श्रीराम ग्रुपचे फाउंडर आर त्यागराजन यांनी आपल्या लहानश्या घरापासून ते ५ हजार डॉलरची कार सोडून जवळजवळ ६ हजार कोटींची सर्व संपत्ती ४४ कर्मचाऱ्यांना दान केली आहे. अशातच सर्व कर्मचाऱ्यांना १३६ कोटी रुपये मिळणार आहेत. ब्लूमबर्गला दिलेल्या एका मुलाखतीत ८६ वर्षाच्या त्यागराजन यांनी असे म्हटले की, मी श्रीराम कंपनीची आपली संपूर्ण हिस्सेदारी कर्मचाऱ्यांच्या एका ग्रुपला दिली आहे. ती २००६ मध्ये सुरु केलेल्या श्रीराम ओनरशिप ट्र्स्टमध्ये ट्रांन्सफर केली आहे. स्थायी ट्र्स्टमध्ये लाभार्थ्यांच्या रुपात ग्रुप मध्ये ४४ अधिकारी आहेत. जेव्हा ते निवृत्त होतील तेव्हा त्यांना १३६ कोटी रुपये मिळणार आहेत. (Shriram groups founder)
त्यांनी असे म्हटले की, मी थोडा वामपंथी सुद्धा आहे. मला त्या लोकांच्या आयुष्यातील दु:ख कमी करायची आहेत जे समस्यांचा सामना करत आहेत. त्याचसोबत पुढे त्यागराजन यांनी म्हटले, मला फाइनान्स इंडस्ट्रीमध्ये हे खरं करून दाखवायचे आहे की, मी कोणत्याही क्रेडिट हिस्ट्री आणि रेग्युलर इनकम असणाऱ्या लोकांना कर्ज देणे ऐवढे जोखिमिचे नाही जेवढे मानले जाते.
आर त्यागराजन यांच्या मते, गरिबांना कर्ज देणे समाजवादाचे एक रुप आहे. आपण लोकांना स्वस्त दरात कर्ज देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यागराजन हे जगातील काही समजूतदार फाइनान्सरपैकी एक आहेत. भारतातील प्रमुख नॉन बँकिंग फाइनान्स कंपनीपैकी एक असलेला श्रीराम ग्रुप ट्रक, ट्रॅक्टर्स आणि अन्य वाहनांसाठी भारत गरिबांना कर्ज देते. या ग्रुपने बीमा ते स्टॉक ब्रोकिंग पर्यंत १,०८,००० लोकांना रोजगार दिला आहे. समहूच्या फ्लॅगशिप कंपनीच्या शेअर्समध्ये यंदाच्या वर्षात ३५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ हो एक रेकॉर्ड बनवला. जे भारताच्या बेंचमार्क स्टॉक इंडेक्सपेक्षा चारपट अधिक आहे.
त्यागराजन यांनी आपल्या आयुष्याबद्दल सांगताना असे म्हटले की, मला लोकांशी नाती जोडायला फार आवडते. त्यामुळे ही काही वर्ष हॅचबेक चालवली. मोबाईल सुद्धा ठेवत नाही. मला पैशांची गरज नव्हती, नसणार आहे. सध्या शास्रीय संगीत ऐकणे आणि परदेशातील बिझनेस मॅगजीन वाचवण्यामध्ये वेळ घालवत आहे. त्यागराजन यांनी परिवारातील मॅनेजमेंट किंवा मालकी हक्कात जागा दिलेली नाही. मोठा मुलगा टी. शिवरमन इंजिनियर आहे. तर लहान मुलगा टी. विजय सीए आहे आणि श्रीराम ग्रुपमध्ये काम करतो. (Shriram groups founder)
हेही वाचा- Success Story: केवळ 100 रुपये घेऊन आले होते मुंबईत, आज आहेत शाहरुखचे शेजारी
श्रीराम ग्रुपची स्थापना ५ एप्रिल १९७४ रोजी आर, त्यागराजन, एवीएस राजा आणि टी. जयारमन यांनी केली होती. ग्रुपची सुरुवात चिट फंड बिझनेसच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर ग्रुपने कर्ज आणि इंन्शुरन्स बिझनेसमध्ये एंन्ट्री केली.