Home » श्रावणातील उपवासात करा ‘या’ गोष्टींचे सेवन, थकवा राहिल दूर

श्रावणातील उपवासात करा ‘या’ गोष्टींचे सेवन, थकवा राहिल दूर

by Team Gajawaja
0 comment
Shravan diet plan
Share

श्रावण महिना हिंदू धर्मात सर्वाधिक महत्त्वाचा असतो. हा महिना शंकराला समर्पित असतो. असे मानले जाते की, श्रावणात उपवास केल्याने शंकराचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळेच बहुतांश लोक श्रावणात शनिवार आणि सोमवारी उपवास करतात. तर काही लोक संपूर्ण श्रावण उपवास करतात. अशातच काही लोक अशी सुद्धा असातत जे केवळ सैंधव मीठ किंवा फळांचे सेवन करतात. अशातच तुम्ही सुद्धा श्रावणात उपवास करत असाल तर आपल्या डाएटमध्ये अशा काही गोष्टींचा समावेश केला पाहिजे ज्यामुळे शरिराला उर्जा मिळेल. त्याचसोबत तुम्हाला पोषक तत्त्व ही त्यामधून मिळतील. (Shravan diet plan)

-खजूर
श्रावणातील उपवासाला तुम्ही खजूर खाऊ शकता. यामध्ये नैसर्गिक साखर, फाइबर आणि एसेंशियल मिनिरल्स असतात. याचे सेवन केल्याने शरिराला इंस्टेट एनर्जी मिळते. या व्यतिरिक्त याच्या सेवनाने ब्लड शुगरचा स्तर ही नियंत्रणात राहण्यास मदत होते. जर तुम्हाला दिवसभरात थकवा वाटला तर तुम्ही खजूर नक्की खाऊ शकता.

-नट्स आणि शीड्स
उपवासावेळी तुम्ही नट्स आणि शीड्सचे सेवन करू शकता. यामधून भरपूर प्रमाणात एनर्जी मिळते. यामध्ये व्हिटॅमिन आणि मिनिरल्स खुप प्रमाणात असतात. खरंतर बदाम, अक्रोड, पिस्ता यामध्ये हेल्दी फाइट, प्रोटीन आणि फायबर असतात. याचे जर दररोज सेवन केल्यास तुमच्या शरिराला एनर्जी मिळते.

-ताजी फळं
उपवासावेळी तुम्ही ताजी फळं खाऊ शकता. फळांमध्ये तुम्ही केळ, सफरचंद, संत्र, डाळिंब खाऊ शकता. ही फळं तुम्हाला हेल्दी ठेवण्यास मदत करतील. ताज्या फळांमध्ये शुगर, फायबर, व्हिटॅमिन आणि अँन्टीऑक्सिटेंड असतात. यामुळे शरिराला इंस्टेट एनर्जी मिळते आणि तुम्ही हाइड्रेट ही राहता.

-दही
दही तु्म्ही उपवासावेळी खाऊ शकता. दही हे प्रोबायोटिक फूड आहे. जे पाचनक्रिया सुरळीत करते. या व्यतिरिक्त बद्धकोष्ठता सुद्धा होण्याची शक्यता फार कमी होते.तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास दही मदत करते. तसेच यामध्ये असणारे प्रोटीन, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन बी शरिराला उर्जा देण्याचे काम करतात.

-नारळाचे पाणी
जर तुम्ही उपवासावेळी नारळाचे पाणी प्यायलात तर ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. खरंतर नारळाचे पाणी नैसर्गिक आइसोटोनिक ड्रिंक्स आहे. जे तुम्हाला उपवासावेळी हाइड्रेट राहण्यास मदत करते. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, नैसर्गिक साखर असते. यामुळे तुमच्या शरिराला इंस्टेट एनर्जी मिळते. या व्यतिरिक्त तुम्ही ज्यूस, स्मुदी किंवा लिंबू पाणी सुद्धा पिऊ शकता. (Shravan diet plan)

हेही वाचा- आठवड्याभरासाठीचा असा असावा वर्कआउट प्लॅन

-साबुदाणा
उपवासावेळी आपण साबुदाणा खातो. तो भात आणि पोळीऐवजी बेस्ट ऑप्शन आहे. साबुदाण्यात कार्बोहाइड्रेट असतात, त्याचे सेवन केल्याने शरिराला एनर्जी मिळते. यामुळे तुम्हाला भूक लागली किंवा थकवा वाटला तर साबुदाण्याचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.