फोनचा वापर करताना काही गोष्टी अडथळा आणतात. त्यापैकीच एक म्हणजे एखादी व्हिडीओ अथवा गाणी ऐकताना सतत जाहिरात दाखवली जाते. याशिवाय इंटरनेटच्या समस्येचाही सामना करावा लागतो. (Smartphone Tricks)
अशातच जाहिरात पूर्ण संपत नाही तोपर्यंत तुम्ही ती स्किपही करू शकत नाहीत. या जाहिरातींच्या कारणास्तव फोनवर सिनेमा पाहणे, गेम खेळणे अथवा एखादे महत्त्वाचे काम करताना अडथळा येत राहतो. तुमच्यासोबत देखील असेच होते का? यावर सोल्यूशन म्हणून तुम्ही पुढील काही टिप्स नक्की फॉलो करू शकता.
फोनमध्ये दाखवली जाणाऱ्या जाहिराती अशा करा बंद
-यासाठी सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनच्या सेटिंग्समध्ये जावे लागेल. आता येथे गुगलच्या ऑप्शनवर क्लिक करा.
-आता मॅनेज गुगल अकाउंटच्या ऑप्शनवर जा.
-यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डेटा अॅण्ड प्रायव्हसीचा ऑप्शन दिसेल.
-खाली स्क्रोल केल्यानंतर Personalized Adsचे ऑप्शन दाखवले जाईल.
-येथे तुम्ही सहज तपासून पाहू शकता की, कोणत्या-कोणत्या अॅक्टिव्हिटीज ट्रॅक केल्या जात आहे. ज्यामुळे तुम्हाला जाहिरात दाखवल्या जात आहेत.
-Personalized Adsच्या ऑप्शनखाली तुम्हाला My Ad Centreचे ऑप्शन दिसेल.
-यावर क्लिक करा आणि येथे तुम्हाला Personalized Adsचा ऑप्शन दिसेल.
-Personalized Adsचा ऑप्शन OFF करा.
-हे केल्यानंतर फोनच्या सेटिंगमध्ये जा आणि गुगलवर क्लिक करा.
-आता Delete Advertising ID च्या ऑप्शनवर क्लिक करा. येथून डिलिट करा. (Smartphone Tricks)
जाहिरातींपासून असे रहा दूर
या प्रोसेसनंतर तुम्हाला सातत्याने दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातीपासून सुटका मिळेल. यानंतर तुम्ही कोणत्याही जाहिरातीशिवाय ऑनलाईन गेम अथवा व्हिडीओ, गाणी ऐकू शकता. याशिवाय ही सेटिंग फोनमध्ये केल्याने तुमच्या प्रायव्हेसीला ही धक्का बसणार नाही. खरंतर तुम्ही लाइक केले पेज सातत्याने तुमच्यावर लक्ष ठेवतात आणि तुम्हाला नोटिफिकेशन पाठवत राहतात.
आणखी वाचा: फ्लाइट रद्द झाल्यानंतर रिफंड मिळलेच पण ‘या’ गोष्टींसाठीही आहात हकदार