मोबाईल, लॅपटॉप, सोशल मिडिया, टिव्ही, फ्रीज, एसी, कुलर, पंखा आणि विज पुरवठाही. आपण सर्वच यावर अवलंबून आहोत. या सर्वांचा पुरवठा एकसाथ थांबला तर काय होईल, हा विचार कोणी केला तरी थरकाप होईल. सर्व जगात हाहाकार उडेल. सर्व व्यवहार ठप्प होतील. कोणाला संपर्क साधता येणार नाही. विज पुरवठा बंद झाल्यास सर्वत्र अंधार होईल. कदाचित यापेक्षाही कल्पना करु शकता येणार नाहीत, असे परिणाम होतील. पण ही सर्व जंत्री कशासाठी. तर पृथ्वीवर काही तासामध्ये येऊ पहाणा-या एका संकटासाठी आहे. पृथ्वीवर गेल्या दशकातील सर्वात मोठे सौर वादळ केव्हाही धडकण्याची शक्यता असल्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. हे वादळ एवढं भयानक आहे की यामुळे सर्व व्यवस्थाच बंद होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसातच हे वादळ पृथ्वीवर धडकण्याची शक्यता असल्यानं सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. (Solar storm)
ऑक्टोबर 2024 च्या पंधरवड्यातच सौर वादळाचा इशारा देण्यात आला आहे. पृथ्वीवर गेल्या काही वर्षातील सर्वात मोठे सौर वादळ केव्हाही येणार असल्याचा हा इशारा देतांना शास्त्रज्ञांनी त्याचे मोठे दुरगामी परिणार होणार असल्याचे सांगितले आहे. मोबाईल, कॉम्प्युटर आणि कम्युनिकेशन सिस्टीम यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांना या सौर वादळाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. अशा प्रकारच्या सौर वादळाचा फटका पृथ्वीला बसला तर काय होईल आणि भारताची त्यात किती मोठी हानी होईल, याचा अंदाज सध्या शास्त्रज्ञ काढत आहेत. यासाठी एक नकाशा तयार करण्यात आला असून लडाखमधून भारतावरील सौर क्रियाकलापांचे निरीक्षण करण्यात येत आहे. हे सौर वादळ नेमके कशामुळे येते हेही स्पष्ट करण्यात आले आहे. (International News)
शास्त्रज्ञांच्या मतानुसार सूर्याच्या पृष्ठभागावरून दोन मोठ्या सौर ज्वाला बाहेर पडतात. त्यांना कोरोनल मास इजेक्शन म्हणजेच CME म्हणतात. या कोरोनल मास इजेक्शन पृथ्वीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. शास्त्रज्ञांनी त्यांना X7 आणि X9 अशी नावे दिली आहेत. हे सोलर फ्लेअर्स खूप महत्त्वाचे मानले जातात. X9 फ्लेअर हा गेल्या सात वर्षांतील सूर्यापासून निघणारा सर्वात शक्तिशाली फ्लेअर आहे. यामुळे दक्षिण अटलांटिक आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये तात्पुरते संप्रेषण ठप्प होऊ शकते. सौर वादळात सूर्याद्वारे सूर्यमालेत प्रक्षेपित केलेले कण, ऊर्जा, चुंबकीय क्षेत्र आणि पदार्थ यांचा अचानक मोठा स्फोट होतो. हा स्फोट अंतराळात होतो. आणि त्याची कल्पना करता येणार नाही, एवढा हा भयानक असतो. यातून निर्माण होणारे येणारे सौर वादळ दूरसंचार आणि उपग्रहांमध्ये व्यत्यय आणू शकते. यामुळे सर्वच व्यवहार ठप्प होऊ शकतात. यातील संभाव्य धोके लक्षात घेता यावर भारतीय शास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहेत. (Solar storm)
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोच्या तज्ञांची विशेष टिम यासाठी बनवण्यात आली आहे. हे तज्ञ भारतीय उपग्रहाची विशेष काळजी घेत आहेत. असे सौर वादळ पृथ्वीवर आदळल्यास पहिल्यांदा त्याचा फटका उपग्रहांना बसण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मोठे नुकसान होईल. सर्वच संपर्क यंत्रणा उद्धस्त होण्याची शक्यता आहे. ही व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी काही दिवसांचा नाही तर महिन्यांचा कालावधी जाईल. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी इस्त्रोची टिम भारतीय उपग्रहांच्या ऑपरेटर्ससोबत काम करत आहे. त्याबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे. याबाबत चिंता व्यक्त करणारी बातमी म्हणजे, स्पेस वेदर वेबसाइट आणि अनेक तज्ञांचा असा विश्वास आहे की X9 CME मधील सौर कण 6 किंवा 7 ऑक्टोबर पृथ्वीवर आदळू शकतात. या आठवड्याच्या शेवटी एक मोठे वादळ मॅग्नेटोस्फियरला धडकण्याची शक्यता आहे. (International News)
======
हे देखील वाचा : कंकणाकृती सूर्यग्रहण
======
या वादळाला भूचुंबकीय वादळ किंवा वादळ म्हणतात. G3 वादळामुळे पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांमध्ये किरकोळ व्यत्यय येऊ शकतो आणि कमी-फ्रिक्वेंसी रेडिओ आणि नेव्हिगेशन सिस्टममध्ये समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या वादळासंदर्भात गेल्या 11 वर्षापूर्वीच माहिती देण्यात आली होती. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थाही यासंदर्भात काम करत आहे. नासानं याबाबत 11 वर्षापूर्वी धोक्याचा इशारा दिला होता. नासाच्या शास्त्रज्ञांच्या मते 2025 हे वर्ष पृथ्वीसाठी धोकादायक असणार आहे. यात पृथ्वीवर अनेक भयानक सौर वादळे येण्याची शक्यता आहे, त्यातील एक वादळ ऑक्टोबर महिन्यातच असल्याचे 11 वर्षापूर्वी सांगण्यात आले होते. तेच वादळ आता पृथ्वीकडे सरकत असल्याचा दावा करण्यात आला आहे. (Solar storm)
सई बने