Home » ‘ही’ यात्रा अवघड असली तरी भाविकांची गर्दी मात्र कमी नसते

‘ही’ यात्रा अवघड असली तरी भाविकांची गर्दी मात्र कमी नसते

by Team Gajawaja
0 comment
Shrikhand Mahadev Yatra
Share

देशातील सर्वात खडतर मानल्या जाणाऱ्या श्रीखंड महादेव यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु झाली आहे. हिमाचल प्रदेशमधील ही श्रीखंड महादेव यात्रा शिवभक्तांसाठी आदरणीय आहे. मात्र या अवघड यात्रेवर जाऊन महादेवाचे दर्शन घेणे म्हणजे, भाविकांच्या सहनशीलतेची परीक्षाच असते. कारण हा मार्ग बर्फानं भरलेला असतो. श्रीखंड महादेव पर्वताच्या शिखरावर १८,५७० फूट उंचीवर ७५ फूट शिवलिंग आहे. येथे पोहचेपर्यंत मोठ्याप्रमाणात ऑस्किजनची कमतरता जाणवते. असे असले तरी अगदी मोजक्या दिवसांसाठी खुल्या होणा-या या यात्रेसाठी मोठ्याप्रमाणात शिवभक्त येतात. त्यातही साधुसंतांचे प्रमाण अधिक असते. श्रीखंड महादेव पर्वतावर प्रत्यक्ष भगवान शंकर आणि माता पार्वती यांचे निवासस्थान असल्याची भावनाही भक्तांमध्ये आहे. त्यामळेच कितीही अवघड यात्रा असली तरी भाविक येथे गर्दी करतात. यावर्षी ही यात्रा १४ ते २७ जुलैच्या दरम्यान होणार आहे.

हिमाचल प्रदेशमधील सर्वात अवघड यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीखंड महादेव यात्रेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. २५० रुपयांमध्ये या यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात आली आहे. १४ जुलैपासून ही यात्रा सुरु होत आहे. या यात्रेच्या नोंदणीसाठी श्रीखंड महादेव यात्रेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुल्लू जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीखाली २०१४ पासून या श्रीखंड महादेव यात्रेचे नियोजन केले जाते. (Shrikhand Mahadev Yatra)

या यात्रेसाठी भाविकांचे आरोग्य महत्त्वाचे असते. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी आवश्यक असतांना त्यामध्ये आरोग्य संदर्भातील सर्व नोंदी गरजेच्या केल्या आहेत. विशेष परिस्थितीत, प्रवासादरम्यान बेस कॅम्पवर ऑफलाइन नोंदणीची सुविधा देखील ठेवण्यात आली आहे. पण प्रवास न केल्यास किंवा वैद्यकीयदृष्ट्या अयोग्य असल्यास, अथवा नैसर्गिक आपत्तीमुळे प्रतिकूल परिस्थितीत सहल रद्द केल्यास नोंदणी शुल्क परत केले जाणार नाही, असेही बोर्डानं स्पष्ट केले आहे. (Shrikhand Mahadev Yatra)

श्रीखंड महादेव यात्रेचा मार्ग हा अवघड आहे, कारण तो संपूर्णपणे बर्फानं झाकलेला असतो. यावेळी श्रीखंड महादेव यात्रेच्या मार्गावर असलेला बर्फ अधिक आहे. या यात्रेच्या मार्गावर बर्फवृष्टीमुळे हिमनद्या तयार झाल्या आहेत. त्यामुळे हा प्रवास अधिक जोखमीचा झाला आहे.  १८,५७० फूट उंचीवर असलेल्या या नैसर्गिक अवस्थेतील ७५ फूट शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून हजारो भाविक येतात.  त्यांना ३५ किलोमीटरचा प्रवास करायला लागतो. हा बहुतांशी प्रवास बर्फाच्या मार्गातून आहे. त्यामुळेच या यात्रेसाठी येणा-या भाविकांची वैद्यकीय तपासणी आश्यक असते. याशिवाय यात्रेसाठी जे बेस कॅम्प उभारण्यात येतात, तेथीही भाविकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येते.

याशिवाय या श्रीखंड महादेव यात्रेसाठी १८ वर्षांखालील आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना परवानगी देण्यात येत नाही. कारण भाविकांना ३२ किलोमीटर पायी चढावे लागते. भाविकांना बर्फानं व्यापलेल्या अरुंद वाटेने जातांना काळजी घ्यावी लागते. यात्रेदरम्यान अनेक ठिकाणी भाविकांना ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. पार्वतीबागेच्या पलीकडील काही भागात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे काही भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हिमनदी आणि निसरड्या रस्त्यांमुळे पुढे जाण्यात मोठी अडचण होते. अशावेळी भाविकांना वेळीच उपचार देणे गरजेचे असते. यासाठी यात्रेची पाच सेक्टरमध्ये विभागणी करण्यात आली आहे. (Shrikhand Mahadev Yatra)

प्रशासन सिंहगड, थाचडू, कुंशा, भीम द्वार आणि पार्वतीबाग येथे यात्रेचा तळ उभारणार आहे. यामध्ये सेक्टर मॅजिस्ट्रेट आणि त्यांच्यासोबत प्रभारी पोलीस अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. या बेस कॅम्पमध्ये वैद्यकीय कर्मचारी, महसूल आणि बचाव पथके तैनात करण्यात येणार आहेत. यात्रेत पहिल्यांदाच बचाव पथक एसडीआरएफची तुकडी यात्रेचा शेवटचा बेस कॅम्प पार्वती बाग येथे तैनात करण्यात येणार आहे. गेल्या ११ वर्षांत या खडतर प्रवासात ४० हून अधिक भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या यात्रेचे नियोजन हे कायम आव्हानात्मक असते. याशिवाय या भागातील हवामानही बेभरवशाचे आहे. त्यामुळे दिलेल्या मर्यादेपेक्षा आधिही यात्रा बंद करण्यात येऊ शकते. (Shrikhand Mahadev Yatra)

============================

हे देखील वाचा : ट्रॅव्हल करण्याचे जबरदस्त फायदे, ऐकून व्हाल हैराण

============================

श्रीखंड महादेव कैलासाला शिखर कैलास देखील म्हटले जाते. हिमाचल प्रदेश, कुल्लू येथील हे शिखर म्हणजे भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचे निवासस्थान मानले जाते. हा भारतातील सर्वात कठीण ट्रॅक आहे. हिमालयातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या पाच वेगवेगळ्या शिखरांच्या समूहातील हे तिसरे सर्वात महत्त्वाचे शिखर आहे. कैलास पर्वत पहिल्या स्थानावर आहे, आदि कैलास दुसऱ्या स्थानावर, किन्नौर कैलास चौथ्या स्थानावर आणि मणिमहेश कैलास पाचव्या स्थानावर आहे. याच यात्रेला पंच कैलाश यात्रा म्हणून ओळखले जाते.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.