सोशल मीडियात सध्या कोणताही सेलिब्रेटी असो तो आपला कधी ना कधी एखादा बालपणीचा फोटो किंवा त्याच्या आठवणी शेअर करत असतो. अशातच सध्या साउथ सिनेमातील एक अभिनेत्री हिचा एक फोटो खुप व्हायरल होत आहे. तिला ओळखणे सुद्धा त्यामध्ये मुश्किल होईल. आज साउथ सिनेमांवर आपले अधिराज्य करणाऱ्या या अभिनेत्रीचा कॉलेजमधील फोटो व्हायरल झाला आहे. (South Indian Actress)
खरंतर फोटोत तिचे अगदी साधे राहणीमान दिसून येते. पण आताचा तिचा लूक पाहिला तर फोटोतील अभिनेत्री म्हणजेच सामंथा रुथ प्रभुच आहे का असा प्रश्न तुम्हाला पडेल. सामंथाने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. परंतु आज ती यशाच्या शिखरावर जाऊन पोहचली आहे. तिने ज्युनियर एनटीआर, अल्लू अर्जुन आणि नानी सारख्या स्टार्स सोबत काम करत हिट सिनेमे सुद्धा दिले आहेत. तिला हे कलाकार आपला लकी चार्म्स मानतात.

आज ग्लॅमर आणि अभिनयाच्या जगात मोठे नाव कमावणारी सामंथाने आपल्या करियरची सुरुवात मॉडलिंग पासून केली होती. आज भले तिला खुप प्रसिद्धी मिळालीय. पण एक काळ असा होता जेव्हा तिच्याकडे जेवणासाठी सुद्धा पैसे नसायचे. अभिनेत्रीने एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, ती अभ्यासात खुप हुशार होती.तिला पुढे शिक्षण ही घ्यायचे होते. पण परिस्थिती तशी नव्हती. सामंथाला तिचे आई-वडिल नेहमीच म्हणायचे की, तु खुप शिक आणि यामध्येच तु काहीतरी मोठं करशील. पण घराची आर्थिक स्थिती बिकट असल्याने तिला शिक्षण सोडावे लागते. सुरुवाीला तिने लहान-मोठ्या नोकऱ्या केल्या. पहिला सिनेमा मिळण्याआधी तिची स्थिती ऐवढी वाईट होती की, तिच्याकडे जेवणासाठी सुद्धा पैसे नसायचे.(South Indian Actress)
हेही वाचा- तारक मेहतासाठी जेठालालच्या भुमिकेसाठी दिलीप जोशी नव्हे तर हा बडा कलाकार होता पहिली पसंद
मॉडलिंगपासून आपल्या करियरची सुरुवात तिने केली. त्यानंतर पहिला सिनेमा मिळल्यानंतर तिचे नशीबच पालटले. सामंथा रुथ प्रभू आज भारतातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या पर्सनल लाइफ बद्दल बोलायचे झाल्यास २०१७ मध्ये सामंथाने साउथ आणि हिंदी सिनेमातील नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य याच्यासोबत लग्न केले होते. मात्र या दोघांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि २०२१ मध्ये ते एकमेकांपासून विभक्त झाले.सामंथा आता साउथसह हिंदी प्रेक्षकांमध्ये ही खुप प्रसिद्ध झाली आहे. काही बॉलिवूडचे निर्माते तिला आपल्या सिनेमात कास्ट करण्यासाठी ही विचारतात.