आज सर्वत्र नागपंचमी आणि मंगळागौर साजरी करण्याची लगबग सुरु असेल. श्रावण महिना म्हणजे नुसती सणाची रेलचेल. आज काय श्रावणी सोमवार, उद्या मंगळागौर, परवा नागपंचमी असे एक ना अनेक सण या महिन्यात साजरे होतात. सगळ्यांनाच माहित आहे, या महिन्यात आठवड्यातल्या प्रत्येक वाराला मोठे महत्व असते. तसे पाहिले तर श्रावण महिना वगळता इतर ११ महिन्यामध्ये बुधवार या वाराला तसे फारसे काही महत्व नसते. जर या दिवशी एकदा मोठा सण आला तरच काय तो बुधवारचा उदो उदो होतो. बाकी तर बुधवार मोकळा वार म्हणूनच प्रसिद्ध आहे. मात्र श्रावण महिना याला अपवाद ठरतो. (Marathi News)
श्रावणात बुधवारला मोठे महत्व दिसून येते. श्रावणातल्या प्रत्येक बुधवारी बुध-बृहस्पती पूजन करण्याची रीत आहे. श्रावणातल्या बुधवारची ओळखच बृहस्पतींचा वार अशी असते. पहिली श्रावणी बुधवार ३० जुलै, दुसरा श्रावणी बुधवार ६ ऑगस्ट, तिसरा श्रावणी बुधवार १३ ऑगस्ट आणि चौथा श्रावणी बुधवार २० ऑगस्ट रोजी असणार आहे. श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधदेव आणि गुरुवारी देवगुरु बृहस्पतीची पूजा केली जाते. यंदा ३० जुलैला श्रावणातला पहिला बुधवार असणार आहे. या दिवशी बुध पूजन केले जाईल. धार्मिक मान्यतेनुसार, बुध पूजनासाठी बुधदेवाचे चित्र घेऊन किंवा बालस्ती रेखाटून त्याची पूजा करून शेवटी दही-भाताचा नैवेद्य दाखवला जातो. बुध-बृहस्पतीचे हे व्रत सात वर्षे केले जाते. (Todays Marathi Headline)
श्रावण महिन्याच्या सुरुवातीला जो जिवतीचा कागद चिकटवला जातो, त्यात बुध-बृहस्पतींचे चित्र रेखाटण्यात आले आहे. धनसंपदा, बुद्धिचातुर्य, विद्याधन हे सर्वांनाच पाहिजे असते. ते देण्याबद्दल ज्यांचा लौकिक आहे, अशा बुध आणि बृहस्पती यांची ही पूजा अनेक घरात पूर्वापार परंपरेने केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, धनसंपदा, बुद्धिचातुर्य, विद्येचे कारक म्हणून बुध ग्रहाला पूजले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, बुध आणि बृहस्पती ह्यांची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदते. या दिवशी गुरुजनांना भेटवस्तू द्याव्यात. अनेक घरांमध्ये श्रावणातल्या पहिल्या बुधवारी घरातील महत्वाच्या गोष्टी जसे की, कपात, तिजोरी, धान्याच्या कोठ्या, दरवाजाच्या मागे, घरातील इतर मूल्यवान वस्तू यांवर चंदनाने बाहुल्या काढल्या जातात आणि त्यांची महिनाभर पूजा केली जाते. (Latest Marathi News)
बुधपूजन करताना म्हणावयाचा मंत्र:
सकाळी उठून स्नान केल्यानंतर भगवान शंकराला गंगाजल आणि शमीच्या पानांनी अभिषेक करावा. यानंतर पूजा करून या मंत्राचा २१ वेळा जप करावा. बुधवारी या मंत्राचा जप केल्यास आपल्याला शत्रूपासून मुक्ती मिळते.
ॐ पूर्वकपिमुखाय पच्चमुख हनुमते टं टं टं टं टं सकल शत्रु सहंरणाय स्वाहा।
बृहस्पती मंत्र :
देवनम् च ऋषिं गुरुं कंचना-सन्निभं बुद्धि-भूतम् त्रिलोकेशन तम नमामि बृहस्पतिम ||
गुरुवारी हा मंत्र पहाटे ४ ते ६ या वेळेत म्हणावा. (Top Trending News)
बुध-बृहस्पती पूजनाचे लाभ
बुधपूजनामुळे सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि सुख लाभते. तसेच वैवाहीक जीवनात आनंद आणि गोडवा कायम टिकतो आणि वाढत राहतो. जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. व्रत करणाऱ्या व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होते आणि त्या व्यक्तीची जगात वेगळी ओळख निर्माण होते. कामात त्या व्यक्तीला यश मिळते. ती व्यक्ती भय आणि तणावाशिवाय जीवन जगते. श्रावण महिना आहे म्हटल्यावर शिव पूजन तर ओघाने येतेच. बुधवारी देखील बुधपूजन झाल्यानंतर महादेवाचे पूजन करावे. महादेवाला बेल आणि पांढरे फुल अर्पण करून प्रार्थना करावी. सर्वात शेवटी शिवस्तुती म्हणावी आणि शंकराची आरती करावी. (Top Marathi HEadline)
||शिवस्तुती ||
पशूनां पतिं पापनाशं परेशं गजेन्द्रस्य कृत्तिं वसानं वरेण्यम। जटाजूटमध्ये स्फुरद्गाङ्गवारिं महादेवमेकं स्मरामि स्मरारिम।1।
महेशं सुरेशं सुरारातिनाशं विभुं विश्वनाथं विभूत्यङ्गभूषम्। विरूपाक्षमिन्द्वर्कवह्नित्रिनेत्रं सदानन्दमीडे प्रभुं पञ्चवक्त्रम्।2।
गिरीशं गणेशं गले नीलवर्णं गवेन्द्राधिरूढं गुणातीतरूपम्। भवं भास्वरं भस्मना भूषिताङ्गं भवानीकलत्रं भजे पञ्चवक्त्रम्।3।
शिवाकान्त शंभो शशाङ्कार्धमौले महेशान शूलिञ्जटाजूटधारिन्। त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप: प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप।4।
