Skin Care Tips : सणासुदीचे दिवस सध्या सुरु झाले आहेत. थोड्याच दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. या काळात आरोग्याची जशी काळजी घेतो तशीच काळजी त्वचेची देखील घ्यावी. सणांमध्ये त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. स्किन एक्सपर्ट्स म्हणतात की, त्वचेला ग्लो येण्यासाठी केवळ बाहेरुनच नव्हे तर आतमधूनही पोषण मिळणे आवश्यक आहे. ब्युटी प्रोडक्ट्स केवळ थोड्याच वेळासाठी त्वचेला ग्लो आणतात. पण त्वचेला आतमधूनही पोषण मिळणे महत्वाचे आहे. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर…
स्वत:ला हाइड्रेट ठेवा
सणासुदीच्या काळात त्वचा हाइड्रेट ठेवणे महत्वाचे आहे. दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे. नारळाचे पाणी आणि फळांचा ज्यूस त्वचेला आतमधून पोषण देते. यामुळे त्वचेला ग्लो देखील येतो.
हिरव्या पालेभाज्या
पालक, मेथी आणि ब्रोकलीसारख्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के असल्याने त्वचा फ्री रेडिकल्सपासून दूर राहते.
व्हिटॅमिन सी युक्त फळ
संत्र, लिंबू अथवा किवीसारख्या फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे कोलेजनचे उत्पादन वाढून त्वचा चिरतरुण दिसण्यास मदत होते.
सुकामेवा
सुकामेव्याचे सेवन करू शकता. यामध्ये अक्रोड, सुर्यफुलाच्या बिया, बदामचा पर्याय निवडा. यामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे त्वचा फ्री रेडिकल्सपासून दूर राहते. सणासुदीच्या काळात त्वचेला ग्लो येण्यासाठी सुकामेवा जरुर खा.
दह्याचे सेवन
दही आणि प्रोबायोटिक्सयुक्त पदार्थ पचनासाठी उत्तम असतात. यामुळे त्वचाही हेल्दी राहते. दररोज दह्याचे सेवन केल्याने त्वचा मऊ आणि पिंपल फ्री राहते. (Skin Care Tips)
हळद आणि आलं
हळद आणि आलं भारतीय स्वयंपाक घरातील गुणकारी वस्तू आहे. हळदीत अँटीऑक्सिडेंट्स आणि आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म असतात. यामुळे त्वचेला येणारी सूज कमी होते. हळदीचे दूध किंवा चहा प्यायल्याने त्वचेला ग्लो येण्यास मदत होईल.
आणखी वाचा :