प्रेम झाले आणि नंतर लग्न सुद्धा झाले, पण काही कपल्स या गोष्टीवरुन त्रस्त असतात की, त्यांच्या मधील नाते तुटेल. याच भीतीमुळे नात्यात संशय निर्माण होतात आणि मजूबत नाते सुद्धा पोकळ होते. खासकरुन जेव्हा लग्नानंतर वेळ निघून जाते तेव्हा नात्यात आणखी काही अशा गोष्टी होतात त्यामुळे नात्यात दुराव्याची स्थिती निर्माण होते. अशातच तुम्हाला तुमचे नाते कशा प्रकारचे आहे हे समजून घ्यायचे असेल तर तुम्ही पुढील काही गोष्टींवरुन नक्कीच कळेल. (Signs of strong relationship)
एकमेकांना सन्मान देणे
तुम्ही स्वत: ला प्रश्न विचारु शकता की, तुमच्या मनात पार्टनरसाठी किती सन्मान आहे. तुम्ही एकमेकांचे किती ऐकता. जर तुम्हाला असे वाटत असे की, तुम्ही एकमेकांना सन्मान देत असाल तर तुमच्यामधील नाते मजबूत आहे.
विश्वास ठेवणे
विश्वास कोणत्याही नात्याचा पाया आहे. हा प्रश्न स्वत:ला ही विचारा की, तुम्ही पार्टनरवर किती विश्वास ठेवता. याच दरम्यान, तुमच्यामध्ये पार्टनरसाठी संशयात्मक काही गोष्ट सतावत असेल तर समजा तुमचे नाते किती मजबूत आहे.
एकमेकांची साथ देणे
जर तुमचा पार्टनर प्रत्येक गोष्टीसाठी साथ देतो आणि दुसऱ्यांच्या समोर आरोप लावत नाही तर तुमच्यामध्ये समजूतदारपणा अधिक असल्याचे दिसते. मात्र असे होत नसेल तर तुमच्या नात्यात समस्या निर्माण होऊ शकतात.
एकमेकांच्या जवळ असणे
जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या पार्टनरपासून १ आठवड्यापेक्षा अधिक दूर राहू शकत नाही तर तुमचा पार्टनर सुद्धा एक आठवडा दूर राहू शकत नाही तर तुमचे नाते अधिक घट्ट आहे. तुमच्यामध्ये अधिक प्रेम आहे. (Signs of strong relationship)
हे देखील वाचा- आयुष्यातील ‘या’ सर्वाधिक महत्वाच्या, महागड्या गोष्टी कधीच पैशांनी खरेदी करु शकत नाहीत
तुमचे नाते अधिक घट्ट करण्यासाठीच्या काही टीप्स
-तुमचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी पार्टनरच्या लहान-लहान आनंदाकडे जरुर लक्ष द्या. तुम्हाला वेळ मिळेत तेव्हा पार्टनरला आनंदीत ठेवण्याचा प्रयत्न करा.
-पार्टनरला कठीण परिस्थितींमध्ये साथ द्या. कारण कठीण काळात जो तुमच्यासोबत उभा राहतो तोच सच्चा साथी असतो.
-रिलेशनशिपमध्ये वाद होतात. पण चुक असेल तर माफी सुद्धा मागावी.
-नाते अधिक घट्ट करायेच असेल तर एकमेकांना पुरेसा वेळ देणे ही गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही कधीतरी एकमेकांसोबत बाहेर फिरण्यास जाऊ शकता.
-नात्यात अर्धवट गोष्टी सांगितल्या गेल्या तर नाते तुटते. त्यामुळेच जर तुम्हाला तुमचे नाते दीर्घकाळ टिकवून ठेवायचे असेल तर सर्व गोष्टी स्पष्ट करा. जेणेकरुन तुमच्यामध्ये एखादी गोष्ट लपवल्यानंतर ती समोर आल्यास वादाची स्थिती निर्माण होईल.