आजकाल टॅटू काढण्याचा ट्रेंन्ड अधिक वाढला आहे. खासकरुन तरुणांमध्ये टॅटू काढण्याची आवड फार दिसून येते. लोक फॅशन, स्टाइल आणि सुंदर दिसण्यासाठी शरिरावर टॅटू काढतात. बहुतांश लोक टॅटू सुद्धा वेगवेगळ्या प्रकाराने काढतात. काही जण आपल्या घरातील मंडळींची नावं, स्वत:चे नाव, प्रेयसी-प्रियकराचे नाव किंवा एखादी स्पेशल तारीख. मात्र धार्मिक टॅटूमुळे (Spiritual tattoo) तुमच्या आयुष्यावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतात. याचा थेट परिणाम काही वेळेस तुमच्या मनावर, विचारांवर आणि आयुष्यावर ही होतो. मात्र ज्योतिष नुसार टॅटूचा संबंध फक्त स्टाइल आणि फॅशनशी संबंधित नाही आहे. तर याचा प्रभाव विविध पद्धतीने व्यक्तीच्या आयुष्यावर ही पडतो. अशातच जर तुम्ही एखादा धार्मिक टॅटू काढत असाल तर त्याचा प्रभाव तुमचे भाग्य आणि ग्रहांवर सुद्धा पडतो. त्यामुळे धार्मिक टॅटू काढताना काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्वाचे असते.
धार्मिक टॅटू संबंधित कोणताही एक्सपेरिमेंट करु नका
जर तुम्ही तुमच्या शरिरावर धार्मिक टॅटू काढणार असाल तर त्या संबंधित कोणताही नवा एक्सपेरिमेंट करु नका. धार्मिक टॅटू जसे की, स्वस्तिक किंवा ओम किंवा कोणत्याही मंत्राचा टॅटू काढताना लक्षात असू द्या की, त्याची आकृती योग्य असली पाहिजे. लिहिले गेलेले मंत्र सुद्धा योग्य असले पाहिजेत. चुकीची आकृती असेल तर निगेटिव्हिटी वाढते आणि याचा थेट प्रभाव तुमच्या जीवनावर पडू शकतो.
धार्मिक टॅटू संबंधित पुढील काही गोष्टी लक्षात ठेवा
शरिरावर धार्मिक टॅटू काढताना नेहमीच लक्षात ठेवा की, धार्मिक टॅटू (Spiritual tattoo) शरिरावरील अशा ठिकाणी काढू नये जेथे अस्वच्छता असेल. त्यामुळे तो तुम्ही हाताचा तळहातावर धार्मिक टॅटू काढू नका. जसे की धार्मिक चिन्ह, मंत्र किंवा देवाचे चित्र. या व्यतिरिक्त धार्मिक टॅटू पायांवर सुद्धा काढू नका. असे मानले जाते की, महिलांनी आपल्या उजव्या हातावर आणि पुरुषांनी आपल्या डाव्या हातावर टॅटू काढू नये.
हे देखील वाचा- श्री कृष्णाशी संबंधित आहे ‘या’ मंदिराचा इतिहास, जाणून घ्या अधिक
शरिरातील या ठिकाणांवर काढा धार्मिक टॅटू
धार्मिक टॅटू शरीरावर अशा ठिकाणी काढू नका जेथे अस्वच्छता असेल किंवा अशुद्ध गोष्टींचा तेथे स्पर्श होणार नाही. धार्मिक टॅटू हा तुम्ही हात, कंबर, पाठ सारख्या ठिकाणी काढू शकता. शरिरावरील योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने धार्मिक टॅटू काढल्यास व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि प्रत्येक क्षेत्रात यश ही मिळते. त्याचसोबत आयुष्यात सकारात्मक उर्जेचा प्रभाव ही वाढतो.