चेहरा उजळण्यासाठी बहुतांश लोक ब्लीचचा वापर करतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का, याचे काही परिणाम सुद्धा होतात. अशातच तुम्हाला काही गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे लागते. खरंतर ब्लीच एका प्रकारचे केमिकल प्रोडक्ट असून त्याच्या मदतीने तुमच्या चेहऱ्यावर फक्त उजळपणा येतोच पण डाग ही निघतात. परंतु ब्लीच क्रिम लावल्याने तुमच्या स्किनला नुकसान ही होते. अशातच आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर ब्लीच लावताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल अधिक सांगणार आहोत. (Skin Care)
चेहऱ्यावर ब्लीच लावताना अशी घ्या काळजी
-चेहरा स्वच्छ करा
बहुतांश लोक चेहरा धुतल्याशिवाय चेहऱ्यावर ब्लीच लावतात. त्यामुळे चेहऱ्यावरील डर्ट पार्टिकल्स राहतात आणि त्यामुळे चेहऱ्यावर ब्लीचचे रिअॅक्शन ही होऊ शकते. त्यामुळे चेहऱ्यावर ब्लीच लावण्यापूर्वी माइल्ड फेस वॉश लावावा आणि तो थंड पाण्याने धुवावा.
-ब्लीचच्या लेयरवर लक्ष द्या
ब्लीच नेहमीच हेयर ग्रोथच्या दिशेने लावावे, मात्र ब्लीच लावतेवेळी लक्षात ठेवा की, त्याचा स्तर हा पातळ असावा. ते लावल्यानंतर फक्त १५ मिनिटे ठेवून चेहरा स्वच्छ धुवा.
-फेस पॅकचा वापर करा
ब्लीचमध्ये असलेला हार्ड केमिकल्स काही वेळा स्किन बर्न करण्याचे कारण ठरतात. अशातच ब्लीच वापरताना तो उत्तम कंपनीचा असावा. त्यामुळे तु्म्हाला थंड आणि फ्रेश वाटेल.
-उन्हात जाण्यापासून दूर रहा
ब्लीच लावल्यानंतर तुमची त्वचा अधिक सेंसिटिव्ह होते. त्यामुळे उन्हात गेल्यास तुमची स्किन बर्न होण्याची अधिक शक्यता असते. यामुळे ब्लीच केल्यानंतर उन्हात जाण्यापासून दूर रहा.(Skin Care)
त्वचेसाठी किती सुरक्षित आहे ब्लीच करणे?
ब्लीचमध्ये सोडियम हाइपोक्लोराइट असते. ते लावल्याने केमिकल रिअॅक्शन होण्याची शक्यता असते. जे नंतर ब्रेकआउटचे कारण बनू शकते. ऐवढेच नव्हे तर वारंवार ब्लीच केल्याने त्वचा खेचल्यासारखी वाटू लागते. त्यामुळे त्वचेवर इरिटेशन ही होते. ज्या लोकांची त्वचा अधिक सेंसिटिव्ह असते त्यांनी ब्लीच लावतेवेळी अधिक लक्ष द्यावे, खरंतर यामुळे त्वचा लाल होते. त्याचसोबत सामान्य रंगात येण्यासाठी सुद्धा वेळ लागतो.
हे देखील वाचा- कुरळे केस सरळ करत आहात : सावधान !
किती काळाने ब्लीच करावे?
जर तुम्हाला ब्लीचमुळे होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करायचा असेल तर जेवढे होईल तेवढा त्याचा कमी वापर करावा. गरज भासल्यास ब्लीचचा वापर करा. तर ब्लीचच्या वापर हा कमीत कमी एका महिन्याच्या अंतराने करावा. एका महिन्यात वारंवार ब्लीच केल्याने तुम्हाला स्किन डिसऑर्डरची समस्या येऊ शकते. तसेच त्वचेसंबंधित समस्यांव्यतिरिक्त आरोग्य सुद्धा प्रभावित होते. त्यामुळे ब्लीच लावताना काही गोष्टींकडे जरुर लक्ष द्या.