Home » Gajanan Maharaj : संत श्री गजानन महाराजांशी संबंधित खास गोष्टी

Gajanan Maharaj : संत श्री गजानन महाराजांशी संबंधित खास गोष्टी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Gajanan Maharaj
Share

महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटले जाते. याचे कारण म्हणजे या पवित्र भूमीमध्ये अनेक महान संतांनी जन्म घेतला होता. संत तुकाराम, साईबाबा, स्वामी समर्थ, एकनाथ महाराज, रामदास स्वामी, ज्ञानेश्वर आदी यातलेच एक महान संत म्हणजे संत श्री गजानन महाराज. गजानन महाराज हे दत्त संप्रदायातील महत्त्वाचे संत म्हणून ओळखले जातात. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे त्यांचे मुख्य गाव समजले जाते. गजानन महाराजांमुळेच शेगावला विदर्भातील पंढरपूर म्हणून ओळखले जाते. वयाच्या ३० व्या वर्षी २३ फेब्रुवारी १८७८ रोजी संत गजानन महाराज दिसले होते. त्यांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरी करतात. यंदा संत गजानन महाराजांचा प्रगट दिन हा येत्या ८ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. (Gajanan Maharaj)

गजानन महाराज यांचा प्रकट दिन माघ वद्य सप्तमी या तिथीला असतो. याच दिवशी, गजानन महाराज लोकांना दिगंबर अवस्थेत दिसून आले. हा दिवस गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. महाराजांचा जन्मदिवस कोणालाच माहीत नसल्यामुळे त्यांचा प्रकट दिन साजरा केला जातो. गजानन महाराजांचा प्रकट दिन हा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. रविवारी श्री संत गजानन महाराजांचा १४८ वा प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे. यंदा श्री संत गजानन महाराजांचा १४८ वा प्रकट दिन सोहळा असल्याने शेगावमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. दरवर्षी माघ महिन्यातील वद्य सप्तमीला गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. (Shegaon)

गजानन महाराज यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात म्हणजे वयाच्या ३० व्या वर्षी २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी प्रथमच दिसल्याचे सांगितले जाते. प्रथमदर्शनीच त्यांनी अन्न हे पूर्णब्रह्म असल्याची शिकवण लोकांना दिली. महाराजांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरी करतात. भक्ती मार्गाने परमेश्वरापर्यंत पोहचता येते हा संदेश त्यांनी कायम लोकांना दिला आहे. गजानन महाराजांचे चरित्र दासगणू महाराजांनी ‘श्रीगजानन विजय’ ग्रंथामध्ये लिहिले आहे. (Marathi)

Gajanan Maharaj

‘श्रीगजानन विजय’ या ग्रंथात महाराजांच्या आयुष्यातील अनेक आख्यायिका आणि ऐतिहासिक घटना वाचायला मिळतात. गण गण गणात बोते हा मंत्र महाराजांचा मुख्य मंत्र आहे. याचा सखोल अर्थ असा आहे की, “मी (गण) ब्रह्मांडातील सर्व कणाकणात (गण) आणि सर्व जीवांमधील आत्म्यात (बोते/आहे) वास करतो.” अर्थात, देव कोण्या एका ठिकाणी नाही, तर तो आपल्या सभोवताली आणि प्रत्येकाच्या हृदयात वसलेला आहे, असा होतो. (Todays Marathi Headline)

गजानन महाराज प्रगट दिन कथा
वऱ्हाड प्रांतात खामगाव तालुक्यात शेगाव नावाचे एक गाव आहे. त्या दिवशी शेगावात पातुरकरांचा घरी मुलाच्या ऋतुशांति होती. घरात जेवण्याच्या पंक्ती उठत होत्या. उष्ट्या पत्रावळी उकिरड्यावर टाकल्या जात होत्या. दुपारची वेळ होती. अचानक एक तेजस्वी तरुण तेथे अवतरले. पत्रावळीतील अन्न पदार्थ खाऊ लागले. त्यांचा अंगावर वस्त्र देखील नव्हते. त्यांच्याजवळ पाणी पिण्यासाठी एक तुंब आणि मातीची चिलम होती. चेहऱ्यावर समाधान, शांती होती. ते कुठल्या तरी तंद्रीत होते. (Marathi News)

