Skin Care Tips : गुलाब पाणी त्वचेसाठी बेस्ट पर्याय मानला जातो. बहुतांशजण याचा टोनर म्हणून वापर करतात. पण जेव्हा आपण एखाद्या फेस पॅकचा वापर करतो तेव्हा स्किनला हाइड्रेटिंग लुक किंवा रिफ्रेश वाटण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर केला जातो. गुलाब पाणी काही प्रकारच्या प्रक्रिया करून तयार केले जाते. पण काही गोष्टी अशा असतात की, ज्या गुलाब पाण्यात मिक्स करू नयेत. याचे गंभीर परिणाम त्वचेवर होऊ शकतात. जाणून घेऊया याबद्दलच अधिक….
लिंबूचा वापर
गुलाब पाण्यासोबत लिंबूचा वापर करू नये. यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. खरंतर लिंबू आंबट असल्याने गुलाब पाण्यासोबत मिक्स केल्यास त्वचेवर जळजळ निर्माण होऊ शकते. बहुतांशजण लिंबू पाणी आणि गुलाब पाणी मिक्स करतात. पण असे करणे टाळा.
फेस ऑइलचा वापर करू नये
गुलाब पाण्यासोबत फेस ऑइल मिक्स करू नये. गुलाब पाणी कोणत्याही तेलात मिक्स होत नाही. यामुळे आपली त्वचा ड्राय होते. अशातच तुम्बी फेस ऑइलचा वापर करताना गुलाब पाणी मिक्स करत असाल तर तसे करू नका. हवं तर, गुलाब पाणी चेहऱ्याला लावल्यानंतर तुम्ही फेस ऑइल लावू शकता.
क्ले मास्कचा वापर करू नका
स्किन केअर रुटीनमध्ये बहुतांशजण क्ले मास्कचा वापर करतात. अशातच तुम्ही गुलाब पाणी मिक्स केल्यास यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. (Skin Care Tips)
अल्कोहोल बेस्ड टोनरचा वापर करू नये
काहीजण गुलाब पाणी टोनरच्या रुपात वापर करतात. खरंतर अल्कोहोल बेस्ड टोनरचा वापर करताना गुलाब पाणी अजिबात वापरू नका. यामुळे आपल्या त्वचेवर जळजवळ आणि इरिटेशनची समस्या निर्माण होऊ शकते.