परात्मानमेकं जगद्बीजमाद्यं निरीहं निराकारमोंकारवेद्यम्। यतो जायते पाल्यते येन विश्वं तमीशं भजे लीयते यत्र विश्वम्।5।
न भूमिर्नं चापो न वह्निर्न वायुर्न चाकाशमास्ते न तन्द्रा न निद्रा। न गृष्मो न शीतं न देशो न वेषो न यस्यास्ति मूर्तिस्त्रिमूर्तिं तमीड।6।
अजं शाश्वतं कारणं कारणानां शिवं केवलं भासकं भासकानाम्। तुरीयं तम:पारमाद्यन्तहीनं प्रपद्ये परं पावनं द्वैतहीनम।7।
नमस्ते नमस्ते विभो विश्वमूर्ते नमस्ते नमस्ते चिदानन्दमूर्ते। नमस्ते नमस्ते तपोयोगगम्य नमस्ते नमस्ते श्रुतिज्ञानगम्।8।
प्रभो शूलपाणे विभो विश्वनाथ महादेव शंभो महेश त्रिनेत्। शिवाकान्त शान्त स्मरारे पुरारे त्वदन्यो वरेण्यो न मान्यो न गण्य:।9।
शंभो महेश करुणामय शूलपाणे गौरीपते पशुपते पशुपाशनाशिन्। काशीपते करुणया जगदेतदेक-स्त्वंहंसि पासि विदधासि महेश्वरोऽसि।10।
त्वत्तो जगद्भवति देव भव स्मरारे त्वय्येव तिष्ठति जगन्मृड विश्वनाथ। त्वय्येव गच्छति लयं जगदेतदीश लिङ्गात्मके हर चराचरविश्वरूपिन।11। (Social News)
बुध-बृहस्पती कथा
ऐका बुध-बृहस्पतींनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला सात मुलगे होते, सात सुना होत्या. त्याच्या घरी रोज एक मामा-भाचे भिक्षेला जात. राजाच्या सुना ‘आमचे हात रिकामे नाहीत’ म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यास द्रारिद्र्य आलं. सर्वांचे हात रिकामे झाले. मामा-भाचे पूर्वीप्रमाणं भिक्षेला आले. सर्व सुनांनी सांगितलं, “असतं तर दिलं असतं. आमचे हात रिकामे झाले.” सर्वांत धाकटी सून शहाणी होती. तिनं विचार केला, होतं तेव्हा दिलं नाही, आता नाही म्हणून नाही. ब्राह्मण विन्मुख जातात. ती त्यांच्या पाया पडली. त्यांना सांगू लागली, “आम्ही संपन्न असता धर्म केला नाही ही आमची चुकी आहे. (LAtest Marathi Headline)
आता आम्ही पूर्वीसारखी होऊ, असा काही उपाय सांगा,” ते म्हणाले, “श्रावणमासी दर बुधवारी आणि बृहस्पतवारी जेवायला ब्राह्मण सांगावा. आपला पति प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागं दोन बाहुली काढावी. संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी. त्यांची मनोभावे पूजा करावी. अतिथींचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतु पूर्ण होतात.” त्याप्रमाणे ती करू लागली.
एके दिवशी तिला स्वप्न पडलं, “ब्राह्मण जेवीत आहेत, मी चांदीच्या भांड्यानं तूप वाढते आहे.” ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली. त्यांनी तिची थट्टा केला. इकडे काय चमत्कार झाला? तिचा नवरा प्रवासाला गेला होता. त्या नगराचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं? हत्तिणीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरविलं, “ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याचा राज्याभिषेक होईल,” अशी दौंडी पिटविली. हत्तिणीनं ह्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली. (Social Updates)
=========
हे देखील वाचा : Shravan : श्रावणात होणाऱ्या मंगळागौरीच्या व्रताची माहिती
Nagpanchami : महादेवांनी का धारण केला आहे गळ्यात नाग?
=========
मंडळींनी त्याला हाकलून दिलं. पुन्हा हत्तीण फिरविली. पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली. याप्रमाणं तीनदा झालं. पुढं त्याचाच राज्याभिषेक केला. नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली, तेव्हा ती अन्न अन्न करून देशोधडीस लागल्याची खबर समजली. मग राजानं काय केलं? मोठ्या तलावाचं काम सुरू केलं. हजारो मजूर खपू लागले, तिथं त्याची माणसं आली. राजानं आपली बायको ओळखली. मनामध्ये संतोष झाला. तिनं बुध-बृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळविली. देवानं देणगी दिली, पण जावांनी थट्टा केली. राजानं ती गोष्ट मनात ठेविली.
ब्राह्मणभोजनाचा थाट केला. हिच्या हातात चांदीचं भांडं दिलं. तूप वाढू सांगितलं. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनीं ते पाहिलं. त्याचा सन्मान केला. मुलंबाळं झाली. दुःखाचे दिवस गेले. सुखाचे दिवस आले. जशी त्यांवर बुध-बृस्पतींनी कृपा केली, तशी तुम्हा आम्हावर करोत. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. (Top Marathi Stories)
(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. कायम तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics