मध्य प्रदेशच्या उज्जैन जिल्ह्यामधील हे ज्योतिर्लिंग व स्वयंभू असून, रुद्रसागर तलावाच्या काठावर आहे.
बारा ज्योतिर्लिंग – महांकालेश्वर (मध्यप्रदेश) Shri Mahakaleshwar Jyotirling Ujjain
भौगोलिक रचना
हे शहर क्षिप्रा नदीच्या किनारी वसले आहे. दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभ मेळ्यात जगभरातून भाविक येथे येतात. श्री महांकालेश्वर ज्योतिर्लिंगची प्रतिमा दक्षिणमुखी आहे. बारा ज्योतिर्लिंगात फक्त महांकालेश्वर येथेच भस्म आरती होते. हे एकमेव दक्षिणमुखी शिवलिंगआहे. तांत्रिक-मांत्रिकांसाठी ही हे मंदिर खूप महत्त्वाचे मानले जाते.
श्रीमहाकालमंदिराची प्रशंसा महाभारतकालीन वेदव्यासां पासून कालिदास, बाणभट्ट आणि राजाभोजयांनी ही केलीआहे. येथील मंदिराची निर्मिती अकराव्या शतकात झाली. त्यानंतर जवळपास १४० वर्षानंतर दिल्लीचा सुलतान इल्तुतमिशाने उज्जनवरने आक्रमण करून हे मंदिर उद्ध्वस्त केले. सध्याचे मंदिर मराठा कालीन आहे. देवलोकीच्या शिल्पकार विश्वकर्माने हे मंदिर बांधले, असा उल्लेख अनेक पूराणांमध्ये आहे.
येथील लिंग महादेव तीर्थ स्थळाच्या वर स्थापित केले आहे. येथे गणेश पार्वती आणि कार्तिकेय देव यांच्या प्रतिमा पण आहेत. दक्षिन दिशेस प्रिय नांदी स्थापित केले आहे. असे म्हटले जाते कि, येथे बनविलेले नागचंद्रेश्वर मंदिर चे कपाट फक्त नागपंचमीस उघडले जातात.
महाकालेश्वर आख्यायिका
शिव पुराणानुसार एकदा त्रिदेव ब्रम्हा,विष्णू आणि महादेव यांच्यात चर्चा सुरु होती. तेव्हा भगवान शंकराच्या मनात ब्रम्हदेव आणि महादेव यांची परीक्षा घेण्याचा विचार आला. त्यांनी त्या दोघांना प्रकाशाचा अंत कोठे आहे. हे शोधन्यास सांगितले.
ब्रम्हा व विष्णू दोघांसाठी शिवांनी एक मोठा स्तंभ उभारला ज्याचा अंत कोठे होतो दिसेना.
दोघेही त्या स्तंभाचे टोक शोधू लागले. पण तो सापडेना श्रीविष्णू थकले व आपली हर मान्य केली तर ब्रम्हा खोट बोलले कि त्यांना त्याचे टोक सापडले. यावरून क्रोधीत होवून शिवांनी त्यांना श्राप दिला कि लोक तुमची पूजा कधीच करणार नाही तर विष्णूचि सर्वच पूजा करतील. तेव्हा क्षमा मागत ब्रम्हानी शिवाची विनवणी केली तेव्हा या स्तंभात शिव स्वतः विराजमान झाले.
हे स्तंभ महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मानले जाते. स्तंभाचे रुपांतर लिंगात झाले तेव्हा पासून या ज्योतिर्लिंगास खास महत्व प्राप्त झाले आहे. प्रमुख १२ ज्योतिर्लिंगापैकी महाकालेश्वर सर्वात पवित्र मानले जाते.
मंदिराची रचना
महाकालेश्वर मंदिर एका विशाल बागीच्याच्या मध्यभागी आहे. हे मंदिर पाच मजली असून त्यातील खालील पहिला मजला हा जमिनीत आहे. या शेजारी रुद्र्सागर सरोवर आहे. याच्या भिंतीवर पितळी दिवे स्थापित केले आहेत. येथे सोमवारी भक्तांची फार गर्दी असते. दररोज विधिवत पूजा केली जाते. महाकालेश्वर लिंगास सजवले जाते. नित्य नियमाने प्रसादाचे वाटप होते.
आरतीचा वेळ
श्री महाकाल मंदिराचे दरवाजे पहाटे चार वाजता उघडतात. ही वेळ भस्मारतीचा असून ती सकाळी सहा वाजेपर्यंत चालते. सकाळी साडेसात ते आठ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत नैवेद्य आरती चालते. संध्याकाळी पाचपासून जलाभिषेक बंद होतो. संध्याकाळी साडेसहा ते सात वाजेपर्यंत सायंआरती आणि रात्री साडेदहा वाजता शयन आरती असते. रात्री अकरा वाजता मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. (उन्हाळ्याच्या दिवसात नैवेद्य आरती सकाळी सात ते पाऊणे आठ वाजेपर्यंत आणि सायं आरती सात ते साडेसात वाजेपर्यंत असते.)
कसे पोहोचणार
रस्त्याने- उज्जैन-आग्रा-कोटा-जयपूरमार्गे, उज्जैन-बदनावर-रतलाम-चितोडमार्गे, उज्जैन-मक्सी-शाजापूर-ग्वालियर-दिल्लीमार्गे, उज्जैन-देवास-भोपाळमार्गे, उज्जैन-धुळे-नाशिक-मुंबईमार्गे.
रेल्वे मार्ग- उज्जैनहून मक्सी-भोपाळ मार्गे (दिल्ली-नागपूर रेल्वे मार्ग), उज्जैन-नागदा-रतलाम मार्गे (मुंबई-दिल्ली रेल्वेमार्ग), उज्जैन-इंदूरमार्गे ( मीटरगेजने खांडवा रेल्वेमार्ग), उज्जैन-मक्सी-ग्वालियर-दिल्लीमार्गे.
हवाई मार्ग- उज्जैनपासून इंदूर विमानतळ जवळपास ६५ किलोमीटरवर आहे.
राहण्याची व्यवस्था- उज्जैनमध्ये चांगल्या हॉटेलपासून सर्वसामान्यांना परवडेल अशा धर्मशाळा आहेत. तसेच महाकाल समितीची महाकाल आणि हरसिद्धी मंदिराजवळ धर्मशाळा आहेत. या धर्मशाळेत वातानुकूलित, साध्या खोल्या आणि हॉलही उपलब्ध आहेत.
शब्दांकन – शामल भंडारे.
=====
हे देखील वाचा: बारा ज्योतिर्लिंग – मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश – श्रीशैल्य)
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.