Home » Success Story: केवळ 100 रुपये घेऊन आले होते मुंबईत, आज आहेत शाहरुखचे शेजारी

Success Story: केवळ 100 रुपये घेऊन आले होते मुंबईत, आज आहेत शाहरुखचे शेजारी

मुंबईला स्वप्ननगरी असे म्हटले जाते. ग्लॅमर आणि कॉर्पोरेट वर्ल्डचे आकर्षणबिंदू असलेल्या या शहरात पैसा आणि संधीची कधीच कमरता भासत नाही.

by Team Gajawaja
0 comment
Success Story
Share

Success story: मुंबईला स्वप्ननगरी असे म्हटले जाते. ग्लॅमर आणि कॉर्पोरेट वर्ल्डचे आकर्षणबिंदू असलेल्या या शहरात पैसा आणि संधीची कधीच कमरता भासत नाही. हेच कारण आहे की, मुंबईत आलेल्या बहुतांश जणांचे नशीब पालटले गेले आहे. बडा व्यवसायिक असो किंवा एखादा यशस्वी कलाकार जे मुंबईत आले पण ते सुद्धा रिकामा खिसा घेऊन. पण आता तिच लोक आयुष्यात यशस्वी झाली आहेत. अशातच मुंबईत केवळ शंभर रुपये घेऊन आलेल्या एका व्यक्तीच्या यशाची कथा आपण पाहणार आहोत. जे आज बिलेनिअर्स आहेत. खास गोष्ट अशी की, हा व्यक्ती आता शाहरुखचा शेजारी आहे.

मुंबईत राहणारे सुभाष रुनवाल अरबपति व्यावसायिक आहेत आणि आपला शेजारी शाहरुख खान यांचे शेजारी असले तरीही त्यापेक्षाही काही पटींनी श्रीमंत आहेत.

कोण आहेत सुभाष रुनवाल?
८० वर्षीय सुभाष रुनवाल मुंबईतील टॉप डेवलपर्सपैकी एक आहेत. ते रुनवाल समूहाचे चेअरमॅन आहेत. त्यांची कंपनी खिशाला परवडतील अशी ते आलिशान अपार्टमेंट आणि शॉपिंग मॉल बनवते. सुभाष रुनवाल यांच्या आयुष्याचा प्रवास हा महाराष्ट्रातील धुळ्यापासून सुरु झाला आहे. त्यांचे बालपण खुप गरिबीत गेले.

डीएनएच्या एका रिपोर्टनुसार, पुण्यात शिक्षण घेतल्यानंतर बीकॉमची डिग्री मिळवली. यानंतर वयाच्या २१ व्या वर्षात रुनवाल यांनी अकाउंटेट होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते मुंबईत आले. जेव्हा १९६४ मध्ये मुंबईत आले तेव्हा त्यांच्या खिशात केवळ १०० रुपयेच होते. आपल्या मेहनीच्या जोरावर ते सीए झाले आणि एका कंपनीत नोकरी करू लागले. १९६७ मध्ये कंपनीकडून अमेरिकेत एका मोठ्या सॅलरीसोबत एक मोठी पोस्टिंग मिळाली. मात्र तेथे लाइफ अॅडजेस्ट होत नसल्याने ते भारतात परतले.

त्यानंतर त्यांनी एका केमिकल कंपनीत काम केले. मात्र १९७८ मध्ये त्यांनी स्वत:चा मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आणि रियल इस्टेटमध्ये आपली गुंतवणूक केली. त्यांची पहिली संपत्ती ठाण्यात २२ एकर होती आणि त्यांचा पहिला प्रोजेक्ट त्याच शहरात १० हजार स्क्वेअर फूट हाउसिंग सोसायटीचा होता. ज्याला किर्तीकर अपार्टमेंट असे नाव दिले गेले. ते लोकांना कमी किंमतीत घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध झाले. (Success story)

हळूहळू सुभाष रुनवाल यांचा रियल इस्टेटमधील व्यवसाय अधिक मजबूत झाला. २००२ मध्ये मुंबईतील मुलुंडमध्ये रुनवाल ग्रुपने पहिला मॉल सुरु केला. सिंगापुर सरकारच्या फर्म मध्ये गुंतवणूक करत त्यांनी घाटकोपरमध्ये १.२ मिलिनय स्क्वेअर फूटरचा आरसिटी मॉल उभारला.

हेही वाचा- Success Story: IIT दिल्लीच्या दोन विद्यार्थ्यांनी आज उभारलीयं 40 हजार कोटींची कंपनी

जेव्हा त्यांनी आपल्या करियरची सुरुवात केली तेव्हा रुनवाल मुंबईतील कुर्ला परिसरात एका भाड्याच्या वन आरके खोलीत रहात होते. त्यानंतर ते घाटकोपरमध्ये दोन बेडरुमचा फ्लॅटमध्ये राहू लागले. मात्र आज सुभाष रुनवाल बॉलिवूड मधील सुपरस्टार शाहरुख खान याच्या वांद्रेतील मन्नत बंगलाच्या बाजूलाच आलिशान घरात राहतात. सुभाष रुनवाल यांची एकूण संपत्ती ११,५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.