Home » राम-जानकी यांची मुर्ती साडे ६ कोटी वर्षापूर्वीच्या खडकापासून का बनवण्यात येणार?

राम-जानकी यांची मुर्ती साडे ६ कोटी वर्षापूर्वीच्या खडकापासून का बनवण्यात येणार?

by Team Gajawaja
0 comment
Statue of Ramlala
Share

अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरु आहे. याच दरम्यान, अशी चर्चा सुरु झाली आहे की, नेपाळहून साडे सहा कोटी जुन्या खडकापासून राम-जानकी यांची मुर्ती तयार केली जाणार आहे. खडकाच्या दोन हिस्स्यांपासून भगवान श्रीराम आणि माता सीता यांची मुर्ती बनवली जाणार आहे. या खडकाच्या दोन तुकड्यांना नेपाळ मधील काली गंडकी नदीतून बाहेर काढले आहे. द हिंदू यांच्या रिपोर्ट्सनुसार, या खडकाचे वजन ३५० टन असल्याचे सांगितले गेले आहे. जनकपुरधाम मध्ये हे खडक देण्यासाठी नुकताच एक कार्यक्रम पोखरा येथे आयोजित करण्यात आला होता.(Statue of Ramlala)

नेपाळ स्थित जानकी मंदिराचे महंत आणि माजी उप-पंतप्रधान बिलमेंद्र निधी २५० लकांसह दोन्ही खडक घेऊन अयोध्येत पोहचणार आहेत. त्यानंतर ते भारताकडे सुपूर्द करणार असून १ फेब्रुवारीला रस्ते मार्गे अयोध्येत आणणार आहेत.

किती महत्वाचा आहे हा खडक?
असे सांगितले जात आहे की, नेपाळ आणि भारताचे यामुळे संबंध अधिक उत्तम होऊ शकतात. हा सामान्य खडक नाही. तो शालीग्राम शिलेचा हिस्सा आहे. गंडकी नदीत शालीग्रामचे हे खडक आढळून येतात. ते करोडो वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. या शालीग्राम खडकांची पूजा भगवान विष्णूच्या रुपात केली जाते. हेच कारण आहे की, याला देवशिला नावाने ही ओळखले जाते.

धार्मिक मान्यतेनुसार, हिंदू धर्मात याचे विशेष महत्व आहे. याला भगवान विष्णू यांचे स्वरुप मानले जात असल्याने घरांमध्ये त्याची पूजा ही केली जाते. या खडकापासून अयोध्येत २०२४ च्या मकर संक्रांतीपूर्वी राम-जानकी यांच्या मुर्त्या बनवल्या जाणार आहेत.

भगवान विष्णूंचा अवतार शालिग्राम
मान्यता अशी आहे की, जगभरात ३३ प्रकारचे शालिग्राम असतात. त्यापैकी २४ रुपांना भगवान विष्णूचे २४ अवतराशी जोडले जाते. ज्या घरात ते ठेवले जातात तेथे सुख-शांति, प्रेम आणि देवी लक्ष्मीची कृपा नेहमीच राहते. (Statue of Ramlala)

हे देखील वाचा- उज्जैन मध्ये रात्रीच्या वेळी कोणताही मंत्री, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान का थांबत नाहीत?

३५० टनचे आहेत दोन्ही खडक
काली गंडकी नंदीच्या किनाऱ्यावर पुजाऱ्यांच्या एका समूहाने खडकांची पूजा केली. या दरम्यान, भारतातून गेलेले विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ नेत्यांसह काही लोक ही उपस्थितीत होती. जानकी मंदिरांचे प्रमुख महंत रामतापेश्वर दास यांचे असे म्हणणे आहे की, काही आठवड्यांच्या प्रयत्नांनंतर तज्ञांनी खडकाचे दोन मोठे तुकडे निवडले आहेत. तज्ञांची टीम जियोलॉजिस्ट आणि टेक्निशियंस सुद्धा आहे. तपासानंतरच त्या तुकड्यांची निवड करण्यात आली. त्यांचे वजन ३५० टन आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.