Home » थंड वाळवंट म्हणून ओळखला जातो ‘स्पिती जिल्हा’

थंड वाळवंट म्हणून ओळखला जातो ‘स्पिती जिल्हा’

by Team Gajawaja
0 comment
Spiti District
Share

स्विझरलॅंड या देशात पर्यटनासाठी जाण्याचे स्वप्न बहुतांश नागरिकांचे असते.  आपल्या बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांचे शुटींगही या स्विझरलॅंडच्या बर्फाच्छादित डोंगरांवर झाले आहे.  मात्र आपल्या भारतातही असेच, किंबहुना स्विझरलॅंडपेक्षाही सुंदर असे पर्यटन स्थळ आहे, हे सांगितल्यास कुणाचा विश्वास बसणार नाही.  पण भारतात स्विझरलॅंडपेक्षाही सुंदर असलेले पर्यटन स्थळ आहे.  हिमाचल प्रदेशमधील स्पिती व्हॅलीला (Spiti District) प्रती स्विझरलॅंड म्हणण्यात येते.  बर्फाचा वाळवंट असेही या व्हॅलीचे नाव आहे. अतिशय थंड असलेल्या या भागात काही वर्षापूर्वी फक्त मार्च ते मे महिन्यादरम्यान पर्यटन व्हायचे.  मात्र आता स्पिती व्हॅलीच्या सौदर्याची माहिती जसजशी मिळू लागली, तसे तेथील पर्यटनही वाढले आहे.  थंडीच्या दिवसांत येथील हिमशिखरे बघण्याचा आनंद घेण्यासाठी आता भारतातूनच नाही तर परदेशातूनही मोठ्या संख्येनं पर्यटक येत आहेत.  

हिमाचल प्रदेशमधील स्पिती व्हॅलीला (Spiti District) भेट देणा-या पर्यटकांची संख्या वाढली आहे. स्पिती जिल्हा हा थंड वाळवंट म्हणून ओळखला गेला आहे.  कारण येथे पावसाचे प्रमाण कमी आहे.  वर्षाचे बहुधा सर्वच वेळ येथे बर्फ बघायला मिळतो.  नोव्हेंबर ते जानेवारी या काळात बर्फाचे प्रमाण वाढते.  पारा उणे होतो.  मात्र तरीही या स्पिती व्हॅलीमध्ये थंडीच्या दिवसात पर्यटन अधिक चांगल्या पद्धतीने होत आहे.   

हिमाचल प्रदेशच्या उत्तर-पूर्व वसलेले स्पिती हे शहर आहे.  तलाव,  बर्फाच्छादित पर्वत, बौद्ध मठ,  आणि बगिचे हे येथील वैशिष्ट आहे.  स्पितीच्या काही गावांमध्ये तापमान –16°C पर्यंत घसरते.  यामुळे काही वर्षापूर्वी या दरम्यान या व्हॅलीमध्ये तुरळक पर्यटक येत असत.  पण स्पिटी व्हॅलीच्या (Spiti District) पर्वतरांगा बर्फाच्या आवरणाखाली गेल्या की, त्यांना बघणे हा नितांत सुंदर अनुभव असतो.  स्पितीच्या या सौदर्याची माहिती झाल्यावर आता हिवाळ्यात पर्यटकांचा जोर अधिक वाढला आहे.  या थंड मौसममध्ये स्पिती व्हॅली पर्यटकांसाठी स्वर्गापेक्षाही सुंदर झालेली असते.  विशेषतः ट्रॅकींगची आवड असणारे अनेक तरुण स्पिती व्हॅलीला भेट देतात. स्पिती व्हॅलीच्या चारही बाजूंनी हिमालय आहे.  येथे वर्षातून फक्त 250 दिवस सूर्यप्रकाश मिळतो.  कायम बर्फाच्या आवरणाखाली राहणा-या या खोऱ्याचे सौंदर्य सुखावणारे आहे.

