स्वप्नात आपण अनेकदा कुणाला ना कुणाला तरी पाहतो, मग तो माणूस असो किंवा मग प्राणी, देव असो वा भूत. कधी कधी स्वप्न पाहताना आपण खूप घाबरतो. खास करुन लहान मुलांच्या बाबतीत असं अनेकदा घडतं. असं म्हटलं जातं की, आपल्या खऱ्या आयुष्यात जे घडतंय तेच आपण स्वप्नात पाहतो. त्याचबरोबर अनेकदा स्वप्ने आपल्याला आयुष्यात येणाऱ्या आपत्तीची जाणीव करून देतात. प्रत्येक स्वप्नाचा एक वेगळा अर्थ असतो जो आपल्याला काही संकेत देत असतो. काही स्वप्नं येणाऱ्या वाईट दिवसांकडे बोट दाखवतात, तर काही स्वप्नं अशी असतात की, तुमची चांगली वेळ सुरू होणार आहे. जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात पुन्हा पुन्हा साप दिसला तर ते सामान्य स्वप्न नाही, तर त्यामागे एक खास संकेत दडलेले असते. जाणून घेऊया स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात वारंवार साप दिसणे म्हणजे त्याचा नेमका अर्थ काय ?(snakes in dream meaning)

काळा साप दिसणे :
जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात वारंवार काळा साप दिसत असेल तर हे स्वप्न वाईट लक्षण आहे. ड्रीम सायन्सनुसार, या स्वप्नाचा अर्थ असा आहे की येत्या काही दिवसात पैशांशी संबंधित नुकसान होणार आहे किंवा आपल्याला काही गंभीर आजार होऊ शकतात.
सर्पदंश होणे :
असे मानले जाते की जर आपण स्वप्नात पाहिले असेल की आपल्याला साप चावला आहे, तर ही थोडी चिंतेची बाब आहे. म्हणजेच येत्या काळात तुम्हाला एखाद्या भयंकर आजाराने घेरले जाऊ शकते. किंवा शारीरिक त्रास सहन करावा लागू शकतो.
मृत साप दिसणे:
स्वप्नशास्त्रानुसार जर स्वप्नात मृत साप दिसला तर त्याचा अर्थ तुमच्या कुंडलीत राहू दोष आहे. अशा वेळी पंडित किंवा ज्योतिषाच्या मदतीने राहू दोषापासून मुक्त होण्याचे उपाय करावेत.
सापाच्या मागे धावताना दिसणे :
असे म्हटले जाते की, जर तुम्हाला स्वप्नात दिसले की साप आपल्या मागे पळत आहे तर समजून घ्या की खऱ्या आयुष्यातही आपण एखाद्या गोष्टीची भीती बाळगत आहात किंवा आपल्याला न आवडणारे सत्य स्वीकारण्यापासून दूर पळत आहात.

सापांचा कळप दिसणे:
जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात सापांचा कळप किंवा भरपूर साप एकत्र दिसले तर ते एक अशुभ स्वप्न आहे. या स्वप्नाचा अर्थ असा की, येत्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात एक मोठी समस्या येणार आहे.
सापाचे दात दिसणे:
जर तुम्हाला स्वप्नात सापाचे दात दिसले तर याचा सरळ अर्थ असा होतो की, तुमच्या जवळच्या नातेवाईकाकडून किंवा मित्राकडून कोणीतरी तुमचे नुकसान करू शकते. स्वप्नानंतर काही दिवस कोणत्याही कामात विचारपूर्वक पावले टाका.
सापाची हत्या बघणे:
जर तुम्ही स्वप्नात साप मारत असाल तर हे शुभ लक्षण आहे. ड्रीम सायन्सनुसार, या स्वप्नाचा अर्थ असा आहे की आपण आपल्या शत्रूवर विजय मिळवणार आहात. (snakes in dream meaning)
साप जवळ येताना दिसणे:
जर साप स्वप्नात तुमच्याजवळ येत असेल तर ते तुमच्यासाठी अशुभ स्वप्न आहे, कारण त्यातून तुमचे मन इतरत्र भटकत आहे किंवा मन विचलित झाले आहे हे दिसून येते, तर तुम्हाला आपले मन स्थिर करणे आवश्यक आहे.
==============================
हे देखील वाचा: तुम्हाला स्वप्नात मृत व्यक्ती सतत दिसते? तर मग जाणून घ्या याचा अर्थ
==============================
अशा तऱ्हेने स्वप्नात साप पाहण्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. साप पाहणे शुभ आणि अशुभ दोन्ही असू शकते. आपल्याला स्वप्नात साप कोणत्या स्थितीत दिसतो यावर सुद्धा काही गोष्टी अणि संकेत अवलंबून असते. अनेकवेळा स्वप्नात साप पुन्हा पुन्हा दिसतात. राहु जेव्हा आयुष्यात येतो तेव्हा स्वप्नात साप दिसू शकतो, असे ज्योतिषी मानतात. याचा अर्थ राहू तुम्हाला तुमच्या कर्मांचे फळ देणार आहे. हे काहींसाठी शुभ तर कुणासाठी अशुभ ठरू शकते.
(डिस्क्लेमर: वरील लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे. आम्ही असा कोणताही दावा करत नाही की ही सर्व माहिती खरी असेल.)