सुब्रमण्यम वेदम, या भारतीय वंशी व्यक्तिची शोकांतिका सध्या सोशल मिडियावर सर्वाधिक चर्चेत आहे. अमेरिकेमध्ये जन्म झालेल्या सुब्रमण्यम यांचे टोपणनाव सुबू आहे. याच सुबूनं वयाची ४३ वर्ष अमेरिकेच्या तुरुंगात घालवली आहेत. अर्थात एवढी वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली म्हणजे, सुबूचा अपराध नक्कीच मोठा असणार. मात्र तसेही नाही. कुठलाही गुन्हा न करता, फक्त एका संशयाच्या आधारावर या सुबूला एका खुनाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. (America)

अटक झाली, तेव्हा सुबू २० वर्षाचा तरुण होता. मात्र आता ४३ वर्षानंतर तो निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आणि त्याची सुटका झाली. एवढ्या वर्षानंतरही या सुबूच्या नशिबी असलेल्या वेदना सरल्या नाहीत. कारण आता त्याला हद्दपारीची शिक्षा होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत सुबू यांची बहिण आणि अन्य नातेवाईक असतांना त्यांना भारतात पाठवले जात आहे. याला त्याच्या बहिणीनी विरोध करत, आता तरी माझ्या भावाला न्याय द्या, अशी मागणी अमेरिकेतील न्याय व्यवस्थेसमोर केली आहे. सुब्रमण्यम वेदमला न्याय मिळवून देण्यासाठी आता सोशल मिडियावरही मोहीम सुरु झाली आहे. (International News)
सुब्रमण्यम वेदम या भारतीय वंशी व्यक्तीची करुण कथा सर्वत्र चर्चेत आहे. न केलेल्या गुन्ह्यासाठी या सुबू यांनी ४३ वर्षे अमेरिकेच्या तुरुंगात घालवली आहेत. या महिन्यात न्यायालयाने त्यांना एका खून प्रकरणातून निर्दोष घोषित केले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाने आनंद व्यक्त केला. पण क्षणभरानंतर हा आनंद पुन्हा लुप्त झाला. कारण, अमेरिकन इमिग्रेशन विभागाने सुबू यांना ताब्यात घेतले आहे. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की, गेल्या अनेक वर्षापासून सुबू यांचे कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले आहे. सुबूला आता भारतात पाठवले तरी त्याचे कोणतेही नातेवाईक भारतात रहात नाहीत, फारकाय त्याला हिंदीही बोलता येत नाही. त्यामुळे आता पुन्हा अमेरिकेची न्याय प्रणाली या सुबूवर अन्याय करणार आहे का, हा प्रश्न विचारला जात आहे. (America)
सुब्रमण्यम वेदम, म्हणजेच सुबूचा जन्म १९६१ मध्ये भारतात झाला, तेव्हाही त्याचे पालक अमेरिकेत स्थायिक होते. एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पालक भारतात आले असतांना सुबूचा जन्म झाला. त्याच्या जन्मानंतर नऊ महिन्यांनी, सुबू त्याच्या पालकांसह अमेरिकेत परतला. त्याचे संपूर्ण बालपण, शालेय शिक्षण अमेरिकेतच झाले. अमेरिकेच्या प्रतिष्ठित पेनसिल्व्हेनिया महाविद्यालयात सुबू उच्च शिक्षण घेत होता. १९८० मध्ये सुब्बूचा कॉलेज मित्र टॉम किन्सर याची हत्या झाली आणि त्याचे दिवस फिरले. या घटनेचा तपास करणा-या पोलिसांना टॉमसोबत सुबू शेवटी दिसल्याचे समजले आणि त्यावरुन त्यांनी सुबूला अटक केली. सुबूला अटक झाली तेव्हा त्याचे आई-वडिल जर्मनीमध्ये होते. या प्रकरणात कोणतेही साक्षीदार, पुरावे नव्हते. पण सुबूला सुरुवातीपासून अपराधी म्हणून गृहित धरण्यात आले. त्याला जामीन नाकारण्यात आला आणि त्याचा पासपोर्ट आणि ग्रीन कार्ड जप्त करण्यात आले. १९८३ मध्ये, सुबूला याच प्रकरणात जन्मठेपेची शिक्षाही झाली. (International News)