स्पिती व्हॅलीमध्ये (Spiti District) सर्वात आकर्षण कुठल्या स्थळाबद्दल आहे, तर ते स्थळ म्हणजे, चंद्रताल तलाव.  या तलावाबाबत असलेल्या अनेक गुढ कथा पर्यटकांना आकर्षित करतात. या चंद्रताल तलावामध्ये स्नान करण्यासाठी प्रत्यक्ष देवताही येतात असे सांगण्यात येते.  तसेच या चंद्रताल तलावाच्या अतिशय दुर्गम भागात अनेक साधू तपश्चर्येसाठी बसलेले आहेत.  त्यांच्या गुहा या अंत्यत चिंचोळ्या असून अलिकडे या गुहा बघण्यासाठीही पर्यटक मोठ्या सख्येनं चंद्रतालची यात्रा करतात.  या तलावाचा आकार चंद्रासारखा आहे. चंद्रतालचे पाणी दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी रंग बदलत असते. चंद्रताल तलावाची गणना हिमालयातील सर्वात सुंदर तलावांमध्ये केली जाते.  हा तलाव 4300 मीटर उंचीवर आहे.  स्पिती व्हॅलीमधील चंद्रा नदीचे उगमस्थान हे याच चंद्रताल तलावापासून आहे.  साहसी ट्रेकींगची  आवड असलेल्या अनेक पर्यटकांना हा तलाव आकर्षित करतो.

यापाठोपाठ स्मिती व्हॅलीतील (Spiti District) धनखर गोम्पा मठही पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. ज्यांना शांतता हवी आहे, ध्यानधारणा करायची आहे, असे अनेक पर्यटक या मठात जाऊन राहणे पसंत करतात.  हा मठ समुद्रसपाटीपासून 1277 फूट उंचीवर आहे.  हा मठ साधारण  एक हजार वर्षांहून अधिक जुना असल्याचे सांगितले जाते.  मठ काझा आणि ताबो यांच्यामध्ये एका खडकावर आहे. येथून स्पिती नदीचे अप्रतिम दृश्य पाहता येते. या मठात वैरोचरणमूर्ती असून चार दिशांना बुद्धाच्या चार मूर्ती विराजमान आहेत.  तसेच या मठात प्राचीन चित्रे, भित्तिचित्रे, ग्रंथही आहेत.  त्यांचा अभ्यास करण्यासाठीही अनेक पर्यटक जातात.  

============

हे देखील वाचा : सणासुदीला अशाप्रकारचे कुकिंग ऑइल वापरण्याआधी ‘हे’ वाचा

============

स्पितीमधील पिन व्हॅली (Spiti District) नॅशनल पार्क हे निसर्ग प्रेमींसाठी नंदनवन आहे.  20,000 फूट उंचीवर असलेल्या पिन व्हॅली पार्कची स्थापना 1987 मध्ये झाली.   वर्षाच्या बहुतेक महिन्यांत येथे बर्फ असतो.  येथील पक्षी आणि निसर्ग बघण्यासाठी पर्यटक आवर्जून जातात.  स्पिती व्हॅलीमधील तिबेटी बौद्ध आणि हिंदू यांच्यासाठी त्रिलोकीनाथ मंदिर महत्त्वाचे आहे.  तुंडे गावात एका खडकावर हे मंदिर आहे.  या मंदिरात होणारा पौडी उत्सव हा प्रसिद्ध आहे.  याशिवाय अलिकडे स्पिती व्हॅलीमधील किब्बर या गावाची लोकप्रियता वाढली आहे.  किब्बर हे 4270 मीटर उंचीवर वसलेले एक छोटेसे गाव आहे. नयनरम्य पर्वत आणि ओसाड लँडस्केपने वेढलेले गाव असून हे गाव जगातील सर्वात उंच गाव असल्याचा दावा काही नागरिक करतात.  येथील बौद्ध मठ आणि वन्यजीव अभयारण्या प्रसिद्ध आहे.   

स्पिती व्हॅलीचे तपमान 8°C आणि 15°C दरम्यान असते. बर्फाच्छादित रस्ते, स्वच्छ आकाश,  हिमालयाच्या रांगा बघण्याची ज्यांना आवड आहे, असे पर्यटक नक्कीच स्पिती व्हॅलीली भेट देऊ शकतात.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.