Summer Health Care Tips : उन्हाळ्याच्या दिवसात अन्नपदार्थ लवकर खराब होतात. तापमान वाढल्याने बॅक्टेरिया अन्नपदार्थात तयार होऊ लागतात आणि पदार्थ लवकर खराब होतात. काहीवेळेस सकाळी तयार करण्यात आलेले पदार्थ दुपारपर्यंत ताजे राहत नाही. यामुळे तयार केलेले अन्नपदार्थ फुकट जातात आणि आरोग्यावरही परिणाम होतो. फूड पॉइजनिंग, पोटदुखी, मळमळ अशा समस्या होऊ शकतात. अशातच काही सोपे उपाय करून उन्हाळ्यात अन्नपदार्थ स्टोअर करू शकता
सर्वप्रथम पदार्थ तयार केल्यानंतर ते दीर्घकाळ उघडे ठेवू नका. खुले ठेवल्याने त्यामध्ये बॅक्टेरिया तयार होऊ लागतात. पदार्थ थंड झाल्यानंतर ते झाकून ठेवा. याशिवाय अन्नपदार्थ फ्रिजमध्येही ठेवू शकता. फ्रिज नसल्यास पदार्थ थंड ठिकाणी जसे की, कूलर असणाऱ्या खोलीमध्ये ठेवा. शिजवलेले अन्नपदार्थ तयार स्वच्छ भांड्यामध्ये काढून ठेवा. प्लास्टिक एवजी स्टिल किंवा काचेच्या भांड्यामध्ये सुरक्षित ठेवा.
या सोप्या टिप्स वापरा
-भांडी स्वच्छ धुवून त्याचा वापर करा. अस्वच्छ भांड्यांमध्ये अन्नपदार्थ लवकर खराब होऊ शकतात. पदार्थ गरम करताना त्याला वारंवार हात लावणे टाळा.
-डाळ, भात किंवा भाज्या उन्हाळ्यात लवकर खराब होतात. यामुळे हे पदार्थ व्यवस्थितीत धुवून शिजवून घ्या. जेणेकरुन त्यामध्ये बॅक्टेरिया तयार होणार नाहीत.
-शिल्लक राहिलेले पदार्थ गरम करा. यामुळे पदार्थांमधील हानिकारक बॅक्टेरिया दूर होतील.
-अन्नपदार्थ तयार केल्यानंतर बाहेर घेऊन जाणार असाल तर झाकणबंद डब्यामध्ये भरुन ठेवा. याशिवाय पदार्थ इंसुलेटेड बॅग किंवा थर्मल कॅरियरचा वापर करा. जेणेकरुन पदार्थ दीर्घकाळ ताजे राहिल.
-दही, रायता अशा थंड गोष्टी अत्याधिक वेळ बाहेर ठेवू नका. हे पदार्थ लवकर आंबट होतात. जेवण तयार करताना स्वच्छतेची खास काळजी घ्या. हात स्वच्छ धुवून पदार्थ तयार करा.(Summer Health Care Tips)
===================================================================================================
हेही वाचा :
उन्हाळ्यात चुकून पण खाऊ नका ह्या भाज्या, बिघडेल आरोग्य
Health : तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरात दिसतील आश्चर्यकारक फायदे
=====================================================================================================
भाज्या व्यवस्थितीत धुवून शिजवा
भाज्या आणि डाळी व्यवस्थितीत धुवून शिजवा. कधीकधी पदार्थ खराब होण्यामागील कारण म्हणजे, कच्च्या सामग्रीमध्ये असणारे बॅक्टेरियाही असू शकतात. घरात मर्यादित प्रमाणात अन्नपदार्थ तयार करा. जेणेकरुन वारंवार स्टोअर करण्याची वेळ येणार नाही. उन्हाळ्यात ताजे पदार्थ खा.