Home » श्रीलंकेत महागाईचा दर ७० टक्क्यांवर तर खाद्यांच्या किंमतीत ८०% नी वाढ

श्रीलंकेत महागाईचा दर ७० टक्क्यांवर तर खाद्यांच्या किंमतीत ८०% नी वाढ

by Team Gajawaja
0 comment
Sri Lanka Inflation Rate
Share

आर्थिक संकटाशी सामना करणाऱ्या श्रीलंकेत महागाई दर ऑगस्ट महिन्यात वाढून ७०.२ टक्क्यांवर पोहचला. एका महिन्यापूर्वी तोच ६६.७ टक्के होता. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती मिळाली आहे. ऑगस्टमध्ये नॅशनल कंज्युमर प्राइस इंडेक्स (NCPI) आधारित वस्तू आणि सेवांच्या किंमतीत २.५ टक्क्यांची वाढ झाली. खाद्य वस्तूंच्या किंमतीत १.७ टक्के आणि खाद्य पदार्थांशिवायच्या वस्तूंत किंमतीत ३.२ टक्क्यांची वाढ झाली. (Sri Lanka Inflation Rate)

खाद्य किंमतीत जुलैच्या ८२.५ टक्क्यांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये ८४.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला विजेच्या दरांबद्दल संशोधन करण्यात आले होते. त्यामुळे खाद्य तेलाच्या किंमतीत वाढ होण्यासह ऑगस्टमध्ये ग्राहकांच्या किंमतीच्या राष्ट्रीय सुचांकामध्ये सुद्धा वाढ झाली.

सप्टेंबर महिन्यात उच्च स्तरावर पोहचल्यानंतर खाली येण्याची अपेक्षा
चलनवाढीच्या अनुमानाच्या आधारावर श्रीलंकेतील केंद्रीय बँकेने गेल्या महिन्यात असे म्हटले होते की, जग जागतिक वस्तूंच्या किंमती स्थिर राहिल्यास तर किंमती सप्टेंबर महिन्यात उच्च स्तरावर पोहचल्यानंतर खाली येण्यास सुरुवात होईल.

Sri Lanka Inflation Rate
Sri Lanka Inflation Rate

भारताने दिले सर्वाधिक कर्ज
दरम्यान, वर्ष २०२२ च्या दरम्यान भारताने आपला शेजारील देशाला ३३.७ कोटी डॉलरचे कर्ज दिले आहे. एका रिपोर्ट्सनुसार, भारतानंतर आशियाई विकास बँक (ADB) च्या या काळात श्रीलंकेला ३६ कोटी डॉलरचे कर्ज देऊन दुसरा सर्वाधिक मोठा कर्जदाता झाला आहे. कोरोनाच्या संकटापूर्वी श्रीलंका अमेरिकीच्या डॉलरसह अन्य परदेशी करेंसीसाठी पर्यटनावर अधिक निर्भर होता.

दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या श्रीलंकेत पशूंचा चारा सुद्धा खुप प्रमाणात कमी झाला आहे. याला सरकारच्या अस्थिर नीतिंचे परिणाम असल्याचे मानले जात आहे. गेल्या २५ जूनला कंज्युमर अफेयर अथॉरिटीने पशूंना भात खाऊ घालण्यावर पूर्णपणे कठोर बंदी घातली होती. तर दुसऱ्या बाजूला स्वदेशी तांदूळ सध्या २२० रुपये किलोने विक्री केला जात आहे. अशातच मोठ्या संख्येने लोक आता सुद्धा आयत केलेला तांदुळ खात आहे. जाणकारांचे असे म्हणणे आहे की, सरकारने जे भात पशूंना खायला घालण्यास बंदी घातली आहे त्यावरुन तांदूळ महाग होईल आणि श्रीलंकेतील सामान्यांचे आर्थिक बजेट ही कोलमडले जाईल. (Sri Lanka Inflation Rate)

हे देखील वाचा- आर्थिक मंदीचा सामना करतायत जगातील ‘हे’ दिग्गज देश, भारतावर होणार का परिणाम?

तर श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना हा सर्वाधिक वाईट आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. जेवणासह इंधनाची कमतरता, वाढलेल्या किंमती आणि वीज कपातीमुळे मोठ्या संख्येत नागरिक प्रभावित झाले. त्यामुळेच देशात विविध ठिकाणी जोरदार आंदोलन ही झाली. माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर रानिल विक्रमसिंगे हे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान झाले. राजकीय संकट जवळजवळ दूर झाल्यानंतर आता सुद्धा देशातील अन्य संकट अद्याप ही दूर होण्याचे नाव घेतच नाही आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.