Home » पहिल्यांदाच खासगी आंतराळ कंपनीचे रॉकेट श्रीहरिकोटा येथून होणार प्रक्षेपित, जाणून घ्या खासियत

पहिल्यांदाच खासगी आंतराळ कंपनीचे रॉकेट श्रीहरिकोटा येथून होणार प्रक्षेपित, जाणून घ्या खासियत

by Team Gajawaja
0 comment
Skyroot Aerospace
Share

भारत आणखी एक इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. खरंतर पहिल्यांदाच श्रीहरिकोटा येथून एखाद्या खासगी कंपनीचे रॉकेट लॉन्च केले जाणार आहे. स्कायरॉकेट असे कंपनीचे नाव असून ज्याला विक्रम-एस नावाच्या रॉकेटला इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅडवर प्रक्षेपित करण्यात येणार आहे. हा विक्रम-एस रॉकटेची टेस्च फ्लाइट असणार आहे. तर याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात. (Skyroot Aerospace)

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात लॉन्चिंग
विक्रम एस हे हैदराबाद येथील स्काइयरुट एयरोस्पेस कंपनीने तयार केले आहे. इस्रोने याच्या प्रक्षेपणासाठी १२ ते १६ नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी दिला आहे. या प्रोग्रामला मिशन प्रारंभ असे नाव दिले गेले आहे. स्कायरुट एयरोस्पेस आपल्या रॉकेट भारतीय वैज्ञानिक आणि इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांना समर्पित केले आहे. त्यांच्याच नावावरुन त्याचे नाव विक्रम-एस असे ठेवण्यात आले आहे.

Skyroot Aerospace
Skyroot Aerospace

तीन कमर्शियल पेलोड्स घेऊन जाणार
स्कायरुट एयरोस्पेरच्या मते, विक्रम-एस रॉकेट एका सिंगल स्टेजचा सब-ऑर्बिटल लॉन्च व्हेकल आहे. हे रॉकेट आपल्यासह तीन कमर्शियल पेलोड्स घेऊन जाणार आहे. ही एक प्रकारची चाचणी आहे. जर ही चाचणी यशस्वी झाल्यास तर भारत अशा देशांमध्ये समाविष्ट होईल जेथे खासगी स्पेस कंपनी रॉकेटची लॉन्चिंग करण्यास समर्थ आहे. हे देशासाठी एक मोठी संधी ठरु शकते.

४० टक्क्यांपर्यंत स्वस्त होऊ शकते रॉकेट लॉन्चिंग
रॉकेटमध्ये ज्या थ्रिडी प्रिंटेज क्रायोजेनिक इंजिनचा वापर केला जाईल त्याची चाचणी केली गेली आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, २५ नोव्हेंबर २०२१ रोजी स्कायरुट एयरोस्पेसने नागपुर मधील सोलर इंडस्ट्री लिमिटेड आपल्या पहिल्या थ्रीडी प्रिंटेड क्रायोजेनिक इंजिनची टेस्टिंग केली होती ती यशस्वी झाली होती. याच्या मदतीने रॉकेट लॉन्च करण्याचा खर्च हा ४० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. या व्यतिरिक्त रॉकेटच्या लॉन्चिंगमध्ये लिक्विड नॅच्युरल गॅस आणि लिक्विड ऑक्सिजनचा वापर केला जाणार आहे.(Skyroot Aerospace)

हे देखील वाचा- फेरफटका चक्क अंतराळातला असला तर…

क्रायोजेनिक इंजिनवर अधिक भरोसा
कंपनीचे असे म्हणणे आहे की, विक्रम-एसच्या मदतीने लहान सॅटेलाइट्सला आंतराळात निर्धारित कक्षेत स्थापन करण्याचे काम करेल. दुसऱ्या इंजिनच्या तुलनेत क्रायोजेनिक इंजिन अधिक उत्तम आणि भरोवशाचे आहे. याचा वापर विक्रम-२ आणि ३ मध्ये सुद्धा केला जाईल. सध्या कंपनीकडे तीन रॉकेट्स आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.