Home » लहान मुलांना चांदीच्या भांड्यातून जेवण भरवल्याने होतात ‘हे’ फायदे

लहान मुलांना चांदीच्या भांड्यातून जेवण भरवल्याने होतात ‘हे’ फायदे

by Team Gajawaja
0 comment
Silver Utensils Benefits
Share

लहान मुलांची काळजी घेणे सर्वाधिक मोठा टास्क असतो. त्यांच्याकडे वेळोवेळी लक्ष द्यावे लागते. त्यांना बोलता येत नसल्याने आपल्यालाच त्यांच्या हावभावावरुन त्यांना काय म्हणायचे आहे हे समजून घ्यावे लागते. अशातच लहान मुलांना जेव्हा जेवण भरवलं जाते त्यावेळी वापरली जाणारी भांडी ही व्यवस्थितीत आहेत की नाही हे पाहिले जाते. टोकदार चमचे किंवा भांडी त्यांच्यापासून दूर ठेवली जातात. अशातच लहान मुलांना बहुतांश जण चांदीच्या भांड्यातून जेवण भरवताना दिसतात. पण असे का केले जात असेल? असे करण्यामागेही काही कारणं आहेत. त्याचबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात. (Silver Utensils Benefits)

खरंतर बहुतांश लोक असे मानतात की, चांदीच्या भांड्यांतून लहान मुलांना भरवल्यास त्यांच्या आरोग्यासंबंधित समस्या दूर राहतात. तर मुलांना चांदीच्या ग्लासातून पाणी दिल्यास त्यांना पोटाच्या समस्या होत नाहीत.

चांदीच्या भांड्यातून जेवण भरवल्यास होतात हे फायदे:
-डोक शांत राहते
चांदी मध्ये शीतलतेचे गुण असतात. त्यामुळेच मुलांचे डोकं शांत ठेवण्यासह त्यांची स्मरणशक्ती ही वाढवण्यास मदत होते. या व्यतिरिक्त असे मानले जाते की, चांदीच्या भांडीतून लहान मुलांना जेवण दिल्यास त्याचा मेंदू ही शांत राहतो.

-रोगांपासून लढण्याची क्षमता
चांदीची भांडी अत्यंत शुद्ध मानली जाते. अशातच लहान मुलांना चांदीच्या भांड्यातून जेवण भरवल्यास त्यांच्यामध्ये आजाराशी लढण्याची क्षमता निर्माण होते. याच कारणामुळे त्यांना चांदीचा चमचा, चांदीचा ग्लास आणि प्लेटमध्ये जेवण देण्याचा सल्ला दिला जातो.

-शरिराला थंड ठेवते
उन्हाळ्याच्या दिवसात चांदीच्या भांड्यातून जेवण दिल्यास त्यांच्या शरिराचे तापमान नियंत्रित राहते. तसेच शरिर आतून थंड राहते. त्यांच्यामध्ये रागाची प्रवृती ही कमी होते. (Silver Utensils Benefits)

-बॅक्टेरिया फ्री
चांदीच्या भांड्यात संक्रमण आणि बॅक्टेरिया नसतात. कारण यामध्ये बॅक्टेरियाला संपवण्याचे गुण असतात. त्यामुळेच चांदीच्या भांड्यात दीर्घकाळ जेवण फ्रेश राहण्यास मदत होतो.

हे देखील वाचा- दुसऱ्यांचा राग तुम्ही मुलांवर काढत असाल तर ‘अशा’ पद्धतीने हाताळा स्थिती

चांदीच्या भांड्याचा वापर करण्यापूर्वी घ्या काळजी
-चांदीच्या भांड्यातून आंबट फळं किंवा ज्यूस देऊ नका
-अंड सुद्धा चांदीच्या भांड्यातून देऊ नका. यामुळे लहान मुलांच्या आरोग्याला समस्या उद्भवू शकते.
-जेवण गरम करण्यासाठी कधीच चांदीची भांडी ओवनमध्ये ठेवू नका
-लहान मुलांना चांदीच्या भांड्यातून जेवणे द्यायचे की नाही हा निर्णय सर्वस्वी पालकांचा आहे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.