Home » एकेकाळी स्टार प्लेअर असलेली आणि वर्ल्डकपमध्ये चमकलेली ही मंडळी… आता कोण बस चालवतंय तर कोण सुतारकाम करतंय …..

एकेकाळी स्टार प्लेअर असलेली आणि वर्ल्डकपमध्ये चमकलेली ही मंडळी… आता कोण बस चालवतंय तर कोण सुतारकाम करतंय …..

by Correspondent
0 comment
Cricketer | K Facts
Share

२०११ च्या वर्ल्ड कपमध्ये खेळलेला आणि धोनीच्या चेन्नईला चॅम्पियन बनवलेला तो प्लेयर आता ऑस्ट्रेलियात करतोय ड्रायव्हरची नोकरी आणि दुसरीकडे सिद्धार्थ त्रिवेदी ज्याने उत्कृष्ट कामगिरी करून देखील आता त्याचे नाव कुठेही नाही… किंबहुना क्रिकेटप्रेमीही त्याला विसरले, तर तिकडे वर्ल्डकप २०१५ मधला स्पिनर झेवियर बनला सुतार … असं नेमकं का झालं आणि यामागची खरी कारणं काय …?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनेक खेळाडूंचं आयुष्य सोपं राहत नाही. संन्यास घेतल्यानंतर क्रिकेटपटूंना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत असल्याची अनेक उदाहरणं आपण बघितली आहेत. झेवियर डोहर्टी एक काळ ऑस्ट्रेलियाच्या टीमचा प्रमुख स्पिनर होता. २०१० मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. २०१५ च्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विजयी टीमचा डोहर्टी भाग होता. याच वर्ल्ड कपमध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला, पण फायनलमध्ये त्याला खेळायची संधी मिळाली नाही. २०१७ मध्ये डोहर्टीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

Cricketer xavier doherty becomes carpenter due to  financial crisis
Cricketer xavier doherty becomes carpenter due to financial crisis

२०१७ साली क्रिकेटपासून लांब झाल्यानंतर झेवियर (Xavier Doherty) कठीण परिस्थितीतून जात आहे. डोहर्टी सध्या घर चालवण्यासाठी सुतार काम करत आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने (Australian cricketer) डोहर्टीचा सुतार काम शिकतानाचा व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये डोहर्टी एका बिल्डिंगच्या साईटवर अवजारांसोबत कारपेंटरच्या वेशात दिसत आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशनने शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये डोहर्टी म्हणाला, ‘क्रिकेट सोडलं तेव्हा काय करायचं, याबाबत काहीच ठरवलं नव्हतं. सुरुवातीचे १२ महिने जे काम मिळालं, ते मी केलं. यामध्ये लॅण्डस्केपिंग, ऑफिसचं काम आणि क्रिकेटसंबंधीच्या काही कामांचा समावेश होता.’ यानंतर डोहर्टीने कारपेंटर बनण्यासाठीचा कोर्स करायला सुरुवात केली. यापैकी त्याचं ७५ टक्के प्रशिक्षण पूर्ण झालं आहे.

तर दुसरीकडे सिद्धार्थ त्रिवेदी (Siddharth Trivedi) हा गुजरात क्रिकेट संघाकडून (Saurashtra cricket team) खेळणारा खेळाडू आहे. त्याचं नाव अडकलंय स्पॉट फिक्सिंगच्या गुन्ह्यात. राजस्थान रॉयल्सचा खेळाडू असलेल्या या त्रिवेदीने हा गुन्हा मान्य देखील केला होता. एका अहवालानुसार पोलीस चौकशी मध्ये सिद्धार्थ ने तीन लाख घेतल्याचे कबुल देखील केले होते. २०१२ मध्ये त्याने दीपक शर्मा आणि सुनील भाटिया यांच्याकडून हे तीन लाख घेतल्याचे मान्य केले होते. मात्र नंतर स्टिंग ऑपरेशनच्या भीतीने ते पैसे त्याने परत केले. या गुन्ह्यात राजस्थान रॉयल () च्या इतर दोषींना देखील अटक झाली. पूर्वी राजस्थान रॉयल्समधून दमदार कामगिरी करून गतविजेत्या कोलकत्ता नाइट रायडर्सला 19 धावांनी हरवले होते. सिद्धार्थ त्रिवेदीने अप्रतिम गोलंदाजी करताना तीन गडी बाद केले. तोच सामनावीराचा मानकरी ठरला. त्याची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. या आरोपांनंतर देखील सिद्धार्थ डोमेस्टिक क्रिकेट खेळलाय आणि यावरच तो थांबला नाही तर आता सिद्धार्थ अमेरिकेच्या अंडर 19 क्रिकेट खेळाडूंचा प्रशिक्षक आहे.

Rajasthan Royals forgotten hero, Siddharth Trivedi
Rajasthan Royals forgotten hero, Siddharth Trivedi

सुरज रणदीव…(Suraj Randiv) जो २०११ च्या वर्ल्ड कपमध्ये खेळला, ज्याने धोनीच्या चेन्नईला चॅम्पियन बनवलं, तसेच आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंगजचे प्रतिनिधित्व केलं आहे. पण आता ऑस्ट्रेलियात करतोय ड्रायव्हरची नोकरी.. त्याला कारण देखील तसेच आहे. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू (Sri Lankan cricketer) सुरज रणदीवने आता आपलं क्षेत्रच बदललं आहे. श्रीलंकेचा हा खेळाडू ऑस्ट्रेलियामध्ये बस चालकाची नोकरी करत आहे. श्रीलंकेच्या या खेळाडूने तिन्ही फॉरमेटमध्ये आपल्या संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच तो भारतात झालेल्या २०११ च्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका संघाचा सदस्य होता. रणदीवने एकूण १२ कसोटींमध्ये ४६ विकेट्स घेतल्या आहेत. तर ३१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३६ बळी मिळवले आहेत. तर ७ टी २० मॅचेसमध्ये ७ फलंदाजांना माघारी पाठवलं आहे. तसेच बॅटिंग करताना त्याने सर्वाधिक ५६ धावा केल्या होत्या. ही त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली होती. सूरजने आपला अखेरचा देशांतर्गत सामना एप्रिल २०१९ मध्ये खेळला होता.

Suraj Randiv bus driver: Suraj Randiv - Former Sri Lankan cricketer
Suraj Randiv bus driver: Suraj Randiv – Former Sri Lankan cricketer

रणदीव आता मेलबर्नमधील ट्रान्सडेव या कंपनीसाठी ड्रायव्हर म्हणून काम करत आहे. रणदीव यासोबतच तिथे एका स्थानिक क्लबसाठीही क्रिकेट खेळत आहे. रणदीव आता चालकाची भूमिका बजावत आहे. पण त्याने क्रिकेटसोबतचं नातं तोडलेलं नाही. आपली नोकरी सांभाळत तो ऑस्ट्रेलियामधील स्थानिक डांडेनॉंग क्रिकेट कल्बमधून खेळतो आहे. या क्लबकडून जेम्स पॅटिन्सन आणि पीटर सीडलही खेळतात. जेव्हा टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती, तेव्हा रणदीवने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना फिरकीचे धडे दिले होते.

शेवटी प्रत्येकाच्या यशाचा एक ठराविक कालावधी असतो, जो प्रत्येकाला सांभाळता येतोच आणि टिकवताही येतो असं नाही.

शब्दांकन- शामल भंडारे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.