटगीचा अधिकार आहे जो अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. गोविंदाकडे १७० कोटी रुपयांची मालमत्ता आहे, त्यामुळे घटस्फोट झाल्यास, त्यातील मोठा भाग सुनीताकडे जाऊ शकतो. परंतु ती रक्कम किती असेल हे न्यायालयच ठरवेल. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.