अटक झाल्यावर सुबूवर ड्रग्ज घेतल्याचा आरोपही ठेवण्यात आला. त्याची या प्रकरणातून सुटका करण्यासाठी त्याचा पालकांनी रहाते घर विकून पैसे गोळा कऱण्याचा प्रयत्न केला. मात्र सुबूवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप केल्यावर त्याचा जामीन रद्द झाला आणि त्याचं अवघं तरुणपण तुरुंगात गेलं. या सर्वात सुबूच्या बहिणीनं आपल्या भावासाठी शेवटपर्यंत लढाई दिली. अखेर २०२१ मध्ये तिला यश आले. याबाबत नवीन पुरावे सापडले आणि खटला चालू झाला. २०२२ मध्ये, नवीन फॉरेन्सिक पुरावे समोर आले, यातून बंदुकीच्या गोळीचा घाव न्यायालयात पुराव्या म्हणून सादर केलेल्या शस्त्राशी जुळत नसल्याचे स्पष्ट झाले. यातून २ ऑक्टोबर २०२५ रोजी न्यायालयाने सुबूला निर्दोष म्हणून मुक्त केले. याबाबत न्यायालयाने मान्य केले की, सरकारी वकिलांनी त्याचे निर्दोषत्व सिद्ध करू शकणारे हजारो पानांचे पुरावे लपवले होते. (America)

न्यायालयाच्या निकालानंतर, सुबूच्या वकिलांनी सांगितले की, सुबूवरील खटला हा पेनसिल्व्हेनियातील सर्वात जास्त काळ चालणारा चुकीच्या शिक्षेचा खटला ठरला आहे. या सर्व ४३ वर्षाच्या काळात सुबूनं तुरुंगात अभ्यास केला, अनेक पदव्या संपादन केल्याच शिवाय अन्य कैद्यांनाही शिक्षणासाठी मदत केली. सुबू ४३ वर्षानंतर तुरुंगाच्या बाहेर येणार म्हणून आनंदी झालेल्या त्याच्या बहिणीला अमेरिकेन न्यायव्यवस्थेनं पुन्हा एकदा झटका दिला. कारण त्याचा जन्म भारतात झाला असल्यामुळे इमिग्रेशन डिटेन्शन सेंटरमध्ये त्याला ठेवण्यात आले आहे. त्याला अमेरिकेत राहण्याची परवानगी द्यायची की भारतात पाठवायचे हे न्यायालय ठरणार आहे. १९८८ मध्ये, अमेरिकेने एका जुन्या खटल्याच्या आधारे त्याला हद्दपारीचा आदेश दिला होता, यामुळे इमिग्रेशन विभाग त्याला भारतात पाठवण्यासाठी आग्रही आहे. यामुळे सुबूच्या बहिणींची पुन्हा न्यायालयीन लढाई सुरु झाली आहे.
=======
हे देखील वाचा : Queen Sirikit : फॅशन क्वीनची एक्झीट !
=======
सुबूचे वडील के. वेदम, पेनसिल्व्हेनियाच्या स्टेट कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. तर आई स्थानिक ग्रंथालय चालवत होती. सुबूची मोठी बहीण सरस्वती वेदमने वैदयकीय शिक्षण घेतले आहे. सुबूचे आईवडिल आता हयात नाहीत. मात्र ६४ वर्षीय सुबू त्यांना भेटू शकला नाही. आता त्याची बहिण त्याला आपल्या घरी आणणार तेव्हाच त्याला पुन्हा अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंटने ताब्यात घेतले आहे. निष्पाप सुबूसाठी आता त्याच्या बहिणीनं पुन्हा लढा उभारला असून भावाला न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, असा निश्चय केला आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
