Home » Success Story: पाचही स्टार्ट अप मध्ये अपयश तरीही व्यावसायिक होण्याची सोडली नाही जिद्द

Success Story: पाचही स्टार्ट अप मध्ये अपयश तरीही व्यावसायिक होण्याची सोडली नाही जिद्द

आठ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१५ मध्ये सुरु झालेल्या या कंपनीची मार्केट वॅल्यू आज ९८०० कोटी रुपये झाली आहे. खास गोष्ट अशी की, बोट कंपनीचे को-फाउंडर अमन गुप्ता यांच्या यशाची कथा सुद्धा कंपनीच्या यशाप्रमाणेच आहे.

by Team Gajawaja
0 comment
Success Story
Share

Success Story: इअरफोन ते हेडफोनसह काही इलेक्ट्रॉनिक्स सामान तयार करणारी कंपनी बोट याचे तुम्ही प्रोडक्ट्स कधी ना कधी वापरले असतीलच. अवघ्या कमी कालावधीत कंपनीच्या प्रोडक्ट्सने बाजारात मोठी ओळख निर्माण केली आहे. केवळ आठ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१५ मध्ये सुरु झालेल्या या कंपनीची मार्केट वॅल्यू आज ९८०० कोटी रुपये झाली आहे. खास गोष्ट अशी की, बोट कंपनीचे को-फाउंडर अमन गुप्ता यांच्या यशाची कथा सुद्धा कंपनीच्या यशाप्रमाणेच आहे. यापूर्वी त्यांनी ५ आणखी कंपन्या सुरु केल्या होत्या. मात्र त्यापैकी एकामध्ये ही यश आले नाही. अमन हे अपयश आले म्हणून खचले नाहीच पण व्यावसायिक होण्याची जिद्द ही त्यांनी सोडल नाही. यामुळेच ते आज एक यशस्वी स्टार्टपैकी एकाचे मालक आहेत.

बोटचे को-फाउंडर आणि शार्क टँक इंडियाचे जज अमन गुप्ता यांचा जन्म १९८४ मध्ये दिल्लीत झाला होता. पेशाने चार्टर्ड अकाउंटेड असलेल्या अमन यांनी आपले शालेय शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल आणि ग्रॅज्युएशचे शिक्षण दिल्ली युनिव्हर्सिटीतून पूर्ण केले आहे. त्यानंतर उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेले. तेथे केलॉग ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. त्यांच्या वडिलांना वाटत होते की,त्यांनी चार्टर्ड अकाउंटेट व्हावे. मात्र या क्षेत्रात जाण्याचे त्यांचे मन नव्हते.

पाचही स्टार्टअपला मिळाले अपयश
एका युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अमन गुप्ता यांनी असे म्हटले की, बोट कंपनी सुरु करण्यापूर्वी त्यांनी एकामागोमाग एक पाच कंपन्या सुरु केल्या होत्या. मात्र त्यापैकी एकही यशस्वी ठरली नाही. अमन यांनी असे ही सांगितले होते की, त्यांना आयुष्यात काहीतरी करायचे होते. त्याच उत्साहात त्यांना काम करण्याची जिद्द असायची. ते व्यवसायातील दुसरे पैलू काय असतील याचा सुद्धा विचार करायचे. हेच कारण होते की, ते सुरुवातीला यशस्वी झाले नाहीत.

मोठे ऑफिस, टीम वाढली तरीही काही झाले नाही
अमन गुप्ता यांनी असे सांगितले की, मी काहीच विचार केला नाही आणि कंपनी सुरु केली. आत्मविश्वास आणि ओव्हर कॉन्फिडेंस यामध्ये फार फरक असतो. मोठी टीम, मोठे ऑफिस सुद्धा घेतले होते. स्पर्धा खुप होती. ऑफिस आणि टीम मॅनेज करण्यासाठीच अधिक वेळ जायचा आणि यामुळे व्यवसायाकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते.यामधून असे शिकायला मिळाले की, सर्वात प्रथम उत्तम प्रोडक्ट तयार करा, अन्य गोष्टी आपोआप येतील. आज माझे ऑफिस केवळ कॉलेज कँन्टीन ऐवढे आहे आणि व्यवसाय फार मोठा.

अमन गुप्ता यांनी वयाच्या ३६ व्या वर्षात बोटची स्थापना केली होती. वयाच्या २३ व्या वर्षात आपल्या वडिलांसोबत काम करायचे. कोणत्याही बिझनेस स्कूलमध्ये तुम्हाला तुमचे काम शिकवले जात नाही. अमन यांना आपल्या अनुभवांवरुन एक पुस्तक लिहायचे आहे. (Success Story)

हेही वाचा-स्टीव जॉब्सवरच नव्हता Apple च्या को-फाउंडरचा विश्वास

लवकर सुरु करा, प्रयत्न सोडू नका
एक यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी लवकर सुरुवात करा. आपले प्रयत्न कधीच सोडू नयेत. जर सुरुवातीलाच यशस्वी झाल्यास तर उत्तमच आहे. मात्र असे न झाल्यास आणि व्यावसायिक होण्याची जिद्द आहे तर प्रयत्न करत रहा, मेहनत करा. एक दिवस तुम्ही नक्कीच बिझनेसमन व्हाल.

अमन गुप्ता यांचे नेटवर्थ ७०० कोटी रुपये आहे. त्यांनी बोट व्यतिरिक्त सुद्धा ३० अन्य स्टार्टअपमध्ये पैसे लावले आहेत. अमन गुप्ता दिल्लीत आपल्या परिवारासह राहतात. त्यांच्या घराची किंमत ९-१० कोटी रुपये आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.