Home » आयुष्यात Soulmate हवाच…

आयुष्यात Soulmate हवाच…

सोलमेट म्हणजे असा व्यक्ती जो तुमच्या आयुष्यात येतो आणि तुम्ही त्याच्याकडून अशा काही गोष्टी शिकता ज्याची तुम्हाला खरचं गरज असते.

by Team Gajawaja
0 comment
soulmate
Share

मित्र, परिवारातील एखादा सदस्य किंवा तुमचा पार्टनर यापैकी कोणीही तुमचा सोलमेट असू शकतो. सोलमेट म्हणजे असा व्यक्ती जो तुमच्या आयुष्यात येतो आणि तुम्ही त्याच्याकडून अशा काही गोष्टी शिकता ज्याची तुम्हाला खरचं गरज असते. जेव्हा तुम्ही त्या गोष्टी शिकता आणि आयुष्यात पुढे जात राहता तेव्हा त्याचे मिशन पूर्ण होते. आपण याबद्दल असे बोलू शकतो की, सोलमेट म्हणजेच असा व्यक्ती जो तुम्हाला आयुष्यात खचून न जाता यशाच्या मार्गावर जाण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देत राहतो. तुम्हाला तो यासाठी वाट्टेल ती मदत करायला तयार असतो. तर लाइफपार्टनर हा एक असा व्यक्ती आहे ज्याच्यासोबत तुम्हाला संपूर्ण आयुष्य घालवावे असे वाटते. (Soulmate)

A low of attraction च्या मते, एका उत्तम आयुष्यासाठी आयुष्यात या दोघांची गरज असणे फार महत्त्वाचे अशते. तर जाणून घेऊयात सोलमेट आणि लाइफपार्टनरमध्ये नेमका फरक काय आहे.

आयुष्यभराची साथ
सिटीमॅग्नीच्या मते, आयुष्यभराचा पार्टनर तुमच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतो. तो तुमच्यासाठी नेहमी उभा असतो. तो तुम्हाला आनंदित ठेवण्यासाठी, आयुष्यात पुढे जाण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देतो. त्यासाठी तो काही रिस्क सुद्धा घेतो. तर सोलमेट तुमच्याशी भावनात्मक आणि आध्यात्मिक रुपात जोडला जातो. तो तुम्हाला वाईट काळातून बाहेर काढणे आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी कोणत्याही स्वार्थाशिवाय एकमेकांची मदत करतो. तसेच तुम्हाला काही ना काही शिकवत असतो.

एक वेगळ्या प्रकारची भावना
सोलमेट सोबत तुम्ही हृदयाने आणि मेंदूने जोडले जाता. ज्यामध्ये व्यक्ती चांगल्या, वाईट गोष्टींमधून काही ना काही शिकतो. मात्र जेव्हा सोलमेट काही शिकवण्याचे उद्देश पूर्ण होतो तेव्हा त्यांच्यामधील नाते अधिकच आनंदाने भरुन जाते. हे नाते खासकरुन भावनात्मक रुपात अधिक घट्ट असते. जेव्हा तुम्हा एखाद्यासोबत कंम्फर्टेबल होता तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत आयुष्य जगण्याचा निर्णय घेता. एकमेकांच्या सुख-दु:खात उभे राहता तेव्हा त्यामध्ये आयुष्यभर सोबत राहणार पार्टनर तुम्हाला मिळतो.

आध्यात्मिक असते नाते
सोलमेटचे तुमच्यासोबतचे नाते सखोल असते. जो कोणीही असेल, तुमचा मित्र, परिवारातील एखादा सदस्य किंवा लाइफपार्टन, हे नाते ऐवढे घट्ट असते की, तुम्ही एकमेकांच्या गरजा, इच्छा आणि विचार एकमेकांना शेअरकेल्याशिवाय ही समजून जाता. असे नाते आध्यात्मिक असते. (Soulmate)

इमोशनल कनेक्शन आणि प्रॅक्टिकल सपोर्ट
सोलमेट सोबत तुम्ही भावनात्मक रुपात जोडले जाता. यामध्ये एकमेकांना वेळोवेळी समजून घेतले जाते. तर लाइफपार्टनर्समध्ये प्रॅक्टिकल सपोर्ट, जबाबदाऱ्या येतात.

हेही वाचा- नव्या रिलेशनशिपमध्ये ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

लाइफपार्टनर सोलमेट्स होऊ शकतात का?
सर्वसामान्यपणे हे प्रत्येकाच्या बाबतीत शक्य नसते. मात्र जर तुमचा लाइफपार्टनरच तुमचा सोलमेट झाला तर तुम्ही आयुष्यात नेहमीच सकारात्मक पद्धतीने आयुष्य जगू शकता. मात्र त्यांच्यामध्ये विचारांचे मतभेद असू शकतात. परंतु एकमेकांसोबत शांतीने, एकमेकांना नेहमीच सावरत आयुष्य जगले तर लाइफपार्टनर हा तुमचा सोलमेट नक्कीच होऊ शकतो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.