गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सगळ्यांच्या घरी अगदी जय्यत सुरु असेल. डेकोरेशनवर आता शेवटचा हात फिरवण्याचे काम ठेवढे बाकी असेल. याशिवाय पूजेची तयारी, प्रसादाची तयारी सर्वच झाली असेल. आता बाप्पा आपल्याकडे असणार म्हणजे त्यांची दोन्ही वेळेस पूजा होणार, आरती होणार. यासाठी पूजेची तांब्याची भांडी देखील वापरास काढली जातात. बाप्पाची पूजा करण्यासाठी जी भांडी वापरली जाणार ती अतिशय स्वच्छ आणि चकाकणारीच हवी. हवामानामुळे पितळेच्या मूर्ती आणि तांब्याच्या भांडी काळी पडतात. कितीही वेळा स्वच्छ केली तरी ते पुन्हा काळवंडते. यासाठी अनेक महिला बाजारात मिळणाऱ्या काही पावडरचा वापर करून पूजेची तांब्याची भांडी स्वच्छ करतात. मात्र ही भांडी त्या पावडरने स्वच्छ नक्कीच होतात, पण त्यावर डाग पडतात किंवा ती चमक अगदी थोडा काळच टिकून राहते. (Kitchen Tips)
शिवाय काही महिलांना त्या पावडरची ऍलर्जी देखील असते. हाताला पावडरमुळे खाज येते, स्किन निघते आदी समस्या महिलांना जाणवतात. मग अशावेळेस काय करावे? हा प्रश्न महिला वर्गासमोर आ विसरून उभा असतो. पण घरगुती वापरातल्या वस्तू वापरूनही देवघराततील मूर्ती आणि पूजेच्या भांडाण्या उजळवता येतात. आज आम्ही तुम्हाला ही तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी काही सोपे आणि अतिशय फायदेशीर असे उपाय सांगणार आहोत. हे उपाय जर तुम्ही केले, तर तुमची तांब्याची भांडी केवळ स्वच्छ होणार नाही तर नव्यासारखी चमकू लागतील. मुख्य म्हणजे हे उपाय करताना तुम्हाला कोणताही त्रास जाणवणार नाही. बाप्पासमोर तुम्ही अतिशय स्वच्छ आणि चमकणारी भांडी ठेऊन त्यांची पूजा करू शकता. चला मग जाणून घेऊया तांब्याची भांडी स्वच्छ करण्याचे सोपे उपाय. (Marathi Top News)
बेसन पेस्ट
एका भांड्यात ३-४ चमचे बेसन घ्या. त्यामध्ये दही, मीठ, हळद आणि लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण एकत्र करून पेस्ट तयार आहे त्याचा वापर करा. तुमची तांब्याची भांडी आहेत त्यानुसार तुम्ही बेसनची ही पेस्ट तयार करा. ही पेस्ट तांब्यांच्या भांड्यावर लावा आणि काही वेळ तसंच ठेवा. थोड्या वेळाने ही स्क्रबर अथवा टिश्यू पेपरने भांडी स्वच्छ करा. (Todays Marathi Headline)
व्हाईट व्हिनेगर वापरा
पूजेची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हाईट व्हिनेगर वापरू शकता. यासाठी 1 ग्लास पाण्यात 2 चमचे व्हाईट व्हिनेगर टाकून उकळा. आता त्यात साबण टाका, नंतर या मिश्रणाने पूजेची भांडी धुवा. यामुळे भांडी लगेच चमकतील. (Marathi News)

बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस
पितळेची भांडी स्वच्छ करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. सर्वप्रथम गरम पाणी घ्या आणि त्यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिसळा. या पाण्यात सर्व भांडी बुडवून ठेवा. सुमारे 20 ते 25 मिनिटांनंतर स्क्रबरच्या मदतीने ही भांडी घासून घ्या. तुम्हाला आढळेल की ही भांडी जास्त मेहनत न करता सहज चमकतील. (Latest Marathi Headline)
मीठ आणि लिंबू वापरून पहा
पूजेची भांडी चमकण्यासाठी मीठ आणि लिंबाचा वापर देखील उत्तम आहे. यासाठी १ लिंबाच्या रसात अर्धा चमचा मीठ मिसळा. आता हे मिश्रण भांड्यांवर लावा आणि काही वेळ चोळल्यानंतर भांडी कोमट पाण्याने धुवा. याने पूजेची भांडी सहज स्वच्छ होतील. (Marathi Trending News)
बेकिंग पावडर आणि डिटर्जंट
बेकिंग पावडर आणि डिटर्जंटच्या मदतीने तुम्ही तांबे आणि पितळाची भांडी देखील चमकवू शकता. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एका भांड्यात बेकिंग सोडा आणि डिटर्जंटचे द्रावण तयार करा. आता पूजेची भांडी त्यात भिजवा आणि सकाळी घासून स्वच्छ पाण्याने धुवा. याच्या मदतीने काही मिनिटांत भांडी स्वच्छ होतील. (Top Trending News)
चिंचेची मदत घ्या
तांबे आणि पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही चिंचेचा वापर करू शकता. यासाठी चिंच पाण्यात भिजवावी. काही वेळाने चिंच कुस्करून पीठ तयार करा. आता हे द्रावण पूजेच्या भांड्यांवर चोळा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. त्यामुळे पितळेची आणि तांब्याची भांडी अगदी नवीन दिसू लागतील. (Top Marathi Headline)
भांडी घासण्याची पावडर
पितांबरी पावडर बाजारात मिळेल. तुम्ही स्कॉच ब्राइटमध्ये थोडी पितांबरी घाला. याने भांडी स्वच्छ करा. यानंतर भांडी पाण्याने धुवा. या उपायाने तुमची सर्व पूजेची भांडी नवीनसारखी चमकदार होतील. (Marathi Latest News)
=========
Health Care : शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी या फूड्सचे करा सेवन, रहाल तंदुरुस्त
=========
गव्हाचे पीठाचा वापर करा
गव्हाचे पीठ, थोडे मीठ आणि १ चमचा पांढरा व्हिनेगर मिक्स करून पेस्ट बनवा. जर व्हिनेगर उपलब्ध नसेल तर लिंबू देखील वापरू शकता. त्यानंतर ही पेस्ट पूजेच्या भांड्यांवर लावा आणि काही वेळ राहू द्या. नंतर घासून स्वच्छ करा. (Top Stories)
टोमॅटो केचप
तांब्याची भांडी साफ करण्यासाठी आपण टोमॅटो केचपचा हि वापर करू शकता. टोमॅटो केचपमध्ये असणाऱ्या आम्लामुळे भांडी स्वच्छ निघतात. भांड्यावर केचअप लावून भांडी ठेवा. 5 ते 10 मिनिटानंतर भांड्यावरून हलक्या हाताने घासणी फिरवली तरी भांडे स्वच्छ होते. (Social News)
(टीप : कोणतेही उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञाशी संपर्क साधा.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
