Home » स्मार्टफोन स्लो चार्ज होत असेल कर ‘या’ ट्रिक्स वापरा

स्मार्टफोन स्लो चार्ज होत असेल कर ‘या’ ट्रिक्स वापरा

फोनचा वापर हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. स्मार्टफोनमुळे आपली काही कामे सोपी झाली आहेत.

by Team Gajawaja
0 comment
smartphone charging tips
Share

फोनचा वापर हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. स्मार्टफोनमुळे आपली काही कामे सोपी झाली आहेत. तर घरातून आपण जेव्हा बाहेर निघतो त्याआधी आपला फोन पूर्णपणे चार्जिंग करतो. मात्र समस्या अशावेळी येते जेव्हा फोन चार्जिंग केल्यानंतर त्याची बॅटरी लगेच कमी होत जाते. काहीवेळेस फोन स्लो चार्ज होतो आणि अपेक्षेनुसार त्याची बॅटरी फार वेळ काम करत नाही. अशातच काय करावे याच बद्दलच्या ट्रिक्स जाणून घेऊयात. (Smartphone charging tips)

चार्जिंग करताना फोन वापरू नका
चार्जिंगवेळी फोनचा वापर करणे टाळला पाहिजे. त्यामुळे चार्जिंग प्रोसेस स्लो होतो. अशातच फोन व्यवस्थितीत चार्ज होत नाही आणि बॅटरी लगेच संपते. बहुतांश वेळा तुम्ही पाहिले असेल करी, लोक चार्जिंग करताना आपल्या फोनचा वापर करतात. जो घातक ठरू शकतो. अशाप्रकारची काही प्रकरणे ही समोर आली आहेत, जेव्हा चार्जिंगवेळी फोनचा वापर केला गेला तेव्हा तो हातात फुटला गेला.

पॉवर ऑफ करा फोन
जर तुम्ही फोनचा वापर करत नसाल आणि चार्जिंगही कमी असेल तर तो पॉवर ऑफ करुन चार्जिंगला लावा. यामुळे बॅटरी लगेच चार्ज हईल. मात्र हा एक इमरजेंसी फिचर आहे. फोनची बॅटरी व्यवस्थितीत चार्ज न झाल्यास ही ट्रिक कामी येऊ शकते.

Airplane मोड करा सुरु
एअरप्लेन मोडचा वापर बहुतांशकरुन विमानातून प्रवास करताना केला जातो. मात्र फोन लवकर चार्ज करण्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. असे केल्याने स्मार्टफोनच्या बॅक अॅन्डला ज्या काही अॅक्टिव्हिटीज सुरु असतील त्या बंद होती. त्यामुळे फोन लवकर चार्ज ही होईल. (Smartphone charging tips)

बॅकग्राउंडवरुन अॅप आणि ब्राउजर क्लिअर करा
फोनला चार्ज करताना बॅकग्राउंडला सुरु असलेले अॅप आणि ब्राउजर क्लिअर करा. कारण चार्जिंगवेळी अॅप सुरु असल्याल फोनची बॅटरी लवकर चार्ज होत नाही.

हेही वाचा- इंटरनेट डिवाइसमध्ये सॉफ्टवेअर अपडेटेड ‘या’ कारणास्तव गरजेचे

चार्जिंगसाठी वॉल सॉकेटचा वापर करा
बहुतांशवेळा आपण पाहिले असेल की, लॅपटॉपस कंप्युटर आणि कारच्या युएसबीच्या माध्यमातून फोन चार्ज केला जातो. ही ट्रिक इमरजेंसीवेळी कामी येऊ शकते. मात्र सर्वसामान्यपणे फोन चार्जिंगसाठी अशा गोष्टींचा वापर करा जेथे वॉल सॉकेट आहे.

वरील काही टीप्स वापरुन तुम्ही स्मार्टफोन लवकर चार्ज करु शकता. तसेच फोन खुप वेळ चार्ज होत नसेल तर बॅटरीची समस्या असू शकते हे सुद्धा लक्षात घ्या.

 

 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.