Home » Skin Care : सणासुदीच्या दिवसात गुलाबजल वापरून दिसा सुंदर फॉलो करा ‘या’ टिप्स

Skin Care : सणासुदीच्या दिवसात गुलाबजल वापरून दिसा सुंदर फॉलो करा ‘या’ टिप्स

by Jyotsna Kulkarni
0 comment
Skin Care
Share

नवरात्रीचे दिवस सुरु झाले असून, आता दररोज संध्याकाळी गरबा आणि दांडिया रास रंगत असेल. काही वर्षांपूर्वी लोकं आहे त्या अवतारातच गरबा खेळायला यायचे. मात्र आत काळ बदलला, दिवस बदलले आता गरबा खेळायला जाताना आपण कसे दिसतो? हे देखील खूपच आवश्यक झाले आहे. सर्वच जणं आपल्या लुक्सच्या बाबतीत सजग झाले आहेत. आता नऊ दिवस आपण अधिक उठावदार आणि आकर्षक दिसण्यासाठी रोज पार्लरमध्ये जाणे तर परवडणारे नाही. एवढा वेळी नाही आणि पैसे देखील भरपूर लागणार. अशावेळी असे कोणते खास आणि उत्तम उपाय आहेत, जे करून आपण घरच्या घरी पार्लरसारखा ग्लो आणि मुलायम त्वचा मिळू शकते. (Marathi)

आपण आपल्या धकाधकीच्या आयुष्यत स्वतःकडे लक्ष देण्याचे पूर्णपणे विसरतो. अशावेळेस येणारे सणवारच आपल्याला जरा मोकळा वेळ देतात आणि स्वतःचे कौतुक करण्यासाठी प्रेरित करतात. सध्या नव्रातरचे दिवस चालू असल्याने आपणही इतरांप्रमाणे छान तयार होऊन गरब्यासाठी जावे आणि सुंदर दिसावे अशी सगळ्यांचीच इच्छा असते. यासाठीच आज आम्ही तुम्हाला अशा एका उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर तुम्ही सहज घरच्याघरी करून सुंदर दिसू शकतात. (Beauty Tips)

गुलाबपाणी किंवा गुलाबजल आपल्या सगळ्यांच्याच घरात अगदी सहज उपलब्ध असते. आणि जरी नसेल तरी मेडिकलमध्ये किंवा सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानात लगेच मिळते. मुख्य म्हणजे अजिबातच महाग नसते. हेच गुलाबजल वापरून तुम्ही अतिशय सुंदर दिसू शकतात. कोणत्याही केमिकल विरहित अतिशय नैसर्गिक उपाय म्हणून याकडे पाहिले जाते. गुलाबजालाचे आपल्या स्किनसोबतच इतरही अनेक फायदे आहेत. कोणते ते पाहूया. (Skin Care)

> अँटी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध, गुलाब पाणी केवळ चेहर्‍याची चमकच वाढवत नाही, तर चेहर्‍याला पोषण देखील देते. जर आपण दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर संपूर्ण चेहऱ्याला गुलाब पाणी लावले तर आपली त्वचा सुंदर होण्यास मदत होईल. (Todays Trending News)

> गुलाब पाणी चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याचा सुरकुत्यापासून बचाव करते. गुलाबाचे पाणी उत्कृष्ट क्लीन्सर, मेकअप रिमूव्हर म्हणून देखील काम करते. ते चेहऱ्यावरील धूळयुक्त मातीचे कण काढून टाकते. (Marathi News)

> दररोज रात्री कापसाच्या सहायाने चेहऱ्यावर गुलाब पाणी लावले तर दिवसभर बसलेली धुळ आणि चेहऱ्यावरील आॅईल कमी होण्यास नक्की मदत होईल. (Todays Marathi Headline)

Skin Care

> गुलाब पाण्याने त्वचा नियमित स्वच्छ केल्यामुळे तुमच्या त्वचेतील ओलावादेखील कायम राहतो. त्वचेला पुरेशी आर्द्रता मिळाल्याने तुमच्या त्वचेला एक प्रकारचा तजेदारपणा येतो. (Top Stories)

> कोरड्या त्वचेची समस्या असलेल्या लोकांसाठी गुलाब पाणी अत्यंत फायदेशीर आहे. त्वचेला आतून मॉइश्चरायझर करताना ते ओलावा लॉक करते. याशिवाय कोरडेपणामुळे खाज सुटते आणि ह्याचा त्रास होतो तर गुलाब पाणी लावल्यामुळे खाज येणे बंद होते. (Top Marathi Headline)

> रात्री काही वेळ गुलाब पाणी लावून चेहऱ्याला मसाज केल्याने चेहऱ्याचे रक्ताभिसरण सुधारते. यामुळे त्वचेच्या आत उष्णता येथे आणि त्वचा आतून सुंदर दिसते. याशिवाय रोज रात्री असे केल्याने तुमची त्वचा आतून चमकते. (Marathi Trending Headline)

> गुलाब पाणी निस्तेजपणा कमी करून चेहरा उजळण्यास मदत करते. यासोबतच पिगमेंटेशन कमी होते, कोलेजन वाढवते त्यामुळे त्वचा आतून सुंदर दिसते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी कॉटन बॉलवर गुलाब पाणी टाकून चेहऱ्यावर लावा. त्याचा सतत वापर केल्याने त्याचे अनेक फायदे चेहऱ्याला होतात. (Top Marathi News)

> वातावरणातील बदलांमुळे त्वचेवर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. अशा वेळी गुलाबपाणी लावल्याने गारवा तर मिळतोच पण पोषणही मिळते. त्यामुळे त्वचेची पीएच पातळी कायम राहते आणि त्वचा निरोगी राहते. (Latest Marathi Headline)

========

Skin Care : नाइट स्किनकेअर रुटीनमध्ये कोणत्या चुका टाळाव्यात

========

> वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या, रेषा, वांग इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करावा. (Top Trending News)

> गुलाब पाण्याचा वापर फेस मास्क तयार करण्यासाठी केला जातो. एका वाटीमध्ये मुलतानी माती, मध, दही घेऊन त्यात गुलाब पाणी टाका. जाडसर पेस्ट तयार झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्याला हा फेसपॅक लावून घ्या. (Social News)

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.