Solo Traveling Tips : परिवारासोबत फिरायला जाणे आणि एकट्याने ट्रिपला जाणे यामध्ये फार मोठा फरक आहे. काहीवेळेस असे होते आपल्याला एकट्याने प्रवास करावा लागतो. अशातच तुम्ही एकट्याने प्रवास करणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
याशिवाय प्रवासावेळी असे होते की, जेथे तुम्ही प्रवास करतायत तेथील भाषा बदलली जाते किंवा संस्कृती वेगळी असते. अशातच काही अडचणींचा सामना करावा लागू शकते. पण काहींना एकट्याने प्रवास करणे फार आवडते. जाणून घेऊया एकट्याने प्रवास करताना काय काळजी घेतली याबद्दल सविस्तर…..
प्लॅनिंग करा
तुम्हाला अचानक एकट्याने प्रवास करावा लागल्यास तर त्यासंदर्भात व्यवस्थितीत प्लॅनिंग करा. सर्वप्रथम जेथे तुम्ही जाणार आहेत त्या ठिकाणची सर्व माहिती घ्या. तेथील प्रवासाचे साधन काय आहे, कसे पोहोचायचे अशा काही गोष्टींबद्दलही माहिती मिळवा.यानंतरच एकट्याने प्रवास करा.
मर्यादित सामान घेऊन जा
एकट्याने प्रवास करताना तुमच्यासोबत गरजेऐवढेच सामान सोबत घेऊन जा. अन्यथा काही अडचणींचा सामना करावा लागू शकते.
डायरीमध्ये फोन क्रमांक लिहून ठेवा
बहुतांशजण फोन क्रमांक मोबाइलमध्ये सेव्ह करून ठेवतात. पण प्रत्येकवेळी असे करणे योग्य नव्हे. तुम्ही एकट्याने प्रवास करत असाल तर काही आपत्कालीन क्रमांक एका डायरीत लिहून ठेवा. जेणेकरुन तुम्हाला एखादी समस्या उद्भवल्यास किंवा फोन बंद पडल्यास तुम्ही त्या क्रमांकावर फोन करू शकता. (Solo Traveling Tips)
अधिक रोख रक्कम ठेवू नका
प्रवास करताना आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अधिक रोख रक्कम सोबत ठेवू नका. ऑनलाइन पेमेंटचा पर्याय उपलब्ध असल्यास त्याचा वापर करा.