त्याचवेळी रस्त्याने बंकटलाल अगरवाल आणि दामोदर पंत कुळकर्णी जात होते. त्यांचे लक्ष त्या तरुणाकडे गेले. त्याला बघून हा कोणी विक्षिप्त असावा असे म्हणाले. पण त्या तरुणाच्या मुद्रा बघून हा कोणीतरी साधुपुरुष असावा असे वाटले. कदाचित ह्याला भूक लागली असणार असे बंकटलालला वाटले. त्यांनी पातुरकरांकडून पंचपक्वान्नांनी भरलेले ताट आणून त्या तरुणासमोर आणून ठेवले आणि त्याला खाण्याचा आग्रह केला. त्या तरुणाने सर्व पक्वान्ने एकत्र करून खाल्ल्ली नंतर जनावरांसाठी भरून ठेवलेले पाणी पिऊ लागला. हे बघतातच दामोदरपंत कुळकर्णी म्हणाले- “ते पाणी घाण आहे. ते पिऊ नका”. (Top Marathi News)

यावर तरुणाने उत्तर दिले “घाण व स्वच्छ पाणी दोन्ही सारखेच. उष्टे, खरकटे व पंच पक्वांन्ने दोन्ही एकच. सर्व सुष्टीत परमेश्वर आहे. घाण पाणी म्हणजेच परमेश्वर, स्वच्छ पाणी म्हणजे परमेश्वर आणि पिणाराही त्याहून वेगळा नाही म्हणजे तो ही परमेश्वर.” हे एकतातच बंकटलालांची खात्री पटली की हे कोणी विरागी साधू पुरुष आहे. ते दोघे त्या तरुणाचे पाय धरण्यास धावले तोवर ते अदृश्य झाले. हे साधुपुरुष दुसरे कोणी नसून साक्षात गजानन महाराज होय. ते त्या दिवशी शेगावात अवतरले तो दिवस शके १८०० मधील माघ वद्य सप्तमी असे. (Latest Marathi Headline)

Gajanan Maharaj

गजाजन महाराज आणि स्वामी समर्थ यांचे नाते
महाराज हे अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे अवतार मानले जातात, त्यांनी काही काळ स्वामींच्या आश्रमातही निवास केला होता, असे मानले जाते. महाराजांना स्वयंभू मानले जाते, ज्यांनी बाललीला दाखवत अक्कलकोटच्या स्वामी समर्थांकडून गुरुदिक्षा घेतल्याचे सांगण्यात येते. अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि गजानन महाराज दोघेही परमहंस सन्यासी होते, दोघेही आजानबाहू होते. गजानन महाराज स्वामी समर्थ समाधीस्त होण्याच्या काही दिवस आधी शेगावात प्रगट झाले. स्वामी समर्थांप्रमाणे गजानन महाराज हे स्वयंभू होते. दोघांचे चरित्र वाचल्यावर त्यांच्यातील साम्य प्रकर्षाने लक्षात येते आणि हे दोघे भौतिक दृष्ट्या दोन दिसले तरी प्रत्यक्षात एकच असावे असे वाटते. (Top Trending News)

गजानन महाराज आणि लोकमान्य टिळक
लोकमान्य टिळक यांनी गजानन महाराजांची भेट घेतली होती. अकोल्यात शिवजयंतीनिमित्त झालेल्या एका सभेला, टिळकांबरोबर गजानन महाराजही व्यासपीठावर बसले होते. लोकमान्य टिळकांना कैद झाली, त्यावेळी महाराजांनी त्यांच्याकरिता भाकरीचा प्रसाद पाठविला आणि भविष्य वर्तवले की, टिळकांना शिक्षा अटळ आहे. महाराजांच्या भविष्यवाणीनुसार, ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी ‘गीतारहस्य’ ही भगवदगीतेवर टीका लिहिली. (Top Stories)

=======

Kalyana Sundareswarar Temple : रंग बदलणारे चमत्कारी शिवलिंग

Panakala Lakshmi Narasimha Swamy : चमत्कारी मंदिर

=======

गजाजन महाराज समाधी
गजानन महाराजांना पंढरीलाच समाधी घेण्याचा मानस होता. मात्र, विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले. ऋषिपंचमीला सूर्याची पहिली किरणे जमिनीवर पोहोचली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. विठ्ठलाच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते. देहू ,आळंदीनंतर याच पालखीला सर्वाधिक महत्त्व आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.