महिलांच्या सौदर्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात ते त्यांचे केस… हेच केस जर काळेभोर, दाट आणि कुरुळे असतील तर त्या सौदर्यांत अधिक भर पडते. याच कारणानं ज्या महिलांचे केस सरळ आहेत, त्या केस कुरळे करण्यासाठी उत्सुक असतात. नैसर्गिकरित्या असलेली केसांची रचना बदलण्यासाठी त्यावर ब्युटीपार्लरमध्ये स्ट्रेटनिंगमशिनचा वापर करण्यात येतो. काही हजार खर्च करुन सरळ केसांचे कुरळे केस केले जातात. मात्र या सर्व प्रक्रियेमध्ये केसांची हानी होते. केसांच्या मुळांना धक्का लागतो. त्यामुळे भविष्यात केसांची गळती होऊ लागते. हेच नाही तर कुरळे केस (Curly Hair Craze) करण्यासाठी वापरण्यात येणा-या हेअर स्ट्रेटनर उपचारपद्धतीमध्ये अनेकवेळा रासायनांचा वापर असतो. यातील घातक तत्त्वांमुळे महिलांना गर्भाशयाचा कर्करोगही होऊ शकतो. अमेरिकेच्या एका संशोधन संस्थेने याबाबत आपला अहवाल सादर केला आहे. कुरळे केस (Curly Hair Craze) करण्याच्या नादात महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले असून केसांच्या प्रक्रियेमध्ये वापरण्यात येणारी रसायने महिलांसाठी मारक ठरत असल्याचे या संशोधनात म्हटले आहे.
अमेरिकेत काही ठिकाणी दुर्मिळ अशा गर्भाशयाच्या कर्करोगामध्ये अचानक वाढ झाल्याचे दिसून आले. त्यानंतर तेथील संशोधन संस्था सतर्क झाल्या. महिलांमधील गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण इतके अधिक होते की, जिथे 16 वर्षांपूर्वी 39 हजार केसेस होत्या, तिथे रुग्णांचा आकडा 66 हजारांवर पोहोचला आहे. यामध्ये कृष्णवर्णीय रुग्णांची संख्या मोठी होती. या माहितीनंतर जर्नल ऑफ नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटतर्फे त्या विभागात संशोधन करण्यात आले. या संशोधनात या सर्व महिला नियमितपणे केमिकल हेअर स्ट्रेटनरचा वापर करत असल्याचे स्पष्ट झाले. या संशोधनानुसार ज्या महिलांनी केस स्ट्रेटनिंग करण्यासाठी कधीही कुठले उत्पादन वापरले नाही, त्यांना वयाच्या 70 व्या वर्षी गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका 1.64% होता. त्याच वेळी, ज्यांनी केस कुरळे(Curly Hair Craze) करण्यासाठी रासायनिक उत्पादने वापरणे सुरू ठेवले त्यांच्यामध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका 4.05% असल्याचे आठळून आले.
हा अहवाल धक्कादायक आहे. फक्त अमेरिकेत नाही तर जगभरात महिलांमध्ये कुरळ्या केसांची क्रेझ आहे. केस कुरळे असल्यास ते अधिक घनदाट दिसतात. तसेच त्यामुळे चेह-याच्या सौदर्यांत भर पडते, म्हणूनही महिला केसांना कुरळे (Curly Hair Craze) करुन घेतात. पण तसे करतांना होणारा रासायनिक उत्पादनांच्या मा-यामुळे केसांनाच हानी पोहचत आहे. तसेच कर्करोगासारख्या रोगाला महिला बळी पडत आहेत.
========
हे देखील वाचा : दिवाळीत लहान मुलांची काळजी घेण्यासाठी ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या
========
या सर्वांपेक्षा नैसर्गितरित्याही केस कुरळे (Curly Hair Craze) करता येऊ शकतात. सर्वात सोप्पा उपाय म्हणजे केस धुतल्यावर ओल्या केसांमधील गुंता हळूवार हातानं काढून घ्यायचा. मग सर्व केस उलटे करुन त्याचा अंबाडा बांधायचा. हा अंबाडा रबर बॅंडने घट्ट करायचा. एक तासभर असे केस ठेवायचे. त्यानंतर अंबाडा सोडायचा. असे केल्यानं केसांच्या छान लाटा तयार होतात आणि कुरळ्या केसांचा अनुभव घेता येतो. यापेक्षा अधिक केस कुरळे हवे असतील तर केस धुतल्यावर केस केस दहा ते बारा भागात विभाजित करायचे. प्रत्येक भागाला निट विंचरुन त्याचा अंबाडा बांधावा…शक्य असेल तर त्याच्या वेण्या बांधाव्या. अशानं केस सुकायला मदतही होते. असे केस जेवढावेळ शक्य असेल तेवढे ठेवावे. या वेण्या नंतर सोडल्यावर केस छान कुरळे झाल्याचे आढळते. केसांना कुरळे करण्यासाठी काही खास पिनाही मिळतात. या रोलसारख्या असलेल्या पिनांमध्येही केसांना गुंडाळून ठेवता येते. त्यातून आपले केस कुरळे करुण्यासाठी कुठल्याही रासायनिक उत्पादनांची मदत घ्यायला लागत नाही. काहीवेळा केसांचे छोटे छोटे भाग करुन त्याच्या वेण्या बांधता येतात. या वेण्या नंतर एकत्र करुन त्यांचा अंबाडा बांधायचा आणि नंतर जाड टॉवेल गरम पाण्यात पिळून घेऊन तो केसांवर गुंडाळायचा. अशामुळे केसांच्या मुळांना चांगला शेक मिळतो आणि केस मुळापासून कुरळे दिसू लागतात.
अर्थात हे सर्व उपाय करुन केस काही दिवसांसाठी कुरळे ठेवता येतात. या घरगुती उपायांनी केस कायमचे कुरुळे होत नसले, तरी त्यांना कोणतीही हानी होत नाही. यामुळे कुठल्याही रासायनिक उत्पादनाचाही वापर केसांवर करावा लागत नाही. त्यामुळे आरोग्यासाठी महिलांनी अशा घरगुती उपायांना प्राधान्य दिल्यास त्यांचे आरोग्यही चांगले राहिल.
सई बने