तब्बल चाळीस वर्षाच्या कालावधीनंतर भारताच्या अंतराळ मोहीमेतील महत्त्वाचा टप्पा पार होणार आहे. यामध्ये तमाम भारतीयांच्या नजरा असतील त्या कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यावर. कॅप्टन शुक्ला यांच्यासह अन्य तिन सदस्य आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेपावणार आहेत. ऑक्सिओम-4 च्या माध्यमातून हे चार सदस्य 29 मे रोजी उड्डान करणार होते. मात्र तांत्रिक कारणामुळे आता या मोहीमेची नवी तारीख जाहीर कऱण्यात आली आहे. 8 जून रोजी होणा-या या मोहीमेत भारतीय कॅप्टन शुभांशू शुक्ला सहभागी असून तमाम भारतीयांच्या नजरा त्यांच्या कामगिरीकडे रहाणार आहेत. (Shubanshu Shukla)
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणा-या अॅक्सिओम-4 मिशनला दहा दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. या मिशनमध्ये आलेल्या तांत्रिक कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या मिशनमध्ये भारतीयांच्या नजरा लागल्या आहेत त्या, कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या कामगिरीवर. त्यांच्या या मोहीमेमुळे तब्बल 40 वर्षानंतर भारतीयाच्या नावावर पुन्हा एका विक्रम नोंदला जाणार आहे. 1984 नंतर भारताचे हे दुसरे प्रायोजित मानवी अंतराळ उड्डाण अभियान आहे. राकेश शर्मा यांच्या ऐतिहासिक उड्डाणानंतर आता कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाणार आहे. कॅप्टन शुभांशू अंतराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अनेक प्रयोग करणार असून त्यांचा तेथील सहभाग हा भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. (Latest Updates)
अॅक्सिओम मिशन 4 हे नव्या वेळेनुसार 8 जून रोजी लाँच होणार आहे. त्याची प्रक्षेपण वेळ ही सकाळी 9.11 ची आहे. म्हणजेच भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.41 वाजता हे आंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेपावणार आहेत. फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर येथून हे प्रक्षेपण होईल. यात कॅप्टन शुक्ला यांच्याव्यतिरिक्त पोलंड आणि हंगेरीचे अंतराळवीर देखिल आहेत. युरोपियन स्पेस एजन्सी प्रकल्प अंतराळवीर स्लावोज उझ्नान्स्की हे 1978 नंतरचे दुसरे पोलिश अंतराळवीर आहेत. तर टिबोर कापू 1980 नंतरचे दुसरे हंगेरियन राष्ट्रीय अंतराळवीर आहेत. पेगी व्हिटसन यांचाही या मोहीमेत सहभाग आहे. X-4 चा क्रू स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानातून अंतराळ स्थानकात प्रवास करेल आणि कक्षेत फिरणाऱ्या प्रयोगशाळेत 14 दिवस रहाणार आहे. हे अंतराळवीर एलोन मस्क यांच्या कंपनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमध्ये उड्डाण करतील. हे अभियान फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून फाल्कन-9 रॉकेटद्वारे प्रक्षेपित केले जाईल. (Shubanshu Shukla)
यातील भारताच्या शुभांशू शुक्ला यांच्याकडे ग्रुप कॅप्टन म्हणून जबाबदारी आहे. कॅप्टन शुभांशू शुक्ला हे भारतीय हवाई दलात कॅप्टन आहेत. शुभांशू शुक्ला हे भारतात सूक्ष्म गुरुत्वाकर्षण संशोधनाला चालना देण्याच्या उद्देशाने अवकाशात सात प्रयोग करणार आहेत. या प्रयोगाच्या माध्यमातून 2035 पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक बांधण्याची आणि 2047 पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याची इस्रोची योजना आहे. त्यामुळेच इस्रोने आयएसएसवर भारत-केंद्रित अन्न-केंद्रित प्रयोग करण्याची योजना आखली असून ज्यामध्ये सूक्ष्म गुरुत्वाकर्षण परिस्थितीत मेथी आणि मूग यांची लागवड कऱण्यात येणार आहे. शुभांशू शुक्ला मूळचे उत्तर प्रदेशातील लखनऊचे आहेत. त्यांचे शिक्षण लखनौमधील अलीगंज येथील सिटी मॉन्टेसरी स्कूलमधून झाले आहे. बारावीनंतर त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि तिथून पदवी प्राप्त केली. (Latest Updates)
=======
हे देखील वाचा : Train : रेल्वेच्या बोगी वेगवेगळ्या रंगाच्या का असतात?
Tourism : एक असा देश ज्याची लोकसंख्या आहे केवळ 800
=======
त्यानंतर शुभांशू 17 जून 2006 रोजी भारतीय हवाई दलाच्या फायटर विंगमध्ये नियुक्त झाले. ते एक अनुभवी फायटर आणि टेस्ट पायलट आहेत. त्यांना 2000 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी सुखोई-30 एमकेआय, मिग-21, मिग-29, जग्वार, हॉक, डोर्नियर आणि एन-32 सारखी लढाऊ विमाने उडवली आहेत. मार्च 2024 मध्ये, शुभांशू यांना ग्रुप कॅप्टन पदावर बढती देण्यात आली. त्यानंतर भारतातर्फे कॅप्टन शुभांशू यांची या महत्त्वपूर्ण मोहीमेसाठी निवड झाली आहे. गेल्या काही महिन्यापासून ते या मोहीमेसाठी प्रशिक्षण घेत आहेत. यापूर्वी भारताचे राकेश शर्मा हे 1984 मध्ये अंतराळस्थानकावर गेले होते. आता चार दशकानंतर ही संधी कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना मिळणार आहे. (Shubanshu Shukla)
सई बने