Home » सोमालियातील हॉटेलवर हल्ला करणाऱ्या दहशतवादी संघटनेला नक्की काय हवंय ?

सोमालियातील हॉटेलवर हल्ला करणाऱ्या दहशतवादी संघटनेला नक्की काय हवंय ?

by Team Gajawaja
0 comment
Somalia terror attack
Share

Somalia terror attack- सोमालियाची राजधानी मोगादिशू मध्ये शुक्रवारी रात्री उशिरा हॉटेल हयातमध्ये दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामी दहशतवादी संघटना अल-शबाब यांनी घेतली आहे. मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्याप्रमाणेच दहशतवाद्यांनी या ठिकाणीसुद्धा तेच केले. दहशतवाद्यांनी प्रथम हॉटेलच्या बाहेर उभ्या असलेल्या दोन गाड्यांमध्ये बॉम्ब स्फोट घडवून आणला आणि त्यानंतर हॉटेलमध्ये घुसून फायरिंग सुरु केली. यामध्ये १० हून अधिक लोकांचा मृत्यू तर काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती दिली गेली आहे.

या हल्ल्यात मोगदिशूचे गुप्तचर प्रमुख मुहीदीन मोहम्मद हे सुद्धा जखमी झाले आहेत. काही रिपोर्ट्सनुसार असे मानले जातेय की, त्यांनाच दहशतवादी टार्गेट करत असल्याची शक्यता होती. त्याचसोबत दहशतवादी संघटनेचे मुख्य उद्दिष्ट हे सोमिलिया मधील सरकारला संपवायचे आहे. तर सोमालिया हॉटेलवर हल्ला करणाऱ्या दहशतवादी संघटनेला नक्की काय हवयं? त्याबद्दल अधिक.

अल-शबाबचा प्रमुख कोण?
अल-शबाब, सोमालिया मधील एक दहशतवादी संघटना आहे. जी २००६ मध्ये अस्तित्वात आली. अल-शबाबचे संपूर्ण नाव हरकत अल-शबाब अल-मुजाहिद्दीन आहे. अल शबाब हा एक अरबी भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ ‘द एज ऑफ युथ किंवा प्रगतीचे युग’. या दहशतवादी संघटनेचा अहमद उमर हा प्रमुख आहे. २०१४ पासून या संघटनेची कमान उमर याच्या हातीच आहे. ही दहशतवादी संघटना मुख्यत: सोमालिया व्यतिरिक्त इथियोपिया आणि केनियामध्ये सक्रिय आहे. याचे नेटवर्क अफ्रिकेपासून युरोप आणि अमेरिकेपर्यंत पोहचले आहे.

कसा उदयास आली होती ही संघटना?
अल-सबाब वहाबी इस्लम धर्माला मानतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दहशतवादी संघटनेचा मुख्य उद्देष सोमालियातील सरकारला संपवायचे आहे. जे २०१७ मध्ये बनवले आहे. अमेरिकेने २००८ मध्ये अल शबाबला दहशतवादी संघटना घोषित केले होते. तर २०१२ मध्ये अलकायदामध्ये याचे विलिकरण झाले होते.

Somalia terror attack
Somalia terror attack

या दहशतवादी संघटेचा उदय हा २००६ मध्ये झाला होता. मोगादिशू शहर तेव्हा युनियन ऑफ इस्लामिक कोर्ट्स यांच्या ताब्यात होते. ती शरिया न्यायालयांची एक संघटना होती ज्याचे प्रमुख होता शरीफ शेख अहमद. तर २००६ मध्ये इथिपोपियाच्या सेनेने युनियन ऑफ इस्लामिक कोर्ट्सला हरवले आणि तेव्हा दहशतवादी संघटना अल शबाब स्थापन झाला. ती युनियन ऑफ इस्लामिक कोर्ट्सचाच एक कट्टकपंथी ब्रँन्च आहे.

किती भयंकर आहे ही संघटना?
अल शबाब ही दहशतवादी संघटना जगातील सर्वाधिक भयंकर असल्याचे मानले जाते. याचे नाते पाकिस्तानातील दहशतवादी संघटना अलकायदा, नाइजेरियातील बोको हरम आणि आयएसआयएस सारख्या संघटनेसोबत आहे. या संघटनेत अत्यंत भयानक आणि खतरनाक दहशतवाद्यांचा समावेश आहे. यांच्यामधील काही दहशतवाद्यांवर कोटी रुपयांचे बक्षिसं सुद्धा घोषित केली आहेत. हे असे दहशतवादी आहेत जे आत्मघाती हल्ले करण्यासाठी नेहमीच तयार असतात.आपल्या मुख्य उद्देषासाठी ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात.(Somalia terror attack)

हे देखील वाचा- अफगाणिस्तान मधील ‘या’ महिलांमुळे देशातील स्रियांचे बदलले आयुष्य

अल-शबाब संघटनेने केलेले मोठे दहशतवादी हल्ले
२०१०-
युगांडा मधील कंपाल मध्ये हल्ला, ७४ जणांचा मृत्यू
२०१३- केनियातील नैरोबी मध्ये शॉपिंग मॉलमध्ये हल्ला, ६७ जणांचा मृत्यू
२०१५- केनियामधील युनिव्हर्सिटीवर हल्ला, १४८ विद्यार्थ्यांचा मृत्यू
२०१६- केनियातील सैन्य शिबिरावर हल्ला, १८० जवानांचा मृत्यू
२०१७- मोहादिशू शहरात बॉम्ब स्फोट, २७५ जणांचा बळी
२०१९- मोहिदिशूतील पोलीस स्थानकात स्फोट, ८५ लोकांचा मृत्यू

अमेरिका समर्थित सरकारचा विरोध
१९९१ मध्ये सईद बर्रे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर सोमालिया सातत्याने स्थिर सरकारसाठी संघर्ष करत आहे. २००४ नंतर सोमालियामध्ये ट्रांजिशनल फेडरेशनचे सरकार आहे. याला अमेरिका समर्थन देते. २००६ च्या सुरुवातीला सोमाली इस्लामिक कोर्ट काउंसिलने दक्षिण सोमालियातील काही ठिकाणांवर ताबा मिळवला होता. अल शबाब याच काउंसिलचा अतिरेकी गट आहे. ज्यांनी २००६ पासून सोमालियातील अमेरिकेचे समर्थन असलेल्या अस्थिर सरकारच्या विरोधात आपला आवाज उठवला आहे. नुकत्याच अमेरिकेने केलेल्या एअर स्ट्राइकच्या माध्यमातून अल शबाबच्या १२ दहशतवाद्यांना ठार मारले होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.