सुर्यफूल (Sunflowers) आपण पाहतोच. मात्र तुम्ही त्याकडे कडे कधी लक्ष दिले आहे का की, ज्या ठिकाणी सूर्य असतो त्याच दिशेला सुर्यफुलाचे तोंड असते. सूर्याच्या दिशेसह सुर्यफूल सुद्धा फिरत राहतात. दिवसाच्या सुरुवातीला ज्या फुलाचे तोंड पूर्व दिशेला असते त्यानंतर सूर्यास्तावेळी त्याचे तोंड पश्चिमेला होते. सुर्यफुलांच्या शेतीत तुम्ही असे दृश्य पाहिले असेल.
सुर्यफूल ही थंडीच्या दिवसांपेक्षा उन्हाळ्यात अधिक सक्रिय असतात. याचे कारण असे की, सूर्य. ही फुल अशा ठिकाणी जास्त फुलतात आणि विकसित होतात जेथे उन ६-७ तासांपेक्षा अधिक असते. अधिक उन्हात सुर्यफुलं ही अधिक वेगाने विकसित होतात. त्याचसोबत सूर्यासह फुलांची दिशा बलण्यामागील असे की कारण की, हेलिओ ट्रॉपिज्म. एका खासगी युनिव्हर्सिटीमध्ये बॉटनीचे शिक्षक डॉ. केते उत्तम यांचे असे म्हणणे आहे की, असे हेलियो ट्रॉपिज्मच्या कारणास्तव होते. यामुळेच सुर्यफुलाचे तोंड हे सुर्याच्या दिशेने असते.

डॉ. केते यांनी असे सांगितले की, ज्या पद्धतीने व्यक्तींमध्ये एक बायोलॉजिकल क्लॉक असते त्याच पद्धतीने सुर्यफुलांमध्ये हेलियो ट्रॉपिज्म नावाची एक खास व्यवस्था असते. हेलियो ट्रॉपिज्म सिस्टिम सूर्याची किरणे डिटेक्ट करुन फुलांना त्या बाजूने फिरण्यासाठी प्रेरित करतात जेथे सुर्य असतो. सूर्याच्या दिशेसह संध्याकाळच्या वेळी या फुलांची दिशा पश्चिमेला होते. दरम्यान, रात्रीच्या वेळी ते आपली दिशा बदलून पुन्हा पूर्वेला येतात आणि पुढच्या दिवसाच्या सुर्याची वाट पाहतात. ही प्रक्रिया सातत्याने सुरु राहते.
रिसर्चमध्ये असे ही संशोधन करण्यात आले की, ही फुलं रात्रीच्या वेळी आराम करतात आणि दिवसा सूर्याच्या किरणांमुळे ते पुन्हा अॅक्टिव्ह होतात. सुर्याची किरणे अधिक तीव्र होण्यासह सुर्यफुलाची (Sunflowers) सक्रियता अधिक वाढत जाते. हे सर्वकाही हेलिओ ट्रॉपिज्मच्या कारणास्तव होते.
हे देखील वाचा- आज आहे वीगन डे ; दुधाचा वापर वीगन करत नाहीत…
सुर्यफुलाच्या बिया आरोग्यासाठी ठरतात फायदेशीर
सुर्यफुलाच्या बियांपासून औषध तयार केले जाते. जेव्हा फुलं सुकतात तेव्हा त्याच्या पाकळ्या गळून पडतात आणि मधील भागात त्याच्या बिया फक्त शिल्लक राहतात. ज्यांना अगदी सहज काढले जाऊ शकते. सुर्यफुलांच्या बिया या आरोग्यासाठी फार लाभकारी मानल्या जातात. त्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, विटामिन आणि काही अन्य पौष्टिक तत्व सुद्धा असतात. त्यामुळे शरिरातील काही प्रकारचे आजार दूर ठेवण्यास मदत करु शकतात. एका अनुमानानुसार, सुर्यफुलात जवळजवळ दोन हजारांहून अधिक बिया असू शकतात. याच्या बिया दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे ज्या आपण खातो आणि दुसऱ्या म्हणजे ज्यापासून तेल काढले जाते.