Skin Care During Holi : रंगांचा उत्सव म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या रंगपंचमीवेळी रंगांची उधळण केली जाते. यावेळी एकमेकांवर रंग उधळून रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. पण सध्या केमिकलयुक्त देखील रंग मार्केट मिळतात. याचा परिणाम तुमच्या त्वचेसह आरोग्यावरही होऊ शकतो. अशातच काही गोष्टी लक्षात ठेवून होळीच्या रंगांपासून त्वचेची काळजी घेण्यासाठी पुढील काही टिप्स नक्कीच तुमच्य कामी येतील.
होळीआधी त्वचेची अशी घ्या काळजी
बदामाचे तेल
त्वचेसाठी बदामाचे तेल अत्यंत फायदेशीर ठरू शकते. रंगपंचमी दिवशी बदामाच्या तेलाने त्वचेला मसाज करू शकता. बदामाच्या तेलात व्हिटॅमीन ई भरपूर प्रमाणात असते. याशिवाय बदमाचे तेल त्वचेवर प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करते. यामुळे त्वचेला नुकसान पोहोचत नाही. याव्यतिरिक्त तुम्ही चेहऱ्यासह संपूर्ण शरिराला बदामाचे तेल लावू शकता.
नारळाचे तेल
बदामाच्या तेलाप्रमाणेच नारळाचे तेलही बेस्ट पर्याय आहे. रंगपंचमी दिवशी रंगांमुळे त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही नारळाचे तेल त्वचेला लावू शकता. त्वचेसह केसांनाही नारळाचे तेल लावा. यामुळे केसांचे संरक्षण होईल.
सनस्क्रिन
होळी खेळताना आपण उन्हात राहतो. अशातच त्वचा टॅन होण्याची शक्यता असते. यामुळे तुम्ही चेहऱ्याला आणि शरिराला सनस्क्रिन लावू शकता. त्वचेवर वॉटरप्रुफ सनस्क्रिन लावा.
टोनर लावण्यास सुरूवात करा
होळी कधीही असो तुम्ही आजपासूनच चेहऱ्यावर टोनर लावण्यास सुरूवात करा. टोनरमुळे त्वचेवर मोठे छिद्र तयार होतात. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किनची समस्या कमी होते. (Skin Care During Holi)
पेट्रोलिअम जेली
मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेट्रोलिअम जेली मिळतात. पेट्रोलिअम जेली त्वचेवर एक संरक्षण लेअर तयार करते. यामुळे त्वचेला नुकसान पोहोचले जात नाही. यामुळे होळीतील रंगांमुळे तुमच्या त्वचेचे संरक्षण होऊ शकते.