जगात विविध प्रजातींचे जनावर-किटे, किटक आढळतात. काही जलचर किंवा उभयचर असतात तर काही उडणारे असतात. त्यापैकीच एक म्हणजे साप. सापांच्या सुद्धा विविध प्रजाती जगभरात आढळतात. काही साप पाण्यात राहतात तर काही साप ते तुम्हाला वाळवंट, जंगलांमध्ये दिसतात. सापांना हे सर्वाधिक धोकादायक जीवांच्या कॅटेगरीत गणले जाते. कारण सर्पदंश झाल्यास व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. यामुळेच सापांपासून नेहमीच दूर राहण्यात शहाणपण आहे. मात्र तु्म्हाला माहितेय का, जगात असे एक ठिकाण आहे जेथे चक्क सापांची शेती केली जाते. (Snake farming in China)
सापांची शेती केली जाते हे हैराण करणारे आहे. मात्र तसे केले जाते ते सुद्धा चीन मधील एका गावात. चीनच्या झेजियांग प्रांतातील एका गावात सापांना घरात पाळले जाते. या सापांवरच तेथील लोकांचे आयुष्य अवलंबून आहे. सर्वसामान्यपणे आपल्या पोटापाण्यासाठी लोक विविध उद्योग करतात. मात्र येथे आयुष्य जगण्याची एक वेगळी आणि खतरनाक पद्धत आहे.
चीनच्या झेजियांग प्रांतातील जिसिकियाओ गावात विषारी सापांना पाळले जाते. या गावात सापांची शेती केली जाते. ग्लोबल टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार येथे जवळजवळ 30 लाखांहून अधिक सापांची शेती केली जाते. या गावातील लोकांनी सुद्धा सापांना आपल्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनवला आहे.

Snake farming in China
गावात सापांच्या शेतीची परंपरा फार जुनी असल्याचे सांगितले जाते. असे सांगितले जाते की, पहिल्यांदा 1980 मध्ये या गावात सापाची शेती करण्यात आली होती. म्हणजेच या गावात गेल्या अनेक वर्षांपासून साप पाळण्याचे काम केले जात आहे.
औषधांमध्ये या विषारी सापांचा वापर ही केला जातो. यागावातील जवळजवळ शेकडो लोक तरी सापांची शेती करुन आपले आयु्ष्य जगतात. येथे 100 हून अधिक स्नेक फार्म्स सुद्धा आहेत. त्वचा रोगत बरा करण्यासाठी ते कॅन्सरच्या औषधांमध्ये सापांचा वापर करतात. कोबरा, अजगर, वायपर, रॅटेल सारखे साप ते बिनविषारी सापांची सुद्धा शेती केली जाते. उन्हाळ्याच्या काळात सापांच्या पिल्लांना पाळले जाते आणि थंडीत त्यांची विक्री केली जाते. अमेरिका, रशिया, दक्षिण कोरिया, जर्मनीसह जगातील अन्य देशांत या सापांची विक्री केली जाते. (Snake farming in China)
हेही वाचा- करोडपतींचे गाव- हिवरे बाजार
काही मीडिया रिपोर्ट्नुसार, येथे लाकडाच्या आणि काचेच्या लहान लहान बॉक्समध्ये सापांचे पालन केले जाते. जेव्हा सापांची पिल्ल ही मोठी होतात तेव्हा त्यांना एका जागेतून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी प्लास्टिकच्या बॅगचा वापर केला जातो. जेव्हा त्यांची वाढ होते तेव्हा त्यांची कत्तल करण्यासाठी फार्म हाउसमध्ये नेले जाते. येथे त्यांचे विष काढले जाते. त्यानंतर त्याच्यावर विविध प्रक्रिया केल्या जातात. खरंतर सापाच्या कातडीपासून विविध प्रोडक्ट्स तयार केले जातात. अशा प्रोडक्ट्सची मार्केटमध्ये फार मागणी आहे. याला मोठी रक्कम मिळत असल्याने तेथील लोक सापाची शेती करतात