Home » Staple Visa म्हणजे काय?

Staple Visa म्हणजे काय?

स्टेपल वीजा संदर्भात भारत आणि चीन मध्ये पुन्हा वाद सुरु झाला आहे. खरंतर भारतीय वुशु टीम चीनच्या चेंगदू मध्ये सुरु असलेल्या युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी जाणार होती

by Team Gajawaja
0 comment
staple visa
Share

स्टेपल वीजा संदर्भात भारत आणि चीन मध्ये पुन्हा वाद सुरु झाला आहे. खरंतर भारतीय वुशु टीम चीनच्या चेंगदू मध्ये सुरु असलेल्या युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी जाणार होती. या टीममध्ये अरुणाचल प्रदेशातील तीन खेळाडूंचा सुद्धा समावेश होता. त्यावेळी चीनने या खेळाडूंना स्टेपल वीजा जारी केल्यानंतर भारत सरकारने आपल्या खेळाडूंना चेंगदू येथे पाठवण्यास नकार दिलाय ऐवढेच नव्हे तर एसोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीच्या वुशू टीमचे अन्य सदस्य सुद्धा दिल्ली विमानतळावरुन परतले.(Staple Visa)

कोणत्याही देशात दुसऱ्या देशाच्या नागरिकाला प्रवेश मिळावा म्हणून वीजा अनिवार्य असतो. यामध्ये टुरिस्ट, ट्रांजिट, बिझनेस, जर्नलिस्ट, पार्टनर आणि ऑन अराइवल वीजाचा समावेश आहे. या सर्व वीजासाठीचे नियम आणि कायदे हे वेगवेगळे असतात. वीजावर लावण्यात आलेल्या स्टॅम्पवरुन कळते की, एखादा व्यक्ती देशात का आला आहे. जसे की, टुरिस्टचा अर्थ व्यक्ती देशात फिरण्यासाठी आला आहे. तर चीन स्टेपल वीजा सुद्धा जारी करतो. अशातच स्टेपल वीजा नक्की काय हे जाणून घेऊयात.

स्टेपल वीजा म्हणजे काय?
चीनकडून जारी करण्यात येणाऱ्या स्टेपल वीजावर इमिग्रेशन ऑफिसर पासपोर्टवर स्टॅप लावण्याऐवजी एक कागदाचे तिकिट देतो. इमिग्रेशन ऑफिसर त्यावर असे लिहितो की, व्यक्ती चीनचा प्रवास का करत आहे आणि चीन व्यतिरिक्त इरान, उत्तर कोरिया, क्यूबा आणि सीरियाचा सुद्धा स्टेपल वीजा जारी करतात. हे सर्व देश चीन आणि वियतनामच्या नागरिकांना स्टेपल वीजा जारी करतात. मात्र करारानंतर यामध्ये सूट दिली गेली आहे. आता हे देश चीन आणि वियतनामच्या नागरिकांना स्टॅम्प वीजा जारी करतात.

तर भारताला स्टेपल वीजा जारी करण्यामागे एक जुने कारण आहे. चीन अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-कश्मीर मधील लोकांना स्टेपल वीजा जारी करते. तर भारतातील अन्य राज्यातील नागरिकांसाठी एक सामान्य वीजा जारी करतात. खरंतर चीन अरुणाचल प्रदेशाला तिब्बेटचा हिस्सा मानतो. तसेच त्यावर चीनचा अधिकार असल्याचे मानतात.मात्र अरुणाचल प्रदेशातील लोकांना आपल्या देशाचा हिस्सा मानत नाहीत. अशातच त्या राज्यातील लोकांना चीन स्टेपल वीजा जारी करतो.

देशाकडून या वीजाचा का विरोध केला जातो?
कोणताही देश आपल्या शेजारील किंवा कोणत्याही देशाद्वारे जारी करण्यात आलेल्या स्टेपल वीजाचा विरोध करतात. यामागील कारण असे की, स्टेपल वीजा देशाच्या अस्मितेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करतो. त्याचसोबत सुरक्षिततेच्या दृष्टीने हे फार धोकादायक आहे. (Staple Visa)

हेही वाचा- Juice Jacking Scam संदर्भात आरबीआयने जारी केला अलर्ट

खरंतर देशाच्या विरोधात कट रचणारी लोक स्टेपल वीजाच्या माध्यमातून शत्रू देशात येऊ शकतात आणि जाऊ सुद्धा शकतात. याचा कोणताही रेकॉर्ड ठेवला जात नाही. उदाहरणार्थ, जर एखादा व्यक्ती चीनसोबत मिळून भारताच्या विरोधात कट रचत असेल तर तो स्टेपल वीजाच्या माध्यमातून चीन मध्ये येऊ-जाऊ शकतो. याचा पुरावा म्हणून त्याचा रेकॉर्ड सुद्धा ठेवला जात नाही.

वास्तविकरित्या स्टेपल वीजा धारक जेव्हा आपले काम संपवून आपल्या देशात परतात तेव्हा पासपोर्ट सोबत मिळणाऱ्या कागदासारख्या तिकिटाला फाडले जाते. त्यावर प्रवासाचे कारण आणि स्टॅम्प असतो. त्याचसोबत त्या देशात एन्ट्री आणि एक्झिट पासला सुद्धा फाडले जाते. त्यानंतर अशा प्रकारे प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या पासपोर्टवर याची कोणतीच माहिती राहत नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.