Shravan 2025 : हिंदू धर्मात तुळस ही एक अत्यंत पवित्र आणि पूजनीय वनस्पती मानली जाते. तुळशीचा उपयोग केवळ धार्मिक कार्यांपुरता मर्यादित नसून, तिचे औषधी गुणधर्मही प्राचीन काळापासून ओळखले गेले आहेत. विशेषतः श्रावण महिन्यात तुळशीची पूजा अधिक भक्तिभावाने केली जाते. मात्र, काही वेळा या महिन्यात तुळशीची पाने हिरवी न राहता जांभळी किंवा काळसरसर रंगाची होतात. हे दृश्य पाहिल्यावर अनेकांच्या मनात शंका निर्माण होते – हे शुभ आहे की अशुभ?
जांभळी पाने म्हणजे काय संकेत? – धार्मिक दृष्टिकोनातून
हिंदू परंपरेनुसार, तुळस ही लक्ष्मीचे रूप मानली जाते आणि तिच्या झाडातील कोणतीही अडचण ही नकारात्मक ऊर्जेचा संकेत मानली जाते. काही भागात असे मानले जाते की, तुळशीची पाने जांभळी होणे हे घरातील नकारात्मकतेचे किंवा दोषांचे लक्षण असू शकते. हे संकेत देणारे लक्षण समजून, काहीजण तुळशीच्या झाडाभोवती गंगाजल शिंपडतात, संध्याकाळी दिवा लावतात आणि नियमित मंत्रपठण करतात. त्यातून वातावरण शुद्ध करण्याचा आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.
वास्तविक कारणे – वैज्ञानिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून
ज्यावेळी तुळशीची पाने जांभळी किंवा काळसर रंगाची होतात, तेव्हा त्यामागे धार्मिक कारण नसून हवामान, मातीतील पोषण, सूर्यप्रकाश आणि पाणीपुरवठा यांचे असंतुलन हे मुख्य कारण असते. श्रावणात पावसामुळे जमिनीतील ओलावा जास्त होतो. त्यामुळे मुळे सडू शकतात आणि झाडावर बुरशीचा संसर्ग होतो. त्याचे परिणाम म्हणजे पाने रंग बदलतात.

Shravan 2025
काही वेळेस तुळशीच्या विशिष्ट प्रकारात (उदा. कृष्णा तुळस) नैसर्गिकरित्या पाने जांभळीसर असतात. अशा वेळी चिंता करण्याची गरज नसते. मात्र, जर नेहमी हिरवी दिसणारी तुळस अचानक जांभळी किंवा काळसर झाली, तर ती बुरशी, अति पाणी, प्रकाशाचा अभाव किंवा मातीतील पोषण घटक कमी होणे या गोष्टींमुळे झाली असू शकते.
तुळशीची योग्य निगा राखण्याच्या काही टिप्स
- तुळशीला दररोज सकाळी आणि संध्याकाळी पाणी द्या, मात्र अति पाणी टाळा.
- तुळशीच्या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा.
- मातीची गुणवत्ता तपासा – गरज असल्यास कंपोस्ट वापरा.
- पाने जांभळी झाली तर फंगस नियंत्रणासाठी जैविक कीटकनाशकाचा वापर करा.
==========
हे देखील वाचा :
Deep Amavasya 2025 : यंदा दीप अमावस्या कधी? वाचा पुराणानुसारची अख्यायिका
Sharavan : श्रावणात मांसाहार का करत नाही?
Shravan 2025 : श्रावण महिन्याची १० नावे आणि त्यांच्या मागील कथा, घ्या जाणून
=========
तुळशीची पाने जांभळी होणे हे अनेक वेळा धार्मिक किंवा आध्यात्मिक संदेश म्हणून घेतले जाते, पण त्यामागे शास्त्रीय कारणे अधिक महत्त्वाची असतात. अशा वेळी अंधश्रद्धेऐवजी झाडाची योग्य निगा राखणं आणि त्याला योग्य वातावरण देणं आवश्यक असतं. तुळस ही आपल्या घरातील शुद्धता, सौंदर्य आणि अध्यात्मिकतेचं प्रतीक असल्याने तिची योग्य काळजी घेणं हेच खरं पुण्य आहे.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics