Home » आमदाराला रेल्वेत प्रवास करत असताना ढेकूण चावला म्हणून, मुख्यमंत्र्यांनी ‘तो’ डबाच रेल्वेतून रद्द केला होता

आमदाराला रेल्वेत प्रवास करत असताना ढेकूण चावला म्हणून, मुख्यमंत्र्यांनी ‘तो’ डबाच रेल्वेतून रद्द केला होता

by Team Gajawaja
0 comment
प्रणिती शिंदे Praniti shinde
Share

राजकिय नेते आणि त्यांच्या आयुष्याशी निगडित असलेले चित्र विचित्र किस्से हे सर्वसामान्य जनतेसाठी काही नवे राहिलेले नाहीत. असाच एक गाजलेला गमतीशीर किस्सा म्हणजे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सुकन्या आणि सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचा. हा किस्सा त्यांच्या सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या प्रवासामधला गमतीशीर किस्सा आहे. 

रेल्वे प्रवास आणि आमदार? असा प्रश्न तुमच्या मनात येणं अगदी स्वाभाविक आहे. ही गोष्ट सहा सात वर्षांपूर्वीची आहे. झालं असं की, काही कामानिमित्त तातडीने मुंबईला दौरा असल्याकारणाने वेळ वाचविण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी सोलापूर ते मुंबई हा प्रवास ‘सिद्धेश्वर एक्सप्रेस’च्या स्पेशल कंपार्टमेंटमधून करण्याचे ठरविले. मोठ्या पदावर असलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सुकन्या म्हणून प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या प्रवासासाठी साहजिकच रेल्वेकडून विशेष सोय करण्यात आली होती. सर्व सोई सुविधांनी युक्त असे स्पेशल एसी कंपार्टमेंट त्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

प्रवासादरम्यान ‘मोहोळ’ रेल्वे स्थानक सोडल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी मुंबईला पोचण्यापूर्वी विश्रांती घ्यायचं ठरवलं. त्यासाठी त्या आपल्या कंपार्टमेंटमधल्या बिछान्यावर झोपायला गेल्या. झोप लागतेय न लागतेय तोच काही वेळातच त्यांना काहीतरी चावले. त्यामुळे त्यांची झोपमोड झाली. आपल्याला नक्की काय चावले असेल, या काळजीने त्या भयभीत झाल्या आणि त्यांनी ताबडतोब रेल्वे अटेंडन्टला कंपार्टमेंटमध्ये बोलवून घेतलं. रेल्वे अटेंडंट आल्यावर झोपेत आलेल्या व्यत्ययाचा सगळा राग प्रणितीजींनी त्याच्यावर काढला. प्रणिती यांच्या बोलण्यावरून नक्की काय चावले असावे, हे अटेंडन्टच्या लक्षात आले आणि त्यांनी प्रणिती मॅडमना ‘ढेकूण चावला असावा’, असे सांगितले.

Arrest warrant against former Union Home Minister Sushilkumar Shinde's MLA  daughter Praniti- The New Indian Express

‘ढेकूण’ हा शब्द ऐकून आपल्याला ढेकूण चावला म्हणजे जणू आभाळ कोसळले असून, जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाल्याच्या भावनेतून रेल्वेची साखळी खेचत प्रणिती शिंदे यांनी ट्रेन थांबवली. त्यानंतर स्पेशल कंपार्टमेंटमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना ढेकूण शोधायला लावले. त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर, त्यांनी त्यांनतर संपूर्ण कंपार्टमेंटमध्ये फवारणी करून घेतली.

हे ही वाचा: विनायक पाटीलांनी दाखवलेल्या ‘त्या’ प्रसंगावधनामुळे शरद पवारांचा तो कार्यक्रम यशस्वी झाला होता (Sharad Pawar)

दिल्ली दंगलीतील आठवणींचे ग्रहण!

हा प्रकार समोर आल्यानंतर सामान्य प्रवाश्यांना प्रवासादरम्यान होणाऱ्या त्रासाचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर ढेकूण सापडले म्हणून अनेक प्रवाश्यांनी रेल्वेची चेन खेचल्याच्या घटनाही समोर आल्या.

हे सुद्धा वाचा: हिंदू धर्मात मृत्यूपश्चात लहान मुलांना अग्नी न देता दफन का करतात?

या घटनेनंतर प्रणिती शिंदे ( Praniti Shinde) आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर विरोधकांनी अनेक टीकास्त्र सोडले. इतकेच काय तर, प्रणिती शिंदे प्रवास करत असलेल्या स्पेशल कंपार्टमेंटमध्ये ढेकूण सापडल्याने सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर रेल्वे अधिकाऱ्यांना तो डब्बा रेल्वेला न जोडण्याबद्दल सांगितले होते.

-निवास उद्धव गायकवाड


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.