Skin Care Tips : बहुतांशजण हात भाजल्यावर त्यावर टुथपेस्ट लावतात. जेणेकरुन त्वचा जळजळ्यापासून आराम मिळतो. पण काही लोकांचे असे मानने आहे की, जळजळ होत असेल तर लगेच टुथपेस्ट लावू नये. याशिवाय काहीजण भाजल्यानंतर त्यापासून आराम मिळण्यासाठी नारळाचे तेल देखील लावतात. पण भाजल्यानंतर जळजळ होण्यापासून आराम मिळावा म्हणून टुथपेस्ट लावणे किती योग्य आहे याबद्दल जाणून घेऊयात एक्सपर्ट्स काय म्हणतात.
भाजल्यानंतर टुथपेस्ट का लावतात?
थोडेसे जरी भाजले गेले तरीही टुथपेस्ट लावण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरुन तुमच्या त्वचेला जळजळ होण्यापासून आराम मिळते. यामुळे जेव्हा कधी खूप जळजळ होत असेल तेव्हा टुथपेस्ट लावू शकता. पण टुथपेस्टचा का लावायची? (Skin Care Tips)
एक्सपर्ट्स काय म्हणतात पाहूयात?
एक्सपर्ट्स म्हणतात की, भाजल्यानंतर जळजळ होत असल्यास टुथपेस्ट लावू नये. कारण यामुळे त्वचेला नुकसान पोहोचू शकते. टुथपेस्टमध्ये सोडिअम फ्लोराइड असते. जे आपल्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकते. यामुळे त्वचेवर अँटी-इंफ्लेमेटरी क्रिम लावावी. जेणेकरुन तुम्हाला जळजळ होण्याच्या समस्येपासून आराम मिळेल.
घरगुती उपाय काय?
-भाजल्यानंतर लगेच हात पाण्यात बुडवा. लक्षात ठेवा बर्फाचा थेट वापर यावेळी करू नका.
-भाजलेल्या ठिकाणी नारळाचे तेल लावा. जेणेकरुन जळजळ कमी होईल.
-एलोवेरा जेलचा देखील तुम्ही वापर करू शकता.
-भाजलेल्या ठिकाणी बटाटा कापून त्याचा रस लावू शकता.
-जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही मध लावा आणि त्यावर स्वच्छ पट्टी ठेवा.
(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)